30 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeशिक्षणMaharashtra SSC Result 2023 : दहावीचा निकाल ९३.८३ टक्के ; यंदाही परिक्षेत...

Maharashtra SSC Result 2023 : दहावीचा निकाल ९३.८३ टक्के ; यंदाही परिक्षेत मुलींनीच मारली बाजी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल जाहीर झाला. मंडळाने दिलेल्या माहीतीनुसार, यंदा दहावीचा निकाल हा ९३.८३ टक्के इतका लागला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदा देखील मुलींनीच परिक्षेत बाजी मारली. मुलींचा निकाल ९५.८७% लागला तर मुलांचा निकाल हा ९२.५ % लागला आहे.

महाराष्ट्रातील इयत्ता 10वी बोर्डाची परीक्षा 2 मार्च ते 25 मार्च 2023 या कालावधीत राज्यभरातील विविध परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली होती. यावर्षी सुमारे १५ लाख उमेदवारांनी परीक्षा दिली आहे. पुणे विभागाचा निकाल ९५.६४% तर नागपूर ९२.०५%, औरंगाबाद ९३.२२ % , मुंबई ९३.६६ % , कोल्हापूर ९६.७३ % , अमरावती ९३.२२ %, नाशिक ९२.२२%, लातूर ९२.६६% आणि कोकण ९८.११ % लागला आहे. यंदाही दहावीच्या निकालामध्ये कोकणातील मुले अव्वल ठरली आहेत.

हे सुद्धा वाचा

Maharashtra SSC Result 2023 : दहावीचा निकाल ९३.८३ टक्के ; यंदाही परिक्षेत मुलींनीच मारली बाजी

प्रतीक्षा संपली; उद्या दहावीचा निकाल जाहीर होणार

वन विभागाने २० वर्ष अडवली वाडा-मनोर महामार्गाची वाट!

एसएससीचा निकाल जाहीर झाल्यानंतर लवकरच एफवायजेसीचे प्रवेश सुरू होतील. महाविद्यालयांनी अकरावीच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज सुरू केले आहेत. तसेच जे विद्यार्थी अनुत्तीर्ण आणि श्रेणी सुधारू इच्छितात त्या विद्यार्थ्यांसाठी पुरवणी घेण्यात येईल. ही परिक्षा जुलै-ऑगस्टमध्ये घेण्यात येईल. त्यासाठीची अर्ज प्रक्रिया ७ जूनपासून सुरू होणार आहे.

गेल्यावर्षी महाराष्ट्र दहावीचा निकाल 17 जुलै 2022 रोजी जाहीर झाला. यामध्ये एकूण १५ लाख विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली होती आणि उत्तीर्ण होणाऱ्यांची टक्केवारी ही ९६ % होती.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी