मनोरंजन

Katrina Kaif : कतरिना कैफसोबतच्या नव्या सिनेमाबाबत अली जफरने दिली खास अपडेट

अली अब्बास जफर सध्या आपल्या मुलीच्या जन्मामुळे खूश आहे. कौटुंबिक जबाबदाऱ्यांसोबतच तो त्याच्या चित्रपट प्रकल्पांवरही लक्ष केंद्रित करत आहे. 2020 मध्ये त्यानी कतरिना कैफवर सुपरहिरो चित्रपट बनवण्याची घोषणा केली होती, परंतु अद्याप या प्रकल्पावर काम सुरू झालेले नाही. आता अली अब्बास म्हणतात की हा चित्रपट लवकरच प्रदर्शित केला जाईल. अली अब्बास जफरला जेव्हा कतरिना कैफसोबतच्या सुपरहिरो चित्रपटाची माहिती देण्यात आली, तेव्हा चाहत्यांमध्ये खळबळ उडाली होती. पण कालांतराने अलीचे इतर प्रोजेक्ट्स समोर आले पण सुपरहिरो चित्रपटाशी संबंधित कोणतीही माहिती समोर आली नाही.

हे सुद्धा करा

World Health Day : हृदय निरोगी ठेवायचे असेल तर ‘या’ गोष्टी नक्की करा

America : अमेरिकेतल्या ‘या’ भागात झाली बत्तीगुल

Vinayak Raut : ‘भाजपची साथ सोडा असा एकनाथ शिंदेंनीच आग्रह धरला होता’

कोरोना आणि नंतर कतरिनाचे लग्न
आता अली अब्बास जफरने याबाबत मौन सोडले आहे. अली म्हणतो की हा चित्रपट बंद झालेला नाही. हा चित्रपट नेटफ्लिक्ससोबत बनवण्याची माझी पूर्ण योजना आहे. कोरोनामुळे हा प्रकल्प थांबवावा लागला. यानंतर कतरिना आणि मी आमची इतर कामं पूर्ण करू लागलो. त्यानंतर कतरिनाने लग्न केले आणि ती तिच्या नवीन आयुष्याचा आनंद घेत आहे. माझ्या पुढच्या ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ या चित्रपटानंतर मी या प्रोजेक्टवर काम करणार आहे. ‘बडे मियाँ छोटे मियाँ’मध्ये अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ मुख्य भूमिकेत आहेत. त्यामुळे आता लवकरच या चित्रपटाची शूटींग सुरू होईल आणि प्रेक्षकांची उत्सुकता संपुष्टात येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

कतरिना कैफ लवकरच ‘टायगर 3’ या चित्रपटात दिसणार आहे. पती विकी कौशलसोबत चित्रपट करण्याचीही चर्चा आहे. दोघांनाही चित्रपटाच्या ऑफर आहेत पण सध्या तरी त्यांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही. गेल्या वर्षी ९ डिसेंबरला दोघांनी सवाई माधोपूरमध्ये लग्न केले होते. अलीकडेच करण जोहरने सांगितले की, कतरिना आणि विकीने त्याला लग्नाचे आमंत्रण न दिल्याने मला खूप लाज वाटली. करणने सांगितले की, लोकांना वाटले की आमच्या नात्यात काही अडचण आहे, त्यामुळे मला बोलावण्यात आले नाही. वास्तविक, कतरिना आणि विकीने त्यांचे लग्न खाजगी ठेवले होते आणि लग्नासाठी फार कमी लोकांना आमंत्रित केले होते.

प्रणव ढमाले

Recent Posts

शेअर ट्रेडिंगमध्ये नफा मिळवून देण्याच्या आमिषाने साडेसतरा लाखांची फसवणूक

शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करून जादा नफा  कमावण्याचे आमिष दाखवून अज्ञात व्हॉट्सअ‍ॅपधारक इसमाने एका जणाची १७…

14 hours ago

10 हजारांची लाच घेताना उपशिक्षकासह मुख्याध्यापक एसीबीच्या जाळ्यात

16 हजारांची लाच (bribe) मागून पहिला हप्ता म्हणून 10 हजारांची लाच घेताना उप शिक्षकासह मुख्याध्यापकास…

15 hours ago

बीसीसीआय च्या, इंटर एन सी ए स्पर्धेसाठी साहिल पारखची इंडिया बी संघात निवड

नाशिक जिल्हा क्रिकेट (Cricket) असोसिएशनचा युवा खेळाडू आक्रमक डावखुरा सलामीवीर साहिल पारख (Sahil Parakh) याची…

15 hours ago

नाशिक जिल्हा न्यायालयातील सहायक अधीक्षक ‘एसीबी’च्या जाळ्यात

दिवाणी दाव्याचे प्रकरण दाखल केल्यावर कोर्ट फी स्टॅम्पची रक्कम काढून देण्यासाठी तक्रारदाराकडून पाचशे रुपयांची लाच…

15 hours ago

बिल्डरपुत्रास जीवे मारण्याची धमकी; सराईताने मागितली ‘इतक्या’ लाखांची खंडणी

भूखंड  विक्रीचा तगादा लावणाऱ्या सराईत गुन्हेगाराने बिल्डरकडे वीस लाख रुपयांची खंडणी (ransom) मागितल्याचा प्रकार वसंत…

15 hours ago

भाजपा – एनडीए 400 जागांचा टप्पा पार करणार; पंतप्रधान नरेंद्र मोदी

लोकसभा निवडणुकीत एनडीए 400 जागांचा टप्पा पार (NDA to cross 400-seat mark) करणार आणि ओडिशामध्ये…

16 hours ago