31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमनोरंजनइटलीत दीपिका आणि हृतिक एकत्र? फोटोतून आलं सत्य समोर...

इटलीत दीपिका आणि हृतिक एकत्र? फोटोतून आलं सत्य समोर…

हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोण यांचा बहूचर्चित फायटर सिनेमातील प्रदेशातील शूटिंगचा फोटो सोशल मीडियावर सध्या ट्रेंड होत आहे. इटली येथे गेल्या दहा दिवसांपासून फायटर सिनेमाचं शूटिंग सुरु आहे. गाण्याच्या शूटिंगदरम्यान सर्व क्रू सदस्य एकत्रित खुर्चीत बसून आराम फर्मावत असल्याचा फोटो सध्या धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट येत्या २५ जानेवारी रोजी प्रदर्शित होत आहे.

हृतिक आणि दीपिका पादुकोण आगामी अ‍ॅक्शन चित्रपटासाठी दोन गाण्यांच्या चित्रीकरणासाठी इटलीमध्ये आहेत. भारतीय वायू सैन्यातील दोन पायलटांच्या जीवनावर हा सिनेमा आधारित आहे. इटलीत शूटिंग ब्रेकदरम्यान घेतलेल्या फोटोत दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद, त्याची पत्नी ममता आनंद, नृत्यदिग्दर्शक बॉस्को मार्टिस, हृतिक आणि दीपिका दिसून येत आहेत. हा फोटोसेल्फी खुद्द हृतिकने घेतला आहे. हृतिकने क्लिक केलेल्या सेल्फीमध्ये दीपिका त्याच्या शेजारी बसली आहे. एका मोठ्या घराबाहेर किंवा हॉटेलबाहेर कॉफीचा आस्वाद घेताना हृतिकने सेल्फी काढला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Arfeen Khan (@arfeen.khan)


हा फोटो अभिनेता अरफीन खानने इंस्टाग्रामवर फोटो शेअर केला. फोटोत सिद्धार्थच्या शेजारी बसलेल्या अरफीनने फोटोला कॅप्शन देताना म्हटले, “फायटर इन अ‍ॅक्शन… अप्रतिम लोक, अप्रतिम शूट” फोटोत त्याने हृतिक, दीपिका आणि बॉस्कोलाही टॅग केले.

हे ही वाचा 

ऐश्वर्याचा पॅरिस फॅशन वीकमध्ये वॉक, नेटीझन्सकडून झाली ट्रोल…

सलमान, शाहरुखला सोबत घेऊन हृतिकचा ‘वॉर 2’ येतोय…

कंगना रनौतची अबू सालेम सोबत मैत्री?

गेल्या वर्षभरापासून सिनेमाचे शूटिंग सुरु आहे. चित्रपटाचे शूटिंग गेल्या नोव्हेंबर महिन्यात सुरू झाले. याआधी काश्मीरमध्ये ‘फायटर’चे शूटिंग पार पडले. त्यानंतर इटलीत टीम दोन गाण्यांच्या शूटिंगसाठी दाखल झाली.वास्तविक जीवनातील भारतीय हवाई दलाच्या कॅडेट्सनी या चित्रपटासाठी काम केले आहे. विशाल-शेखर या जोडीने संगीतबद्ध केलेल्या चित्रपटाच्या साउंडट्रॅक अल्बममध्ये पाच गाली लयबद्ध केली आहेत.

या चित्रपटात अनिल कपूर, करणं सिंग ग्रोवर, अक्षय ओबेरॉय, संजीदा शेख सहकलाकाराच्या भूमिकेत आहेत. ‘फाइटर’ आधी यावर्षी ३ सप्टेंबरला प्रदर्शित होणार होता. परंतु अनेक कारणामुळे विलंबांमुळे आता ‘फाइटर’ २५ जानेवारी २०२४ रोजी प्रजासत्ताक दिनाच्या सुट्टीच्या दिवशी प्रदर्शित होईल.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी