32 C
Mumbai
Sunday, November 26, 2023
घरमनोरंजनऐश्वर्याचा पॅरिस फॅशन वीकमध्ये वॉक, नेटीझन्सकडून झाली ट्रोल...

ऐश्वर्याचा पॅरिस फॅशन वीकमध्ये वॉक, नेटीझन्सकडून झाली ट्रोल…

सोमवारी पॅरिस येथे पार पडलेल्या पॅरिस फॅशन वीकमध्ये माजी विश्वसुंदरी ऐश्वर्या राय बच्चन तिच्या लूकमुळे क्रूरपणे ट्रोल झाली. तर दुसरीकडे तिची आणि पती अभिषेक बच्चनची भाची नव्या नंदाने पॅरिस फॅशन वीकमध्ये पहिल्यांदाच वॉक केला. नव्याचा ड्रेस आणि वॉकला सर्व स्तरातून प्रशंसा मिळाली तर दुसरीकडे मामी ऐश्वर्या राय बच्चन मात्र नेटीझन्सकडून ट्रोल झाली. तिच्यामेकअपपासून ते वाढत्या वजनापर्यंत आता फॅशन सेन्स वाईट झाल्याची प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटली. मामी-भाचीमध्ये भाची सरस ठरल्याचे सर्वांनीच प्रमाणपत्र दिले.

ऐश्वर्या गेल्याच आठवड्यात मुलगी आराध्यासोबत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर दिसून आली होती. त्याचवेळी ऐश्वर्या पॅरिसला जात असल्याची बातमी फुटली. सोमवारी सायंकाळी उशिराने इंटरनेटवर पॅरिस फॅशन वीकचा रॅम्प वॉक प्रदर्शित झाला. ऐश्वर्या संपूर्ण शरीरभर केप गोल्डन चमकणारा गाऊन परिधान करताना दिसली. तिचा मेकअपही थोडा भडक होता.


ऐश्वर्याच्या एका फॅन पेजने तिच्या रॅम्प वॉकचा हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. काही मिनिटातच इंटरनेटवर सोशल मीडिया वापरकर्त्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. नेटिझन्स तिच्यावर ‘वजन वाढवण्याचा’ आणि ‘बोटॉक्स सर्जरी’ च्या मुद्द्यावर तिला ट्रॉल करू लागले. वाढत्या वजनाला सजेसे कपडे नाही आहेत अशी प्रतिक्रिया एका सोशल मीडिया वापरकर्त्याने दिली. तू जगातील सर्वात सुंदर स्त्री आहेस. तुला सुंदर दिसण्यासाठी बॉटटॉक्स शस्त्रक्रियेची आवश्यकता नाही, असेही बरेचजण म्हणाले.

हे ही वाचा 

सलमान, शाहरुखला सोबत घेऊन हृतिकचा ‘वॉर 2’ येतोय…

कंगनाची आकाशाला गवसणी… बहुचर्चित ‘तेजस’ सिनेमाचा टिझर प्रदर्शित

कंगना रनौतची अबू सालेम सोबत मैत्री?

अभिषेक आणि ऐश्वर्याची भाची नव्या काही मिनिटांनी रेड कार्पेटवर वॉक करताना दिसली. लाल रंगाचा मिनी ड्रेस नव्यानं सहज वॉक करत पेलला. तिच्यासोबत लॉरीयल या सौंदर्यप्रसाधनाचे ब्रँड एम्बेसीडर केंडल जेनर, एले फॅनिंग आणि इवा लॉन्गोरियादेखील उपस्थित होते. यावेळी नव्याची आई आणि ऐश्वर्याची नणंद श्वेता बच्चन आणि आजी जया बच्चनदेखील उपस्थित होत्या. आपल्या मुलीचा आंतरराष्ट्रीय पातळीवरील फॅशन वॉक श्वेतानं मोबाईल व्हिडिओ कॅमेऱ्यात टिपला.

ऐश्वर्या सध्या फारशी चित्रपटात दिसून येत नाही. तीने पूर्णवेळ मुलगी आराध्याच्या संगोपनात दिला आहे. तर नव्यानं शिकण पूर्ण केल्यानंतर वडिलांचा बिझनेस सांभाळायला घेतला आहे. ऐश्वर्या यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीला तामिळ चित्रपट ‘पोंनियीन सिल्वन२’ दिसून आली. बऱ्याच वर्षांनी ऐश्वर्याने तामिळ चित्रपटात पूनरागमन केले. या चित्रपटात ऐश्वर्या नकारात्मक भूमिकेत दिसून आली. ऐश्वर्याच्या भूमिकेची सर्वांनीच प्रशंसा केली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी