मनोरंजन

तापसी आणि मॅथियास बोच्या लग्नाचा व्हिडिओ आला समोर? लाल रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली अभिनेत्री

बॉलीवूड अभिनेत्री तापसी पन्नू गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. होळीच्या तेवढयात बातमी आली होती की तापसी पन्नूनी तिच्या प्रियकर मॅथियास बोईसोबत गुपचूप लग्न केले आहे.तथापि, तापसीच्या बाजूने किंवा मॅथियासच्या बाजूने याची पुष्टी होऊ शकली नाही. (Taapsee Pannu and mathias boe wedding video leaked) मात्र, आता सोशल मीडियावर एक विडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ तापसीच्या लग्नाचा असल्याचे म्हटलं जात आहे. (Taapsee Pannu and mathias boe wedding video leaked)

‘मी मधमाशी आहे जी मरेन, पण सोडणार नाही…’ जेनिफरने दिली असित मोदींना धमकी

या व्हिडिओमध्ये वधू लाल रंगाच्या हेवी वर्क सूटमध्ये दिसत आहे. ती तिच्या कुटुंबीयांसह नाचत स्टेजवर पोहोचते आणि नंतर नवरदेवाला मिठी मारते. यानंतर दोघेही मंडपात उभे राहतात आणि नाचू लागतात. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. काही लोक असा दावा करत आहेत की हा तापसी आणि मॅथियास बो यांच्या लग्नाचा व्हिडिओ आहे. तथापि, व्हिडिओ अस्पष्ट असल्यामुळे याची पुष्टी करू शकत नाही. (Taapsee Pannu and mathias boe wedding video leaked)

तुम्हाला सांगतो की तुम्हाला सांगते की, तापसी आणि मॅथियास बो मागील 10 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे. मॅथियास बो हा डेन्मार्कचा बॅडमिंटनपटू आहे. मॅथियासने 2012 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत दुहेरी बॅडमिंटन स्पर्धेत रौप्य पदक पटकावले होते. 2015 च्या युरोपियन गेम्समध्ये सुवर्णपदक पटकावले. इतकेच नव्हे तर मॅथियास हा सध्या भारताच्या राष्ट्रीय बॅडमिंटन संघाचा प्रशिक्षक आहे. सोशल मीडियावर तापसीची बहीण शगुन आणि तिच्या चुलत बहिणीसोबतचा फोटो शेअर करून या जोडप्याच्या लग्नाबाबतचे संकेतही दिले.(Taapsee Pannu and mathias boe wedding video leaked)

प्रियांका चोप्राच्या घरी लग्नसराई; होणारी वहिनी आहे तरी कोण?

तापसीचा जन्म दिल्लीच्या एका पंजाबी कुटुंबात झाला आणि चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी ती सॉफ्टवेअर प्रोफेशनमध्ये होती, परंतु त्यानंतर तिने मॉडेलिंग सुरू केले आणि नंतर ती अभिनेत्री बनली. तापसीने कम्प्युटर विज्ञान अभियांत्रिकीमध्ये पदवी पूर्ण केली आणि सॉफ्टवेअर अभियंता म्हणून काम केले. यासोबतच तिने व्ही चॅनलच्या टॅलेंट शो गेट गॉर्जियससाठी मुलाखत दिली, त्यानंतर ती मॉडेलिंग आणि नंतर अभिनय क्षेत्रात आली. रिलायन्स ट्रेंड्स, रेड एफएम 93.5, कोका कोला, मोटोरोला, पँटालून, पीव्हीआर सिनेमा, डाबर आणि वर्धमान यांसारख्या अनेक जाहिरातींमध्येही ती दिसली. (Taapsee Pannu and mathias boe wedding video leaked)

कपिल शर्माच्या शोमध्ये पोहचले रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर, पहा व्हिडिओ

तापसीने 2010 मध्ये झुम्मंडी नादम या चित्रपटाद्वारे तेलुगू चित्रपटसृष्टीत प्रवेश केला, यावेळी तापसी केवळ 22 वर्षांची होती. यासोबतच तापसीने तमिळ आणि मल्याळम चित्रपटांमध्येही काम केले, तिच्या तमिळ चित्रपट आदुकलमने 6 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकले.

काजल चोपडे

Recent Posts

द ग्रेट इंडियन कपिल शोच्या मीड सीझनचा प्रोमो रिलीज

'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा (The Great Indian Kapil Show's) नवा मीड सीझनचा प्रोमो रिलीज…

8 mins ago

ऐनवेळची धावपळ टाळण्यासाठी मतदान केंद्राची माहिती आधीच घ्या- जिल्हाधिकारी जलज शर्मा

लोकसभा निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्ह्यातील 20 दिंडोरी व 21 नाशिक लोकसभा मतदार संघांसाठी सोमवार,…

34 mins ago

त्र्यंबकेश्वर येथे युवकास जीवे मारण्याचा प्रयत्न; रोकडही लांबवली

पार्किंगच्या जागेच्या कथित वादावरुन १२ जणांनी एकास जीवे (kill) मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १२ जणांवर त्र्यंबकेश्वर…

1 hour ago

दारू पिण्यासाठी पैसे मागितल्यावरून वाद, मुलाने बापालाच संपवलं

जळगाव जवळच्या पळसखेडा येथे एका मुलाने त्याच्या जन्मदात्या पित्याचीच धारदार शस्त्राने वार करून हत्या (…

2 hours ago

हॉटेलात गोळीबार करुन पळ काढणाऱ्यांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

शहराच्‍या दिशेने टोयोटा गाडीत काही सराईत येत असल्‍याची माहिती पोलिसांना मिळाली. गंगापूर जकात नाक्‍यावर संशयितांना…

3 hours ago

मशरूम खाण्याचे फायदे

मशरूममध्ये (mushrooms ) अनेक महत्त्वाची खनिजे आणि जीवनसत्त्वे आढळतात. यामध्ये व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी, पोटॅशियम,…

4 hours ago