मनोरंजन

सुशांतच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; ‘न्याय : द जस्टिस’ हा चित्रपट लवकरचं प्रदर्शित होणार

टीम लय भारी

मुंबई:- दिवंगत बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूतवर याच्या मृत्यूनंतर त्याच्या चाहता वर्ग खूप दुःखी झाला होता. सुशांतचे चाहते सोशल मीडियावर अनेकदा त्याची आठवण काढतात. सुशांतच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सुशांतसिंग राजपूतवर आधारित ‘न्याय : द जस्टिस’ हा चित्रपट लवकरचं प्रदर्शित होण्याची शक्यता आहे (Sushant Singh Rajput fans for good news).

बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूतवर आधारित चित्रपट ‘न्याय : द जस्टिस’ प्रदर्शित करण्यावर स्थगिती देण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने पुन्हा नकार दिला आहे. सुशांतसिंग याच्या वडिलांनी या चित्रपटाच्या प्रदर्शनावर स्थगितीची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने यावर नकार दिला आहे. त्यामुळे हा चित्रपट आता लवकरच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होऊ शकतो. न्याय : द जस्टिस’चे दिग्दर्शन दिलीप गुलाटी यांनी केले असून, सारावगी आणि राहुल शर्मा हे या चित्रपटाचे निर्मितते आहेत.

राज कुंद्राच्या समस्या आणखी वाढणार; मुंबई गुन्हे शाखेच्या हाती तब्बल 120 नवे अश्लील व्हिडिओ

ज्येष्ठ बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचे निधन

निर्माता राहुल शर्मा यांनी आयएएनएसला सांगितले की, आम्हाला विश्वास होता की न्यायालयातुन आम्हाला न्याय मिळेल. आम्ही या निर्णयामुळे खूप खूश आहोत. आम्ही सतत हेच सांगत आलो आहोत की, हा चित्रपट पैसे मिळवण्यासाठी तयार केला नाही. सत्य बाहेर आले पाहिजे आणि न्याय मिळावा अशी आमची इच्छा आहे. चित्रपटगृह पुन्हा उघडल्यानंतर हा चित्रपट प्रदर्शित होईल, अशी माहिती त्यांनी दिली आहे (This movie was not made to make money. Truth must come out and justice must be done).

सुशांतसिंग राजपूतवर आधारीत चित्रपट ‘न्याय- द जस्टिस’

सुशांत सिंह राजपूतने गेल्या वर्षी 14 जून रोजी राहत्या घरी गळफास घेऊन स्वतःचे आयुष्य संपवले. मात्र, त्याच्या मृत्यूनंतर त्याने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली अशा चर्चा सुरू झाल्या. सुशांतच्या मृत्यूचे रहस्य उलगडणारा चित्रपट ‘न्याय : द जस्टिस’ वर स्थगितीची मागणी करण्यात आली होती. मात्र दिल्ली उच्च न्यायालयाने स्थगितीस नकार दिल्याने हा चित्रपट प्रदर्शित होण्यास तयार आहे. काही दिवसांपूर्वी चित्रपटाचा ट्रेलर देखील प्रदर्शित करण्यात आला आहे (Sushant Singh Rajput ended his life by hanging himself at his residence on June 14 last year).

राज कुंद्राच्या खात्यातून कोणाच्या खात्यात पैसे जात होते? पोलीसांनी केला तपास

Film on Sushant Singh Rajput’s death case titled ‘Nyay: The Justice’ to get theatre release; Here’s what Delhi High Court ordered

सुशांतच्या कुटुंबानं केली होती बंदीची मागणी

सुशांतचे वडील केके सिंह यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करून या चित्रपटाच्या प्रदर्शनावर स्थगितीची मागणी केली होती. मात्र, 10 जून रोजी दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजीव नरुला यांनी ही याचिका फेटाळून लावली. यानंतर निर्मात्यांनी ‘न्यायः द जस्टिस’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केला (Sushant Singh Rajput, KK Singh, father had filed the petition in the Delhi High Court)

ट्रेलरमध्ये सुशांतच्या आयुष्याशी संबंधित घटना

न्यायः द जस्टिस’ चित्रपटाच्या ट्रेलरची सुरूवात टीव्हीवरील बातमीने होते. त्यामध्ये महेंद्रसिंग नावाच्या अभिनेत्याने आत्महत्या केल्याचा म्हटले आहे. ट्रेलरमध्ये महेंद्र आणि उर्वशी लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहतात असे दाखवण्यात आले आहे. त्याचबरोबर सुशांत प्रकरणात टीव्हीवर दाखवलेल्या सर्व घटना ट्रेलरमध्ये दाखवण्यात आल्या आहेत.

सुशांतसिंग राजपूत

ट्रेलरमध्ये ड्रग्सचा मुद्दा

ट्रेलरमध्ये ड्रग्जचा मुद्दादेखील दाखवण्यात आला आहे. नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने या सुशांत प्रकरणातील अनेक मोठ्या व्यक्तींची चौकशी केली आहे. सुशांतसिंग राजपूतच्या वडिलांनी अभिनेत्री रिया चक्रवर्तीवर पैशाची हेर-फेर केल्याचा आरोप केला होता. त्या घटनेचाही उल्लेख ट्रेलरमध्ये करण्यात आला आहे.

‘न्याय : द जस्टिस’ ची ही आहे स्टारकास्ट

या चित्रपटात झुबैर खान आणि श्रेया शुक्ला मुख्य भूमिकेत आहेत तर अमन वर्मा ईडी चीफच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटात असरानी महेंद्रसिंगच्या वडिलांची भूमिका साकारली आहे, तर एनसीबी प्रमुखच्या भूमिकेत शक्ती कपूर दिसणार आहे. अनंत जोग यांनी मुंबई पोलिस आयुक्तांची भूमिका साकारली आहे. अन्वर फतेह बिहारचे पोलिस आयुक्त आणि सुधा चंद्रन यांनी सीबीआय प्रमुखच्या भूमिकेत दिसणार आहेत (Sushant Singh Rajput based on It is a star cast in a film Nyay : The Justice moive).

Sagar Gaikwad

Recent Posts

नाशिकच्या रस्त्यांवर धावणार 50 इलेक्ट्रिक बस

केंद्र सरकारच्या नगरविकास मंत्रालयाकडून पीएम ई बस (PM E Bus) या योजनेंर्तग देशातील २० लाखांच्या…

1 hour ago

सेक्स टेप प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस

जेडीएसचे नेते प्रज्वल रेवण्णा (Prajwal Revanna) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. रेवण्णा यांच्या सेक्स टेप…

2 hours ago

नाशिकचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे १६ कोटीचे धनी

सलग दहा वर्षांपासून नाशिकचे खासदार राहिलेले हेमंत गोडसे (Hemant Godse) यांच्या संपुर्ण कुटुंबियांच्या नावे एकूण…

15 hours ago

दिंडोरी लोकसभेच्या उमेदवाराची संपत्ती पाच वर्षात दुप्पट

दिंडोरी लोकसभा (Dindori Lok Sabha) मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवारांच्या संपत्तीत  (wealth)…

15 hours ago

डाॅ. पवार, गाेडसेंचा विजय निशि्चत : शिंदे

४० अंशाच्या आसपास तापमानाचा पारा असतानाही कार्यकर्त्यांचा अमाप उत्साह पाहता महायुतीच्या दाेन्ही उमेदवारांचा विजय जवळजवळ…

16 hours ago

शिवसेना भाजप महायुतीचा शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल

लोकसभा निवडणुकीसाठी गुरुवारी शिवसेना-भाजप महायुतीतर्फे (BJP alliance ) दिंडोरी मतदार संघासाठी डॉ. भारती पवार आणि…

16 hours ago