मनोरंजन

Video : दिशा पटानीला मुलांनी नाकीनऊ आणले

बॉलिवुडची तारका दिशा पटानीचे मोठे फॅन फॉलेविंग आहे. सोशल मीडियावर देखील ती अॅक्टीव असते. दिशा पटानीलाल लहान मुलांच्या घोळक्यात सापडल्याने तिला नाकीनऊ आल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला आहे. अनेकदा सिने कलाकारांना चाहत्यांचा असा अनुभव येतो. दिशा पटानीला देखील असाच अनुभव आला. कशीबशी तिने या गराड्यातून आपली सुटका करुन घेतली.

दिशा पटानी आपल्या मित्रांसोबत डिनरसाठी आली होती. यावेळी रस्त्यावरील काही मुलांनी तिला गराडा घातला. या गराड्यातून बाहेर पडताना तिला अगदी नाकीनऊ आले. अशावेळी अनेकदा कलाकारांचे बाऊन्सर्स चाहत्यांना ढकलून दूर करतात. कधी कधी तर कलाकारांचा राग अनावर होऊन ते देखील चिडतात. काहीवेळा कलाकारांनी चाहत्यांना चापटी देखील लगावल्या आहेत. मात्र दिशा पटनीने या सर्व मुलांशी अशी कोणतीच गोष्ट केली नाही.

दिशा पटानी कृष्णा श्रॉफला सोडून आपल्या कारमध्ये बसण्यासाठी जात होती. त्यावेळी मुलांनी तिला गराडा घातला. यावेळी मुलांनी किलबिलाट सुरु केला. काही मुलांनी तिला स्पर्श देखील केला. मात्र दिशाने या मुलांना वाईट वागणूक न देता घोळक्यातून बाहेर पडत ती कारमध्ये बसल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. यावेळी तीचे वॉडीगार्ड देखील तिच्या मदतीला धावून आल्याचे दिसत आहे.

हे सुद्धा वाचा

आज लता दीदींचा वाढदिवस…’या’ मराठी अभिनेत्रीला लता मंगेशकर बनायचंय
मुंबईत ‘जय श्रीराम’ म्हणण्याची जबरदस्ती, मराठी माणसाला परप्रांतीयांकडून मारहाण!
तुम्ही २ हजारांच्या नोटा केव्हा बदलणार? उरलेत केवळ ४८ तास

दिशा पटानी बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. सन 2015 साली लोफर या तेलगू चित्रपटातून तिने सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर 2016 साली प्रदर्शित झालेल्या एम. एस. धोनी चित्रपटाने तिला रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आणले. त्यानंतर तीचे कुंग फु योगा, वेलकम टू न्यू यॉर्क, बागी २, भारत, मलंग बागी ३, एक व्हिलन रिटर्न असे अनेक चित्रपट आले. हिंदीसह तेलगू आणि तमीळ चित्रपटात देखील तीने अभिनय केला आहे. एम. एस धोनी या चित्रपटासाठी तिला आयफा एवॉर्ड, स्क्रीन एवॉर्ड, स्टारडस्ट एवॉर्ड मिळाला होता.

टीम लय भारी

Recent Posts

भाजप मुंबईत अडचणीत, ज्येष्ठ संपादिका राही भिडे यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…

1 hour ago

मोदी सरकारच्या काळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी केवळ देशच सोडला नाही तर देशाचे नागरिकत्वही सोडले – प्रकाश आंबेडकर

मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…

3 hours ago

नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांताने प्रवाशांच्या उड्या

आज नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या ( Godan Express) डब्याखालून अचानक धूर निघाल्याने…

3 hours ago

द ग्रेट इंडियन कपिल शोच्या मीड सीझनचा प्रोमो रिलीज

'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा (The Great Indian Kapil Show's) नवा मीड सीझनचा प्रोमो रिलीज…

4 hours ago

ऐनवेळची धावपळ टाळण्यासाठी मतदान केंद्राची माहिती आधीच घ्या- जिल्हाधिकारी जलज शर्मा

लोकसभा निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्ह्यातील 20 दिंडोरी व 21 नाशिक लोकसभा मतदार संघांसाठी सोमवार,…

5 hours ago

त्र्यंबकेश्वर येथे युवकास जीवे मारण्याचा प्रयत्न; रोकडही लांबवली

पार्किंगच्या जागेच्या कथित वादावरुन १२ जणांनी एकास जीवे (kill) मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १२ जणांवर त्र्यंबकेश्वर…

6 hours ago