मनोरंजन

प्रेरणादायी: हमाल ते IAS अधिकारी; रेल्वेच्या फ्री वायफायवरून अभ्यास करणाऱ्या श्रीनाथची कहाणी वाचा

आपण अनेक यशस्वी व्यक्तींच्या कथा वाचतो. त्यांची रणनीती, कठोर परिश्रम, समर्पण प्रत्येकाला प्रेरणा देणारे असते. काही कथा इतक्या अनोख्या आणि विचित्र असतात की, त्या आपल्याला थक्क करून टाकतात. या लेखात, आपण केरळमधील हमाल श्रीनाथ के ते IAS श्रीनाथ के यांच्या प्रवासामागील कथा वाचूयात.. कोणत्याही कोचिंग इन्स्टिट्यूटला न जाता या तरुणाने रेल्वेच्या मोफत वाय-फायच्या मदतीने स्मार्टफोनवर यूपीएससी परीक्षेचा अभ्यास करून यश मिळविले आहे. तरुणाची ही मेहनत फळाला लागली असून आयएएस अधिकारी बनून या तरुणाने जगासमोर यशाचे नवे उदाहरण ठेवले आहे. (coolie to IAS officer)

मुन्नारचे मूळ रहिवासी असलेले IAS श्रीनाथ के केरळमधील एर्नाकुलम येथे रेल्वे स्टेशनवर कुली म्हणून काम केलं आहे. जे मुन्नारचे सर्वात जवळचे मध्य रेल्वे स्थानक आहे. श्रीनाथ हा मध्यमवर्गीय कुटुंबातील होता. तो रेल्वे स्थानकावर प्रवाशांचे सामान व बॅग नेण्याचे काम करत असे. त्यांनी स्वतःला संपूर्ण झोकून देऊन कुटुंबाला आर्थिक पाठबळ दिले.

२०१८ मध्ये, वयाच्या २७ व्या वर्षी, जेव्हा तो एका वर्षाच्या मुलीचा बाप झाला, तेव्हा त्याला समजले की त्याचे उत्पन्न त्याच्या कुटुंबासाठी पुरेसे नाही. आपल्या अल्प कमाईमुळे आपल्या लहान मुलीला आयुष्यात त्रास होऊ नये असे त्याला वाटत होते. म्हणून त्यांनी कठोर परिश्रम करण्यास सुरवात केली. रेल्वे स्टेशनवर काम करताना ऑनलाइन लेक्चर्स ऐकण्यासाठी त्यांनी वायफायचा वापर केला. पुस्तकांवर किंवा कोणत्याही कोचिंग क्लासवर खर्च करण्याऐवजी, श्रीनाथने परीक्षेची तयारी करण्यासाठी केवळ विनामूल्य वायफायचा फायदा घेतला. एक स्मार्टफोन, एक मेमरी कार्ड, एक जोडी इयरफोन आणि फ्री वायफाय या सर्व गोष्टी त्याला त्याचे ध्येय साध्य करण्यासाठी आवश्यक होत्या.

केंद्रीय लोकसेवा आयोगाची (यूपीएससी) परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी दरवर्षी लाखो उमेदवार आपले नशीब आजमावतात. त्यासाठी मोठ्या कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये लाखो रुपये खर्च करतात. मात्र मूळचा केरळचा असलेल्या श्रीनाथने रेल्वे स्टेशनवर हमाल म्हणून काम करत असताना कोणत्याही कोचिंगची मदत न घेता यूपीएससीमध्ये यश मिळवले आहे. यूपीएससी आधी श्रीनाथने केरळ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतही आपल्या नावाचा झेंडा फडकवला आहे.

श्रीनाथला कोचिंग सेंटरची फी परवडत नव्हती. मात्र रेल्वे स्थानकावरील मोफत वाय-फायमुळे त्यांचा अवघड मार्ग सुकर झाला. या वाय-फायच्या मदतीने त्याने आपल्या स्मार्ट फोनवर अभ्यास सुरू केला. रेल्वे स्थानकात हमाल म्हणून काम करता करता श्रीनाथने यूपीएससीचे ऑनलाइन लेक्चर्स ऐकणे सुरू केले. जिद्द आणि चिकाटीच्या बळावर श्रीनाथने यूपीएससीत यश मिळविले आहे. याबाबत श्रीनाथचे यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेतील यशाबद्दल सर्व स्तरावरून कौतुक केले जात आहे.

हे सुद्धा वाचा : 

प्रेरणादायी : सालगड्याचा पोरगा झाला उपजिल्हाधिकारी!

कौतुकास्पद: बाळंतपणाच्या वेदनादायक प्रक्रियेतून जावूनही ‘ती’ने दिली बोर्डाची परीक्षा!

Maharashtra: ‘टेड टॉक’, ‘जोश टॉक्स’ नंतर आता टिचर्स टॉक्स; ग्रामीण भागातील शिक्षकांचा प्रेरणादायी ट्रेंड येणार!

Team Lay Bhari

Recent Posts

नाशिक मनपाच्या बांधकाम विभागाचा कानाडोळा,एम एन जि एल गॅस मुळे नागरिकांना होतोय त्रास

गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील अनेक भागात एम एन जि एल तर्फे गॅस (MNGL Gas) वाहिनी…

2 hours ago

नाशिक महापालिकेचा पाणी पुरवठ्यावर पाणीगळती रोखण्यासाठी स्काडामीटर बसवण्याचा प्रस्ताव

नाशिक शहरात धरणातून उचलले जाणारे पाणी व नागरिकांकडून होत असलेला पाणीवापर याचा विचार केल्यास पाणीगळतीचे…

2 hours ago

सिन्नर तालुक्यातील रामनगर येथे डबक्यात पडून बहीण-भावाचा म़ृत्यू

सिन्नर तालुक्यातील रामनगर येथे रवींद्र त्र्यंबक भंडकर यांची धनश्री भंडकर (वय 4 ), आविष (5)…

3 hours ago

शरद पवार विरूद्ध देवेंद्र फडणवीस अशी लढत माढा मध्ये रंगणार…

ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या कुटुंबीयांनी भाजपच्या विरोधात बंड पुकारल्याने आता माढा मतदारसंघातील समीकरणे बदलली…

3 hours ago

नाशिक महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्याच्या खून प्रकरणी दोघांना अटक

सनी गंगाघाटावरून जात असताना एकाला धक्का लागला. त्यावरून वाद झाला होता. त्यानंतर त्यांची भेट पून्हा…

3 hours ago

चक्क छगन भुजबळांच्या स्विय सहायकालाच पन्नास हजारांचा गंडा

येवला शहरात छगन भुजबळांच्या निकट वरती (Chhagan Bhujbal's personal assistant) यांना एका महाठकाने 50 हजाराला…

3 hours ago