30 C
Mumbai
Thursday, November 30, 2023
घरमनोरंजनआज लता दीदींचा वाढदिवस...'या' मराठी अभिनेत्रीला लता मंगेशकर बनायचंय

आज लता दीदींचा वाढदिवस…’या’ मराठी अभिनेत्रीला लता मंगेशकर बनायचंय

भारताची गानकोकिळा स्वरसम्राज्ञ लता मंगेशकर यांचा २८ सप्टेंबर हा जन्मदिवस. दोन वर्षांपूर्वी वृद्धापकाळाने लता दीदींचं निधन झालं. लता दीदींच्या घराण्याशी नातं असलेल्या मराठमोळ्या श्रद्धा कपूरनं त्यांची पडद्यावर भूमिका साकरायची इच्छा व्यक्त केलीये. फिल्मफेअरच्या एक्स (पूर्वीचे ट्विटर) सोशल मीडियावर एका मुलाखतीत श्रद्धानं ही इच्छा व्यक्त केल्याचं सांगण्यात आलंय.


श्रद्धा कपूर ही पंजाबी असली तरीही उत्तम मराठी बोलते. श्रद्धाची आई शिवांगी कोल्हापूर उत्तम गायिका आहेत. श्रद्धाला आईकडूनच बालपणापासून संगीताचं बाळकडू मिळालं. मंगेशकर आणि कोल्हापूरे घराणं एकमेकांचे नातेवाईक असल्यानं श्रद्धानं लहानपणापासूनच लतादीदींचा पाहिलंय. लता दीदी नात्यानं श्रद्धाच्या आजी आहेत. संपूर्ण मंगेशकर घराण्याशी श्रद्धा परिचित आहे. लता दीदींच्या अंत्यविधीला श्रद्धा स्वतः जातीनं हजर होती. लता दीदींच्या मृत्युंनंतर जगभरातून दुःख व्यक्त करण्यात आलं. लता दीदींबाबत श्रद्धाला एका मुलाखती दरम्यान विचारण्यात आलं. त्यावेळी श्रद्धानं तत्काळ लता दीदींची भूमिका साकारण्याची इच्छा व्यक्त केली.

हे ही वाचा 

रणबीर कपूरने वाढदिवसादिवशी शेअर केला नवा लुक; ‘ऍनिमल’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

‘जवान’ची कमाई एक हजार कोटींवर; विकेंडला शाहरुख खान कडून तिकीट दरात सवलत!

वहिदा रेहमान यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

श्रद्धाचा नुकताच ‘तू झूठी में मक्कार’ चित्रपट येऊन गेला. या चित्रपटातील श्रद्धा आणि रणबीरची केमिस्ट्री सर्वांच्याच पसंतीस उतरली. श्रद्धा ‘स्त्री२’ च्या चित्रीकरणात सध्या बिझी आहे. या चित्रपटात ती राजकुमार राव आणि वरुण धवनसोबत झळकणार आहे. तसेच ती सध्या कार्तिक आर्यनसोबत ‘चंदू चेम्पियन’ सिनेमात महत्वाची भूमिका साकारतेय.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी