25 C
Mumbai
Sunday, March 3, 2024
Homeमनोरंजनशाहरूख खानने २०२३ मध्ये केला 'हा' विक्रम

शाहरूख खानने २०२३ मध्ये केला ‘हा’ विक्रम

बॉलिवूडच्या तीन खान पैकी अभिनेता शाहरूख खानने (shahrukh Khan) एक मोठा रोकॉर्ड आपल्या नावे केला आहे. त्याची सर्वत्र चर्चा होत आहे. जे इतर कोणालाही जमलं नाही ते त्यानं करून दाखवलं आहे. सलमानलाही मागे सोडत २०२३ मध्ये त्याच्या चित्रपटाने तब्बल २५०० कोटींची कमाई केली आहे. २०२३ या वर्षामध्ये त्याच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली आहे. त्याने मागील वर्षात म्हणजेच २०२३ मध्ये चार वर्षानंतर पुन्हा कमबॅक केलं आहे. त्याच्या पठाण, जवान आणि डंकीने चांगलीच कमाई केली आहे. त्याच्या या तीन सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर २५०० कोटी एवढी (2500 crore) कमाई केली आहे.

यामध्ये पठाण सिनेमासाठी त्याने चार वर्षांनंतर कमबॅक केलं आहे. तर या सिनेंमाने जगभरामध्ये १००० कोटी एवढी कमाई केली आहे. तर जवान या सिनेमामध्ये त्याने ११०० कोटी एवढी कमाई केली आहे, अशातच नुकताच रिलीज झालेल्या सिनेमाने आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार ३०० कोटी कमाई केली आहे. याच पार्श्वभूमीवर आता शाहरूख खान आगामी तीन सिनेमांबाबत चर्चा करत असल्याची माहिती समोर येत आहे. सध्या तो लंडनमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे. मात्र तलवकर सुट्टीवरून आल्यानंतर मोठी घोषणा करणार आहे. त्यामध्ये तो दिग्दर्शक करण जोहरसोबत तब्बल १४ वर्षानंतर चित्रपटामध्ये काम करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

हे ही वाचा

सांगलीमध्ये विद्यार्थीनीसोबत शिक्षकाचे अश्लील चाळे, मनसे कार्यकर्त्यांनी शिक्षकालाच शिकवला धडा

राम मंदिराचा मूर्तीकार उच्चशिक्षित असूनही जपतोय कलेचा वारसा

राजू शेट्टी आणि उद्धव ठाकरे यांची भेट, चर्चांना उधाण

तब्बल १४ वर्षानंतर शाहरूख आणि करण जोहर एकाच चित्रपटमध्ये

शाहरूख आता १४ वर्षानंतर करण जोहरसोबत एकाच चित्रपटामध्ये दिसणार आहे. यामध्ये शाहरूख आणि त्याची लेक सुहाना देखील दिसणार असल्याच्या चर्चा आहेत. काही दिवसांआधी सुहाना खान ‘द आर्चीज’ या चित्रपटामधून समोर आली असून तिनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे.

धूम ४ मध्ये शाहरूख?

धूम ४ ची सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेसाठी कोणाची निवड करणार असा प्रश्न चाहत्यांना आहे. तर काहीजण मुख्यभूमिकेमध्ये शाहरूख खान असल्याच्या चर्चा आहेत, मात्र त्यावर अजूनही अधिकृत माहिती समोर आली नाही. दरम्यान या चित्रपटाबद्दल लवकरच यशराज फिल्म्स (yashraj films) अधिकृत माहिती देणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी