31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमनोरंजनभेटा 'मिशन राणीगंज' चित्रपटातील खऱ्याखुऱ्या जसवंत सिंग गिल यांना!

भेटा ‘मिशन राणीगंज’ चित्रपटातील खऱ्याखुऱ्या जसवंत सिंग गिल यांना!

अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री परिणीती चोप्रा यांचा ‘मिशन राणीगंज’ चित्रपट येत्या 6 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात अक्षय कुमार अभियंता जसवंत सिंग गिलची भूमिका साकारणार आहे. मिशन मंगल आणि केसरीनंतर अभिनेता अक्षय कुमार त्याच्या आगामी चित्रपट, मिशन राणीगंज: द ग्रेट भारत रेस्क्यूमध्ये एका नवीन मिशनवर आहे. विपुल के रावल लिखित आणि टिनू सुरेश देसाई दिग्दर्शित या चित्रपटात तो खाण तज्ञ जसवंत सिंग गिल यांची भूमिका साकारणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये गिलने पश्चिम बंगालमधील राणीगंज येथील पूरग्रस्त खाणीतून ६५ खाण कामगारांना वाचवण्याच्या सत्य कथेची झलक दाखवली आहे. १९८९ साली पश्चिम बंगाल राज्यात राणीगंज कोळसा खाणीत झालेल्या अपघातात जसवंत सिंग गिल यांच्या धैर्यामुळे ६५ कामगारांचे प्राण वाचले होते.

जसवंत सिंग गिल कोण होते?

१९४० साली अमृतसर येथे जन्मलेल्या जसवंत सिंग गिल यांनी खालसा शाळेत शिक्षण पूर्ण केले पुढील शिक्षणासाठी
त्यांनी खालसा महाविद्यालयात प्रवेश घेतला. तेथे जसवंत सिंग गिल यांनी बीएससी (नॉन-मेडिकल) मध्ये शिक्षण पूर्ण केले. १९७३ मध्ये त्यांनी धनबाद येथून इंडियन स्कूल ऑफ माईन्समध्ये बीएससी (ऑनर्स) चे शिक्षण घेतले. त्यांच्या कारकिर्दीत पश्चिम बंगाल राज्यातील राणीगंज येथील महाबीर कोलियरी येथील पूरग्रस्त कोळसा खाणीत अडकलेल्या ६५ खाण कामगारांच्या बचाव कार्यातील काम अविस्मरणीय आणि प्रशंसनीय ठरले.


‘त्या’ दिवशी नेमके काय घडले?

१३ नोव्हेंबर १९८९ रोजी स्फोटांद्वारे कोळसा उत्खनन करण्यासाठी ३२०-फूट-खोल खाणीत रात्रीच्या शिफ्टमध्ये २३२ कामगार काम करत होते. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास अचानक पाणी येऊ लागले. खाणीला पूर आला. खड्ड्यातील दोन लिफ्टजवळ असलेल्या १६१ खाण कामगारांना ताबडतोब वाचवता आले, परंतु त्यापैकी ७१ कामगार दूर असल्याने ते पाण्यामुळे लिफ्टपर्यंत पोहोचू शकले नाहीत. सुदैवाने दूरध्वनी कनेक्शन होते. ६५ खाण कामगारांनी खड्ड्याच्या उंच भागात आश्रय घेतल्याचा संदेश फोनच्या माध्यमातून पाठवला होता, परंतु त्यापैकी सहा बेपत्ता झाले होते.

हे ही वाचा 

इटलीत दीपिका आणि हृतिक एकत्र? फोटोतून आलं सत्य समोर…

ऐश्वर्याचा पॅरिस फॅशन वीकमध्ये वॉक, नेटीझन्सकडून झाली ट्रोल…

सलमान, शाहरुखला सोबत घेऊन हृतिकचा ‘वॉर 2’ येतोय…

या अडकलेल्या कामगारांना बाहेर सुखरूप बाहेर आणण्याची जबाबदारी जसवंत सिंग यांनी पेलली. जसवंत सिंग गिल यांनी स्टील आणि लोखंडाची केप्सूलच्या आकाराची साधारणत साडेतीन फुटाची उंच भांडे बनवले. यात आत कोळसा खाणीत अडकलेल्या माणसांना बसवून खाणीबाहेर सुखरूप काढता येत होते. गिल यांनी केप्सूलच्या आकाराचे भांडे जमिनीखाली अडकलेल्या कामगारांसाठी खाली उतरवले. गिल स्वतः अडकलेल्या कामगारांपाशी पोहोचले. एकामागोमाग सर्व कामगारांची सुटका झाल्यानंतर गील कोळसा खाणीबाहेर आहे. मात्र या दुर्घटननेत सहा कामगारांचा मृत्यू झाला.


एकामागून एक ६५ खाण कामगारांना बाहेर काढण्यासाठी मला सहा तास लागले आणि शेवटी, जेव्हा मी कॅप्सूलमधून बाहेर आलो तेव्हा लोक आनंदाने वेडे झाले होते, अशी प्रतिक्रिया गिल यांनी दिली. या घटनेपासून जसवंत सिंग गिल जगभरात ‘कॅप्सूल मॅन’ म्हणून ओळखले जाऊ लागले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी