मनोरंजन

तुर्कीला जाऊन अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचं हटके फोटोशूट,कॅप्शन शेअर करत म्हणाली…

सोनाली कुलकर्णी मराठी मनोरंजन क्षेत्रातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. सोनाली कुलकर्णीने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. सोनाली तिच्या अभिनयाने आणि तिच्या नृत्यासाठी विशेष ओळखली जाते. अगदी सोशल मिडीया माध्यमांवर देखील ती खूप सक्रीय असते. अनेकदा ती तिच्या चाहत्यांसाठी इंस्टाग्राम माध्यमातून फोटो शेअर करत असते. तसेच चाहतेही तिला चांगला प्रतिसाद देतात.

अभिनयासोबत तिला अनेक ठिकाणी फिरण्याची देखील आवड आहे.नुकतेच तिने तिच्या इंस्टाग्रामच्या अकाऊंटवरून तुर्कीमध्ये सुट्टयांचा आनंद घेताना फोटो शेअर केले आहेत. सोनालीने नुकतेच तुर्कीमधील कपाडोसिया या जागेला भेट दिली. यामध्ये तिने तिचे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो पोस्ट करून अनेकांचे तिने लक्ष वेधून घेतले आहे. या फोटोशूट मध्ये तिने साडी परिधान केली आहे. तसेच तिने या फोटोला कॅप्शन दिले आहे.

यामध्ये ती म्हणते,” तुर्कीमध्ये कपाडोसिया फोटोसाठी अतिशय लोकप्रिय आहे. जगभरातून लोक इथे हॉटऐअर बलूनसाठी येतात. मॉडेल्स, नववधू, त्यांच्या शूटसाठी, विंटेज कार आणि फ्लोइंग गाऊन भाड्याने घेतात. पण, मी आपली भारतीय संस्कृतीचे प्रतिनिधित्व करणारी साडी परिधान करणे निवडले ज्यात या ड्रेसच्या लांब ट्रेलच्या ऐवजी हा लांब पदर होता.”
फोटोशूट मध्ये सोनाली कुलर्णीनीने निळ्या रंगाची परिधान केली आहे. यामध्ये लाईट गोल्डन कलरची किनार आहे. यामध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे. अनेकांनी तिला असे हटके फोटोशूट केल्याबद्दल अनेक कंमेंट्स केल्या आहेत.

हे देखील वाचा

Maharashtra SSC Result 2023 : दहावीचा निकाल ९३.८३ टक्के ; यंदाही परिक्षेत मुलींनीच मारली बाजी

ठाण्यात टीएमटीसेवा सक्षम करण्यासाठी आयुक्तांनी उचलले महत्त्वाचे पाऊल

वन विभागाने २० वर्ष अडवली वाडा-मनोर महामार्गाची वाट!

सोनालीचे प्राथमिक शिक्षण हे आर्मी विद्यालयात झाले असून माध्यमिक शिक्षण केंद्रीय विद्यालयात झाले आहे. तसेच तिला लहानपणापासून डान्स करण्याची आवड आहे. घरात अभिनयाची कोणतीच पार्श्वभूमी नसताना ती आज मराठी चित्रपटसृष्टीत आघाडीची अभिनेत्री आहे.

स्नेहा कांबळे

Recent Posts

महात्मा गांधी येथे आगीत दोन दुकाने जळून खाक

आज सायंकाळी सहाच्या वाजेच्या सुमारास टाऊन हॉल समोर असलेल्या खलील भाई बॅटरीवाला यांच्या दुकानाला आग…

8 hours ago

नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर धावत्या कारने घेतला पेट

सध्या जिल्ह्यासह राज्यभरात उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे. या वाढत्या उन्हामुळे अनेकदा धावत्या वाहनांना आग…

8 hours ago

उद्धव ठाकरे तर मानसिक आजारी आहेत : चंद्रशेखर बावनकुळे

उद्धव ठाकरे यांना पराभव दिसू लागल्याने त्यांचे मानसिक संतुलन ढासळले आहे. ते चिडलेले आहेत, घाबरलेले…

8 hours ago

मालेगाव येथे शाळेच्या आवारातून १ लाखाची एमडी पावडर जप्त; तिघांना अटक

शहरातील जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावरील म्युन्सिपल हायस्कूल, कन्या शाळेच्या आवारात शहर पोलिसांनी छापा टाकून सुमारे एक…

9 hours ago

नरेंद्र मोदींचा रोड शो जनतेच्या पैशातून, महापालिकेने केला साडेतीन कोटीचा खर्च; संजय राऊत यांचा आरोप

घाटकोपरमध्ये बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोडशो झाला या रोडशोसाठी संपूर्ण मुंबईला वेठीस धरण्यात आले…

11 hours ago

पपई खाण्याचे आरोग्यदायी फायदे

पपई (papaya) ही आरोग्यासाठी (Health) खूप फायदेशीर ( benefits) मानली जाते. यामध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-सी,…

11 hours ago