30 C
Mumbai
Friday, March 1, 2024
Homeमनोरंजनश्रीदेवी प्रसन्न चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, बोल्ड अभिनेत्री सई ताम्हणकर आणि सिद्धार्थ...

श्रीदेवी प्रसन्न चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, बोल्ड अभिनेत्री सई ताम्हणकर आणि सिद्धार्थ चांदेकरची केमिस्ट्री

मराठी चित्रपट आता सातासमुद्रापलिकडे जात आपल्या कलाकृतीने डंका वाजवत आहे. आपला अटकेपार झेंडा मराठी चित्रपटांनी रोवला आहे. चित्रपटांचा विषय आणि आशय कसा असावा हे केवळ मराठी मनोरंजन विश्वातून शिकायला मिळते. अशातच आता श्रीदेवी प्रसन्न (Sridei prasanna) हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटामध्ये बिंधास्त आणि बोल्ड अभिनेत्री सई ताम्हणकर (saie Tamhankar) आणि मराठी हॅंडसम अभिनेता सिद्धार्थ चांदेकर (siddharth chandekar) हे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटाचा आशय हा सध्याच्या तरूणांसाठी तसेच लग्नाळू व्यक्तींसाठी फारच महत्त्वाचा आहे. लग्न आणि त्याबाबद सर्व प्रश्नांची उत्तरं या चित्रपटामध्ये देण्यात आली आहे.

टीप्स मराठी प्रस्तुत आणि कुमार तौरानी निर्मित श्रीदेवी प्रसन्न चित्रपट म्हणजे लग्नासाठी योग्य जोडीदार शोधणाऱ्या श्रीदेवी-प्रसन्न या दोघांची कहाणी आहे. टीप्स मराठीचा हा पहिला वहिला मराठी चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये लग्न का करावं? कोणाशी करावं? या प्रश्नांची उत्तरं देण्यात आलं आहे. या चित्रपटाच्या स्टरकास्टबद्दल बोलायचं झालं तर सई ताम्हणकर ही नेहमीच आपल्या अभिनयाने आपल्या कामगिरीने प्रेक्षकांना घायाळ करते. तर सिद्धार्थ चांदेकर हा गुड लुकिंग आणि चॉकलेट बॉय म्हणून मनोरंजन क्षेत्रामध्ये त्याची ओळख आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन हे विशाल विमल मोढवे यांनी केलं आहे.

हे ही वाचा

मनोज जरांगेंच्या कुटुंबात कुणबी प्रमाणपत्र नाही

शाहरूख खानने २०२३ मध्ये केला ‘हा’ विक्रम

सांगलीमध्ये विद्यार्थीनीसोबत शिक्षकाचे अश्लील चाळे, मनसे कार्यकर्त्यांनी शिक्षकालाच शिकवला धडा

या दिवशी होणार सिनेमा रिलीज

टीप्स मराठीने या सिनेमाची प्रस्तुती असून चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आणि यातील सई-सिद्धार्थची दिसून आलेली केमिस्ट्री आणि संवादांची शैली पाहता प्रेक्षकांना आपलासा वाटणार चित्रपट आहे. हा चित्रपट आता प्रेक्षकांच्या भेटीला कधी येईल याची आता तारीख समोर आली आहे. २ फेब्रुवारी या दिवशी हा सिनेमा राज्यभर प्रदर्शित होणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tips Films (@tipsfilmsofficial)


सई ताम्हणकर आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्यासह पल्लवी परांजपे, पूजा वानखेडे, सिद्धार्थ महाशब्दे, जियांश पराडे, आकांक्षा गाडे, रमाकांत डायमा, शुभांगी गोखले, पाहुल पेठे, सुलभा आर्या, सिद्धार्थ बोडके, रसिका सुनील, संजय मोने, वंदना सरदेसाई, आकांक्षा गाडे, रमाकांत डायमा, शुभांगी गोखले हे काही सहकलाकार या चित्रपटामध्ये दिसणार आहेत.

कथानकाबद्दल थोडक्यात

या चित्रपटामध्ये सध्याच्या घडीला ऑनलाईन विवाहाच्या मॅट्रिमोनी या अॅपवरून दोन जोडपं एकमेकांना ऑनलाईन मॅट्रिमोनीवरून भेटतात. त्या मॅट्रोमोनी अकाउंटवर मुलीचे ‘श्रीदेवी’ नावाचे अकाउंट असते. या नावावरून पुढं काय काय घडते ते या चित्रपटामध्ये दाखवण्यात आलं आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी