29 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
HomeराजकीयVinayak Raut : 'भाजपची साथ सोडा असा एकनाथ शिंदेंनीच आग्रह धरला होता'

Vinayak Raut : ‘भाजपची साथ सोडा असा एकनाथ शिंदेंनीच आग्रह धरला होता’

आरोप - प्रत्यारोपांच्या खेळीत काॅंग्रेसने उडी घेतली असून त्याच्या जोडीला शिवसेना सुद्धा आपला बाण रोखून असल्याचे दिसून येत आहे. भाजपची साथ सोडा असा एकनाथ शिंदेंनीच आग्रह धरला होता असा थेट आरोप करत शिवसेनेने मुख्यमंत्री शिंदेंना फटकारले आहे. 

महाविकास आघाडीच्या अस्तित्वावर नाराजी व्यक्त करत काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसमुळे शिवसेनेची कुचंबणा होते असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतच बंडाचे रणशिंग फुंंकले आणि थेट भाजपशीच हातमिळवणी करत सत्तेत मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाले. राज्यात नवी सत्ता स्थापन केली असली तरीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी आणि काॅंग्रेसवरचे आरोप चालूच ठेवले आणि भाजपच कशी चांगली असा जनसामान्यांना पटवून देण्याचा प्रयत्न केला. या आरोप – प्रत्यारोपांच्या खेळीत काॅंग्रेसने आता उडी घेतली असून त्याच्या जोडीला शिवसेना सुद्धा आपला बाण रोखून असल्याचे दिसून येत आहे. भाजपची साथ सोडा असा एकनाथ शिंदेंनीच आग्रह धरला होता असा थेट आरोप करत शिवसेनेने मुख्यमंत्री शिंदेंना फटकारले आहे.

शिवसेना नेते विनायक राऊत यांनी गुरवारी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. माध्यमांशी बोलताना राऊत यांनी 2014 सालचा राजकीय घटनापटच उलगडून सांगितला. विनायक राऊत म्हणाले, एकनाथ शिंदे यांनीच भाजपची साथ सोडा, असा आग्रह धरला होता. मी त्यांच्या मंत्रिमंडळात राहू शकत नाही, असे त्यांनी म्हटले होते असे म्हणून राऊत यांनी एकनाथ शिंदे यांची त्यावेळची नेमकी भूमिका काय होती हेच उलगडून सांगितले.

हे सुद्धा वाचा…

Alia Bhatt : ‘माझे नाव घेणे थांबवा’ आलियाने केली करण जोहरला विनवणी

CDS : भारताच्या ‍संरक्षणदल प्रमुख पदी अन‍िल चौहान यांची नियुक्ती

Rohit Sharma Fan : कर्णधार रोहितच्या फॅन्सची बातच न्यारी; चालू सामन्यात चाहता मैदानात शिरला अन्…

विनायक राऊत पुढे म्हणाले, त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात खूप आकांडतांडव घातले होते. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची समजूत काढली होती. भाजपचा त्रास कसा असतो, हे उघडपणे सांगणारे तेव्हा एकनाथ शिंदे हेच होते. पण आता ते भाजपच्या इतक्या जवळ कसे गेले, याचे उत्तर फक्त सक्तवसुली संचलनालयाचे संचालकच सांगू शकतात असे म्हणून सद्यस्थितील सत्तालालसेच्या गांभीर्याकडे लक्ष वेधून घेत त्यांनी एकनाथ शिंदे यांनी मिश्किल टोला लगावला आहे.

दरम्यान, विनायक राऊत यांच्या या विधानांनंतर एकनाथ शिंदे किंवा शिंदे गटाकडून नेमकी कोणती प्रतिक्रिया येणार हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे. राऊतांनी माध्यमांशी संवाद साधण्याआधी काॅंग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी सुद्धा एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल करीत गौप्यस्फोट केला होता. यावेळी बोलताना अशोक चव्हाण म्हणाले की, 2014 सालीच शिवसेना भाजपला कंटाळली होती त्यामुळे युतीचा प्रस्ताव घेऊन काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसकडे आली होती. जे शिवसेना शिष्टमंडळ चव्हाणांच्या भेटीस आले होते त्यामध्ये स्वतः एकनाथ शिंदे सुद्धा होते, त्यावेळी आमच्या पक्षातर्फे तुमच्या प्रस्तावाचा विचार करू असे सांगण्यात आले होते, त्यामुळे बंडामागे काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीचे कारण सांगणे तथ्यहीन असल्याचे म्हटले होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी