29 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeमनोरंजनप्रियांका चोप्राच्या घरी लग्नसराई; होणारी वहिनी आहे तरी कोण?

प्रियांका चोप्राच्या घरी लग्नसराई; होणारी वहिनी आहे तरी कोण?

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राच्या (Priyanka Chopra) घरी सनई चौघडेंचा सुर ऐकायला मिळत आहे. प्रियांकाचा भाऊ सिद्धार्थ चोप्रा(Siddharth Chopra) हा त्याची गर्लफ्रेंड नीलम उपाध्यायसोबत(Neelam Upadhyaya) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली असुन निलम आणि सिद्धार्थ यांची रोका सेरेमनी पार पडली आहे. याचे फोटो दोघांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यासोबतच प्रियांकानंही स्टोरी शेअर करत दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत.(Priyanka Chopra brother Siddharth gets engaged to Neelam Upadhyaya)

प्रियांकाचा भाऊ सिद्धार्थनेदेखील आपल्या सोशल अकाऊंटवर रोका सेरेमनीचे फोटो शेअर केले आहे. यामध्ये दोघेही खुप सुंदर दिसत आहे. सिद्धार्थने मॅचिंग स्लीव्हलेस जॅकेटसह कुर्ता घातला होता, तर निलमने जांभळ्या टोन्डचा सिक्विन सूट परिधान केला. दोघांचे फोटो पाहता नेटकऱ्यांसह चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांसह लाईक्स कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Neelam Upadhyaya (@neelamupadhyaya)

या सेरेमनीमध्ये प्रियांका आपल्या सासरच्या परिवारासह उपस्थित होती. यावेळी प्रियांकाने लाल रंगाची साडी नेसली. तर निकने पांढरा कुर्ता-पायजमा आणि गुलाबी जॅकेट परिधान केलं होतं. तर प्रियांकाची होणारी वहिनी नेमकी आहे तर कोण जाणून घेवुयात.

कपिल शर्माच्या शोमध्ये पोहचले रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर, पहा व्हिडिओ

सिद्धार्थची होणारी पत्नी आणि प्रियांकाची होणारी वहिनी नीलम उपाध्याय ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने 2012 मध्ये ‘मिस्टर 7’ या तेलुगू चित्रपटातून अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं होतं. तिने तमिळ भाषेतील चित्रपटांमध्येही काम केलंय. गेल्या नऊ वर्षांपासून ती टॉलिवूडमध्ये काम करतेय. 2018 मध्ये तिचा ‘तमाशा’ हा तेलुगू चित्रपट प्रदर्शित झाला होता.

सिद्धार्थ जाधव, भूषण प्रधानच्या ‘लग्न कल्लोळ’चे ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर जोरदार स्वागत

भावाच्या रोकानंतर प्रियांकाने ‘सिद्धार्थ आणि नीलम.. तुम्हा दोघांना खूप सारं प्रेम आणि आशीर्वाद. रोका झाल्याबद्दल दोघांनाही शुभेच्छा’, अशा आशयाची पोस्ट करत आनंद व्यक्त केला.

Priyanka Chopra brother Siddharth gets engaged to Neelam Upadhyaya

सिद्धार्थ चोप्राचा याआधी इशिता कुमारसोबत साखरपुडा झाला होता. पण लग्नाच्या काही दिवस आधी इशिता कुमार आणि सिद्धार्थ यांचं ब्रेकअप झालं. यानंतर सिद्धार्थच्या आयुष्यात नीलमची एन्ट्री झाली. सिद्धार्थ अनेक दिवसांपासून नीलम उपाध्यायला डेट करत होता. मात्र, दोघांनीही यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. आता अखेर दोघेही लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी