मनोरंजन

“मी मृत झालो होतो, मात्र…” हार्ट अटॅकमधून सावरत असलेल्या श्रेयस तळपदेने सांगितली ‘त्या’ दिवसाची आपबिती

सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात मनोरंजनविश्वात काम करणाऱ्या अनेक कलाकारांना विविध कारणांमुळे अनेक मोठे त्रास आणि आजार होताना दिसत आहे. ‘हार्ट अटॅक’ (Heart Attack) हा तर मधल्या काही काळापासून खूपच सामान्य शब्द आणि आजार झाला आहे. अनेक सुदृढ लोकांनी या हार्ट अटॅकचा सामना केला आहे. नुकताच मराठीसोबतच हिंदी चित्रपटांमध्ये नाव कमावलेल्या आणि लोकप्रिय असलेल्या अभिनेता श्रेयस तळपदेला (Shreyas talpade) देखील हृदयविकाराचा जोरदार झटका आला होता. श्रेयस अतिशय फिट आणि सुदृढ असूनही त्याला आलेला हा झटका सर्वांसाठीच खूप मोठा धक्का होता. सोशल मीडियावर आणि टीव्हीवर ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. फॅन्ससोबतच कलाकार, मित्र, परिवार आदी अनेकांनी या काळात श्रेयसच्या कुटूंबासोबत खंबीरपणे उभे राहत त्यांना साथ दिली.

१४ डिसेंबरला श्रेयसला हृदयविकाराचा झटका आला त्यानंतर आता तीन आठवडयांनी खुद्द श्रेयसने एक मुलाखत दिली असून, यात त्याने त्याच्या या आजाराबद्दल आणि संपूर्णघटनाक्रमाबद्दल सांगितले. सध्या श्रेयस बरा असून, तो त्याच्या घरी कुटुंबासोबत वेळ घालवत विश्रांती घेत आहे. त्याने नुकतीच एका मोठ्या मीडियाहाऊसला मुलाखत दिली आणि याबद्दल माहिती दिली आहे. श्रेयस मराठीसोबतच हिंदी चित्रपटांमध्ये देखील सक्रिय आहे. सोबतच तो एक व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणून देखील परिचय आहे. मात्र श्रेयस सारख्या फिट व्यक्तीला आलेला हार्टअटॅक सगळ्यांसाठीच मोठा धक्का होता. त्याला कोणतेही व्यसन नसून देखील त्याला हा त्रास झाला असल्याने सर्वानीच आश्चर्य व्यक्त केले.

श्रेयसने त्याच्या मुलाखतीमध्ये सांगितले की, “मागील जवळपास अडीच वर्षांपासून मी सतत काम करत आहे. मला या काळात खूप थकवा जाणवायचा मात्र मी कामात जास्त व्यग्र असल्याने असे होत असेल, असा मी विचार केला. ज्या दिवशी मला अटॅक आला तेव्हा मी, मी माझ्या आगामी ‘वेलकम टू द जंगल’ सिनेमाचे शुटिंग करत होतो. या शूटच्या दरम्यान मी मिलेट्री व्यायाम केले होते. शुटिंग संपल्यानंतर अचानक माझा डावा हात दुखू लागला. मला श्वास घेताना देखील त्रास होत असल्याचे माझ्या लक्षात आले. मुख्य म्हणजे हे दुखणे काहीतरी वेगळे असल्याचे मला जाणवले. माझे दुखणे इतके जास्त होते की, मी कपडे बदलण्यासाठी व्हॅनिटी व्हॅनपर्यंत देखील जाऊ शकत नव्हतो. मी कसेबसे कपडे बदलले आणि गाडीपर्यंत गेलो.”

पुढे श्रेयसने सांगितले, “शुटिंग संपल्यानंतर मी घरी पोहोचलो. माझी अवस्था माझी बायको दिप्तीने पाहिली आणि लगेचच मला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली. मी हॉस्पिटलमध्ये गेल्या गेल्या लगेचच माझ्यावर डॉक्टरांनी उपचार सुरु केले. मला हॉस्पिटलमध्ये नेले तेव्हा मी वैद्यकीय भाषेत सांगायचे तर जिवंत नव्हतोच. मला सीपीआर आणि शॉक ट्रिटमेंट देऊन पुन्हा डॉक्टरांनी जिवंत केले. त्यानंतर माझी अँजिओप्लास्टी करण्यात आली. काही दिवस मला हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आल्यानंतर सध्या मी घरी आहे. या सर्वातून सावरल्यानंतर मी सर्वात आधी दीप्तीची बायकोची माफी मागितली. कारण तिला माझ्यामुळे हा एवढा मोठा त्रास सहन करावा लागला.”

हे ही वाचा

‘या’ अभिनेत्रीची होणार झी मराठीच्या मालिकेत धमाकेदार एन्ट्री, प्रोमो झाले व्हायरल

श्रीदेवी प्रसन्न चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, बोल्ड अभिनेत्री सई ताम्हणकर आणि सिद्धार्थ चांदेकरची केमिस्ट्री

शाहरूख खानने २०२३ मध्ये केला ‘हा’ विक्रम

पुढे श्रेयस तळपदेने सगळ्यांना एक सल्ला देताना सांगितले की, “तुमच्या आरोग्याला अजिबात गृहीत धरून हलक्यात घेऊ नका. डॉक्टरांकडे जाऊन रेग्युलर चेकअप करा. मला आयुष्यात कधीही हॉस्पिटलमध्ये जावे लागले नाही. मात्र आता या आजारामुळे मी स्वर्गाला हात लावून आलो आहे. माझ्या कुटुंबाला हार्ट अटॅकचा इतिहास असल्याने मी माझे चेकअप करत होतो. मी ECG, 2D इको, सोनोग्राफी आणि रक्ताच्या चाचण्या केल्या होत्या. माझे कोलेस्ट्रॉल जास्त होते आणि त्यासाठी मी आवश्यक ती सर्व औषधं डॉक्टरांच्या सल्ल्याने घेत होतो. मात्र तरी देखील मला हा त्रास झाला.”

या सक्तीच्या आराममध्ये श्रेयस सध्या वाचन करत असून, चित्रपट बघत आहे. सोबतच पत्नीला आणि मुलीला देखील वेळ देत आहे.

 

टीम लय भारी

Recent Posts

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

22 hours ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

2 days ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

2 days ago

डॉ. सुजय विखे पाटलांचे गिरे तो भी टांग उपर

डॉ. सुजय विखे पाटील यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झालाय(Dr. Sujay Vikhe Patil has been defeated…

4 days ago

छगन भुजबळ यांनी एका धनगर नेत्याला संपवलं होतं

उपमुख्यमंत्री व गृहमंत्री असताना छगन भुजबळ यांनी तेलगी घोटाळा केला होता. यांत भुजबळ यांनी नाहक…

4 days ago

छगन भुजबळ ओबीसी चळवळीचा वापर स्वतःचा भ्रष्टाचार बळकट करण्यासाठी करतात

भुजबळ(Bhujbal) ज्या ज्या खात्यात गेले, त्या त्या खात्यात त्यांनी यथेच्छ भ्रष्टाचार केलेला आहे. सार्वजनिक बांधकाम…

4 days ago