मनोरंजन

मराठी सिनेसृष्टीतील ‘दगडू’ लवकरच त्याच्या ‘प्राजु’शी बांधणार लगीनगाठ, खास पोस्ट करत सांगितली लग्नाची तारीख

दिवाळीनंतर सगळ्यांनाच वेध लागतात ते म्हणजे लग्नसराईचे. काही महिन्यांच्या थांब्यांनंतर पुन्हा एकदा लग्नांना दणक्यात सुरुवात होते. सध्या मनोरंजनविश्वात देखील लग्नांचे वारे वाहत आहे. अनेक मोठे कलाकार लग्नबंधनात अडकताना दिसत असून काही लवकरच अडकणार आहेत. मराठी सिनेसृष्टीत तर एकापाठोपाठ एक लग्नाच्या बातम्या येत आहेत. काहींनी एकदम जगजाहीर करत लग्न केले तर काहींनी लग्न केल्यानंतर जाहीर करत सगळ्यांना सुखद धक्का दिला. आता लवकरच मराठी सिनेमाजगतातील एक लोकप्रिय अभिनेता बोहल्यावर चढण्यासाठी सज्ज झाला आहे. सगळ्यांचा लाडका ‘दगडू’ अर्थात प्रथमेश परब (Prathmesh Parab) लवकरच त्याची प्रियसी असलेल्या क्षितिजा घोसाळकरसोबत (Kshitija ghosalkar) लग्न करणार आहे. सोशल मीडियावर नुकतेच त्याने त्याच्या केळवणाचे फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे.

प्रथमेशने काही महिन्यांपूर्वीच तो क्षितिजासोबत नात्यात असल्याची कबुली सोशल मीडियावरून दिली होती. त्यानंतर त्यांच्या लग्नाबद्दल माध्यमांमध्ये अनेक बातम्या येत होत्या. मात्र आता खुद्द प्रथमेशने त्याच्या केळवणाचे फोटो शेअर करत ते लवकरच लग्न करणार असल्याचे सांगितले आहे. पण इथे देखील एक ट्विस्ट आहे. प्रथमेशने ते नक्की कोणत्या तारखेला आणि कुठे लग्न करणार आहे, हे न सांगता एक हिंट दिली आहे.

प्रथमेशने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून काही पोहोतो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. यातल्या एका व्हिडिओमध्ये प्रथमेश आणि क्षितिजा केळवणासाठी घरात एकत्र प्रवेश करतात आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करतात. फुलांच्या पायघड्यांवरून चालत येत प्रथमेश आणि क्षितिजा जेवायला बसतात. घराला खूपच छान सजवलेले दिसत असून, त्या दोघांचेही घरातील सदस्य या केळवणासाठी उपस्थित असल्याचे दिसत आहे. सोबतच घरातील सर्व सदस्यांचा जोरदार डान्स भावी वरवधुचा रोमॅंटिक डान्स देखील यात आपल्याला दिसून येतो.

हे सर्व प्रथमेशने शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले, “जेव्हा केळवणाला तुमच्यापेक्षा तुमचं कुटुंब जास्त उत्साहित असतं,” सोबतच त्याने त्याच्या लग्नाच्या तारखेबद्दल हिंट देताना लिहिले, “#pratija चं ठरलंय हा! बाकी तारीख लवकरच कळवतो. (PS- तारीख खूपच Special आहे ! Hint caption मध्येच आहे. Comment मध्ये guess करा.)” आता त्याच्या या पोस्टवर त्याचे फॅन्स तारीख ओळखत कमेंट्स करताना दिसून येत आहे. अनेकांनी १४ फेब्रुवारी अर्थात व्हॅलेंटाइन डे ला ते लग्न करणार असल्याचे सांगितले आहे. आता नक्की ते लग्न कधी करतात ते पाहणे नक्कीच असूक्त्याचे असणार आहे.

हे ही वाचा

‘पोलिसवाले इतकं मारा की गाxxxची हड्डी तुटली पायजे, कुत्र्यासारखं मारा’

श्रीदेवी प्रसन्न चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, बोल्ड अभिनेत्री सई ताम्हणकर आणि सिद्धार्थ चांदेकरची केमिस्ट्री

‘या’ अभिनेत्रीची होणार झी मराठीच्या मालिकेत धमाकेदार एन्ट्री, प्रोमो झाले व्हायरल

तत्पूर्वी प्रथमेश हा मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय आणि यशस्वी अभिनेता असून, त्याने अनेक उत्तमोत्तम भूमिका साकारल्या आहेत. टाइमपास त्याची ‘दगडू’ ही भूमिका विशेष गाजली. मराठीसोबतच तो काही हिंदी चित्रपटांमध्ये देखील दिसला आहे. लवकरच त्याचा डिलिव्हरी बॉय हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

टीम लय भारी

Recent Posts

भुसावळ दुहेरी हत्याकांड : तिघांना सात दिवसांची पोलीस कोठडी

भुसावळ येथील भाजपचे माजी नगरसेवक संतोष बारसे, सामाजिक कार्यकर्ते सुनील राखुंडे यांच्या हत्याप्रकरणी (double murder)…

6 hours ago

फिक्की व महाराष्ट्र चेंबरतर्फे शुक्रवार दि. ७ जून २०२४ रोजी पश्चिम आणि मध्य आफ्रिकेतील व्यवसायाच्या संधींवर चर्चासत्र

फिक्की व महाराष्ट्र चेंबरच्या पाठिंब्याने ARISE स्पेशल इकॉनॉमिक झोन (SEZ) च्या माध्यमातून पश्चिम आणि मध्य…

6 hours ago

कच्चं आलं खाणं आरोग्यासाठी फायदेशीर

भारतात आल्याचा चहा खूप फेमस आहे. आलं (raw ginger) भाजीत सुद्धा टाकलं जातं. तुम्हाला माहित…

6 hours ago

आरोग्य विज्ञान विद्यापीठात जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त शपथ

जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त (World Anti-Tobacco Day) महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी यांनी…

7 hours ago

‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ मराठी चित्रपट,संत मुक्ताबाईचा जीवनपट येणार रूपेरी पडद्यावर

महाराष्ट्राच्या आध्यात्मिक पायाभरणीत वारकरी संप्रदायाचा फार मोलाचा आणि महत्त्वाचा वाटा आहे. वारकरी संप्रदायात संत निवृत्तीनाथ,…

9 hours ago

पंतप्रधान पदासाठी माझी पसंती राहुल गांधी; मल्लिकार्जुन खरगे

देशामध्ये लोकसभा निवडणूक आज संपणार आहे, आज शेवटच्या टप्प्याचे मतदान पार पडत आहे. तर बुधवारी…

9 hours ago