क्रिकेट

ऋतुराज आणि उत्कर्षाच्या हातावर खुलली मेहंदी; या तारखेला होणार शुभमंगल!

आयपीएलच्या 16 व्या सिझनची नुकतीच सांगता झाली आहे. यावर्षीचे विजेतेपद चैन्नईने आपल्या नावावर कोरले आहे. त्यानंतर ऋतुराज गायकवाड याच्या लग्नाच्या चर्चा जोरदार रंगल्या होत्या. आता त्या चर्चांना पुर्णविराम मिळाला आहे. अखेर ऋतुराज आणि उत्कर्षाच्या लग्नाची तारीख समोर आली आहे. ऋतुराज गायकवाड उत्कर्षा पवारसोबत 3 जून रोजी विवाहबंधनात अडकणार आहे. त्यांच्या मेहंदीचे फोटोही व्हायरल झाले आहे. यामध्ये ऋतुराज आणि उत्कर्षा आपापल्या हातावरील मेहंदी दाखवताना दिसत आहेत. यातील एक फोटोंमध्ये त्यांनी लग्नाची तारीख सांगितली आहे. उत्कर्षाच नव्हे तर ऋतुराजने सुद्धा आपल्या होणाऱ्या बायकोचं नाव वेगळ्याच अंदाजत आपल्या हातावर लिहिलं आहे. ऋतुराजने दोघांच्या ही नावाचं पहिलं अक्षर लिहिताना R अक्षरामध्ये क्रिकेटची बॅट दाखवली आहे आणि खाली उत्कर्षाचं पूर्ण नाव लिहीत हार्टचा इमोजी दिला आहे. तर दुसऱ्या हातावर त्यांच्या लग्नाचा हॅशटॅग त्याने वापरला आहे.त्यात ३ जून असेही लिहिले आहे.
उत्कर्षा पवार नेमकी आहे तरी कोण –
फार कमी लोकांना माहित असेल की उत्कर्षा ही सुद्धा एक क्रिकेटपटू आहे.उत्कर्षा ही पुण्याची राहणारी आहे. तिने देशांतर्गत स्पर्धामध्ये महाराष्ट्र आणि पश्चिम विभागाचे प्रतिनिधित्व केले आहे.ती आता महाराष्ट्र महिला क्रिकेट संघाकडून क्रिकेट खेळते. ती एक अष्टपैलू खेळाडू असून फलंदाजीसोबतच ती वेगवान गोलंदाजही आहे. तिने कथ्थक नृत्य प्रकाराचे औपचारिक प्रशिक्षण घेतले आहे आणि तिला फावल्या वेळात नृत्य करायला आवडते.
ऋतुराज गायकवाडने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यातून माघार घेतली असून त्याच्या ऐवजी यशस्वी जयस्वालला राखीव खेळाडू म्हणून भारतीय संघात स्थान दिलं गेलं आहे.3जून रोजी लग्न ठरल्याने त्याने या स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.

रसिका येरम

Recent Posts

गुगलची मेहरबानी, ‘लय भारी’ची प्रगती !

‘गुगल’ने आज ‘लय भारी’ला विशेष प्रमाणपत्र प्रदान केले आहे. असे प्रमाणपत्र मिळवणारे ‘लय भारी न्यूज’…

1 hour ago

मतदान जनजागृतीसाठी नाशिक मनपातर्फे चित्रकला व मेहंदी स्पर्धेचे आयोजन

नाशिक महापालिका (NMC) व क्रेडाई यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या बुधवारी (दि.8) शहरातील गोल्फ क्लब येथे…

4 hours ago

नो-पार्किंग’मधील वाहनांकडे ‘कानाडोळा’! सोयीनुसार वाहनांची टोईंग

शहर पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये गेल्या आठवडाभरापासून वाहनांच्या टोईंगची (Towing) कारवाई सुरू झालेली आहे. मात्र असे…

5 hours ago

रुपाली चाकणकर यांच्या अडचणी वाढल्या; EVM मशीनची केली पूजा; दाखल झाला गुन्हा

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी ईव्हीएम मशीनची पूजा (worship of EVM…

5 hours ago

राहुल गांधींनी रायबरेलीच का निवडलं?

मै शेरनी हूं और लढना भी जानती हूं, हे वाक्य आहे नुकत्याच झालेल्या रायबरेली(Raebareli) येथील…

5 hours ago

गुणरत्न सदावर्तेंना मोठा धक्का; त्या प्रकरणाचा निकाल आला; बायकोचं पदही गेलं

गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांना सहकार खात्याने मोठा धक्का दिला आहे. एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या (ST…

6 hours ago