31 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeमनोरंजनराज कुंद्राच्या समस्या आणखी वाढणार; मुंबई गुन्हे शाखेच्या हाती तब्बल 120 नवे...

राज कुंद्राच्या समस्या आणखी वाढणार; मुंबई गुन्हे शाखेच्या हाती तब्बल 120 नवे अश्लील व्हिडिओ

टीम लय भारी

मुंबई:- शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला अश्लील चित्रपट बनवण्याच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली होती. कोर्टाने राज कुंद्राला 27 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. यानंतर राज कुंद्रा याला आणखी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या चौकशी सुरू असतांना तपासा दरम्यान, गुन्हे शाखेला तब्बल 120 नवे अश्लील व्हिडीओ सापडले आहेत. त्यामुळे राज कुंद्राच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत (Raj Kundra problems seem to be getting worse).

अश्लील चित्रपट निर्मिती रॅकेट प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेचा तपास सुरु आहे. या प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या तपासातून रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. तपासात मिळणाऱ्या या नवनवीन माहितीमुळे उद्योगपती राज कुंद्राचे पाय आणखी खोलात जाताना दिसत आहेत.

राज कुंद्राच्या खात्यातून कोणाच्या खात्यात पैसे जात होते? पोलीसांनी केला तपास

कृणाल पंड्याला कोरोनाची बाधा, दुसरा T20 सामना बुधवारी होण्याची शक्यता

गुन्हे शाखेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अश्लील चित्रपटांची निर्मिती करण्यासाठी बोगस प्रोड्यूसर बनवले गेले होते. या चित्रपटांसाठी राज कुंद्रा हाच पैसा लावत होता. तसेच प्रत्येक निर्मात्याची एक वेगळी टीम असायची. एकाच वेळी बर्‍याच चित्रपटांचे चित्रीकरण इनडोर केले जायचे, अशीदेखील नवी माहिती आता समोर आली आहे. राज कुंद्राने मार्चमध्ये आपला फोन बदलल्यामुळे गुन्हे शाखेला जुना डेटा मिळवता आला नव्हता, परंतु तो डेटा मिळवण्यात आता गुन्हे शाखेला यश आले आहे. (The crime branch has not been able to recover the old data since Raj Kundra changed his phone in March).

Raj Kundra problems seem to be getting worse.
राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी

राज कुंद्राला आणखी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

राज कुंद्राला अश्लील चित्रपट बनवल्याप्रकरणी कोर्टाकडून आणखी एक मोठा धक्का बसला आहे. त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. राज कुंद्रा याला मुंबईच्या गुन्हे शाखेने 19 जुलै रोजी रात्री उशिरा अटक केली होती. त्यानंतर 20 जुलै रोजी कोर्टाने त्याला 3 दिवसांच्या पोलीस कोठडी सुनावली. त्यानंतर 23 जुलै रोजी पुन्हा सुनावणी झाली असता कोर्टाने राज कुंद्राला 27 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती.. आता पुन्हा यात वाढ करण्यात आली आहे.

Raj Kundra problems seem to be getting worse.
राज कुंद्रा

शिल्पा शेट्टीचाही पतीसोबत सहभाग आहे का?; पोलीसांनी केली सहा तास चौकशी

Raj Kundra Pornography Case: Businessman sent to judicial custody for 14 days, HC says no urgent relief | LIVE

राज कुंद्रा याच्या घरातून अनेक महत्त्वपूर्ण पुरावे सापडल्याचे क्राइम ब्रँचने कोर्टाला सांगितले आहे. अनेक इलेक्ट्रॉनिक पुरावे जप्त करण्यात आले आहेत. या संदर्भात एका फॉरेन्सिक तज्ज्ञाची नेमणूक करण्यात आली आहे. ज्याच्या मदतीने डेटा परत मिळवला जात आहे. राज यांच्या घरातून हार्ड डिस्क व मोबाईल सापडला आहे. आयओएसवर आरोपींकडून हॉटशॉट्स दाखवले जात असताना त्यांना अँपल कडून 1 कोटी 13 लाख 64,886 रुपये मिळाले होते. ज्या खात्यांमध्ये ही रक्कम जमा केली गेली होती ती कोटक महिंद्र बँक, येस बँक आणि अन्य बँक खाती गोठवली गेली आहेत. आता काही फरार आरोपींचाही शोध सुरू आहे (Raj Kundra has been remanded in judicial custody for another 14 days).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी