29 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeटॉप न्यूजज्येष्ठ बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचे निधन

ज्येष्ठ बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचे निधन

टीम लय भारी

मुंबई :- ज्येष्ठ बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचे आज राहत्या घरी निधन झाले. वयाच्या 88 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या या निधनाने क्रीडा क्षेत्रात शोक व्यक्त केला जात आहे (Senior badminton player Nandu Natekar passes away).

नंदू नाटेकर यांचा जन्म सांगलीत झाला. नाटेकरांनी मुंबईतल्या रामनारायण रुईया महाविद्यालयात शिक्षण पूर्ण केले. त्यांनी 15 वर्षांच्या कारकिर्दीत 10 पेक्षा जास्त स्पर्धा जिंकल्या आहेत. 1956 मध्ये क्वालालंपूर येथील सेलांगोर इंटरनॅशनल स्पर्धा जिंकून, नंदू नाटेकर यांनी ऐतिहासिक विजयाची नोंद केली. ते भारतातील, भारताबाहेर विजेतेपद मिळवणारे पाहिले बॅडमिंटन खेळाडू होते. 6 वेळा एकेरी, 6 वेळा दुहेरी, आणि 5 मिश्र दुहेरी स्पर्धेत त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.

सरकार विरोधात विरोधकांत एकमत

महाविकास आघाडीसह 14 पक्षांची दिल्लीत बैठक; ‘या’ प्रकरणावरून केंद्र सरकारला घेरणार

नंदू नाटेकर हे परदेशात स्पर्धा जिंकणारे पाहिले भारतीय बॅडमिंटनपटू होते. त्यांनी ६ वेळा राष्ट्रीय पदके मिळवली होती. तसेच 1956 मध्ये त्यांनी क्वालालंपूर इथे झालेल्या सेलंगोर इंटरनॅशनल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते (He had won the Selangor International Championship in Kuala Lumpur).

1953 मध्ये त्यांनी वयाच्या विसाव्या वर्षी भारतासाठी पहिला सामना खेळला होता. 1954 मध्ये त्यांनी ऑल इंग्लंड अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता. नंदू नाटेकर यांना 1961 मध्ये अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 1980 आणि 1981 मध्ये त्यांनी दुहेरी पदक जिंकली होती.

Senior badminton player Nandu Natekar passes away
नंदू नाटेकर

लाचखोर महिला प्रांताधिकारी एसीबीच्या जाळ्यात

Nandu Natekar Died: नहीं रहे दिग्गज बैडमिंटन खिलाड़ी नंदू नाटेकर, ये रिकॉर्ड किए अपने नाम

नाटेकर यांचा मुलगा गौरव यांनी प्रसार माध्यमांना सांगितले की, “त्यांचे घरातच निधन झाले आणि आम्ही सर्व त्यावेळी त्यांच्या सोबत होतो. ते गेले तीन महिन्यांपासून आजारी होते.” कोविडचा काळ असल्यामुळे नाटेकर यांची शोकसभा घेतली जाणार नाही, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली.

नंदू नाटेकर हे स्पोर्ट्स अँड फिटनेस (एनएसएफ) चे संचालक होते. नंदू नाटेकर हे बॅडमिंटनचे विद्यापीठच आहेत. त्यांनी 60 च्या दशकात एकाच वेळी एकेरी, दुहेरी, मिश्र दुहेरी अश्या तिन्ही प्रकारामध्ये खेळले आहेत. अफलातून कामगिरीसाठी नाटेकर यांना ‘गोल्डन बॉय ऑफ इंडियन बॅडमिंटन’ अशी उपमा देण्यात आली आहे. तर, त्यांचा मुलगा गौरव नाटेकर टेनिस स्पर्धेत सात वेळा भारतीय राष्ट्रीय चॅम्पियन आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी