मनोरंजन

शाहरुखच्या अभिनेत्रीचा जीवघेणा अपघात, जीव वाचला पण…

शाहरुख खानसह ‘स्वदेस’ चित्रपटात नायिकेची भूमिका करणाऱ्या गायत्री जोशी रस्ते अपघातात जबर जखमी झाली आहे. या घटनेत गायत्री आणि तिचा पती थोडक्यात बचावले. ही घटना इटलीमध्ये घडली. इटलीमध्ये सार्डिनिया सुपरकार टूर रॅली गायत्री आणि तिच्या पतीने सहभाग घेतला होता. या रॅलीतील कार ड्राईव्हदरम्यान दोन वाहने एकमेकांना आदळली, त्यात दोन जणांचा मृत्यू झाला. स्वित्झर्लंडमधील एका वृद्ध जोडप्याचा या रस्ते अपघातात मृत्यू झाला.

सार्डिनिया सुपरकार टूर दरम्यान महागड्या आकर्षक वाहनांची इटालियन रस्त्यांवर परेड केली जाते. सार्डिनिया सुपरकार टूर रॅलीत गायत्री यांच्या लॅम्बोर्गिनी गाडीला फेरारी या गाडीने जोरदार धडक दिली. या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत दोन्ही कार कॅम्पर व्हॅनला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्नात फेरारी लॅम्बोर्गिनीला धडकली.

या आगीत भरधाव वेगात असलेल्या फेरारीमध्ये असलेले स्विस जोडपे जागीच ठार झाले. गायत्री आणि तिचा पती किरकोळ जखमी होऊन बचावले. कॅम्परव्हॅनमधील जोडपेही वाचले. मी आणि पती विकास ओबेरॉय सुखरूप असल्याचे खुद्द गायत्रीनेच एका डिजिटल वाहिनीला सांगितले.

हे ही वाचा 

भेटा ‘मिशन राणीगंज’ चित्रपटातील खऱ्याखुऱ्या जसवंत सिंग गिल यांना!

इटलीत दीपिका आणि हृतिक एकत्र? फोटोतून आलं सत्य समोर…

ऐश्वर्याचा पॅरिस फॅशन वीकमध्ये वॉक, नेटीझन्सकडून झाली ट्रोल…

गायत्री ही चित्रपटात येण्यापूर्वी यशस्वी मॉडेल म्हणून नावारूपास आली. २००० साली तीने मिस इंडिया इंटरनॅशनलचा किताब जिंकला. २००४ साली ‘स्‍वदेस’ चित्रपटातून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. आशुतोष गोवारीकर यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘स्वदेस’ चित्रपटात गायत्रीने गीता नावाचे पात्र साकारले. पदार्पण चित्रपटासाठी अनेक पुरस्कार जिंकूनही तिने लवकरच इंडस्ट्री सोडली.

२००५ साली उद्योगपती विकास ओबेरॉयसोबत लग्न केले. या जोडप्याला दोन मुले आहेत. चार वर्षांपूर्वी क्रेडिट कार्डच्या फसवणुकीत चाळीस हजार रुपये गमावल्याबद्दल गायत्री चर्चेत आली होती. इंडस्ट्रीत गायत्री आणि तिचे पती विकास ओबेरॉय हृतिक रोशनचे चांगले मित्र आहेत. त्यांच्यासोबत होणाऱ्या गेटटुगेदरमध्ये दोन्ही पतीपत्नी बरेचदा दिसून येतात.

टीम लय भारी

Recent Posts

मनुका खाण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या

निरोगी राहण्यासाठी आरोग्य तज्ज्ञ सुका मेवा खाण्याचा सल्ला देतात. मनुका हे देखील एक ड्राय फ्रूट…

26 mins ago

Dhangar Resevation | नरहरी झिरवाळ यांना धनगर उपोषणकर्त्यांनी ठणकावले

पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Dhangar Reservation | Narahari Jirwal…

3 hours ago

उभे राहून पाणी पिल्याने होणार ‘हे’ नुकसान, जाणून घ्या

आपल्या शरीरासाठी पाणी फार महत्वाचे आहे. निरोगी राहण्यासाठी शरीरात पाणी असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे…

3 hours ago

PCOD असलेल्या महिलांनी नक्की करा स्ट्रेंथ ट्रेनिंग एक्सरसाइज

PCOD ही हार्मोनल असंतुलनाशी संबंधित समस्या आहे. यामध्ये स्त्रीच्या अंडाशयात सिस्ट तयार होतात. यामुळे मासिक…

4 hours ago

Devendra Fadanvis | देवेंद्र फडणविसांनी धनगरांना फसविले, आम्ही भाजपला विधानसभा निवडणुकीत शाप देवू |

पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Devendra Fadnavis cheated Dhangars) आरक्षण…

4 hours ago

पावसाळ्यात या 5 प्रकारच्या तेलांनी करा केसांना मसाज, केसगळतीपासून मिळेल आराम

पावसाळ्यात केस तुटण्याची आणि गळण्याची समस्या वाढते. वास्तविक या काळात पावसात भिजल्यामुळे केसांची मुळे कमकुवत…

7 hours ago