30 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeमनोरंजनकपिल शर्माच्या शोमध्ये पोहचले रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर, पहा व्हिडिओ

कपिल शर्माच्या शोमध्ये पोहचले रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर, पहा व्हिडिओ

कपिल शर्माचा नवा शो सुरु झाला आहे. हा शो नेटफ्लिक्स वर दाखवण्यात येत आहे. द ग्रेट इंडियन कपिल शोच्या पहिल्या एपिसोडमध्ये रणबीर कपूर त्यांची आई नीतू कपूर आणि त्यांची बहीण रिधिमा कपूर पोहचले होते. मात्र, आता दुसऱ्या एपिसोडमध्ये दोन प्रसिद्ध क्रिकेटपटू दिसणार आहेत. आयपीएल 2024 च्या चर्चेदरम्यान, रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर द ग्रेट इंडियन कपिल शोमध्ये पोहोचले. यानंतर नवज्योत सिंग सिद्धूही शोमध्ये पोहोचले आणि मग सर्वीकडे कॉमेडीचे वातावरण तयार झाले. (the great indian kapil show ipl 2024 rohit sharma shreyas Iyer)

सिद्धार्थ जाधव, भूषण प्रधानच्या ‘लग्न कल्लोळ’चे ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर जोरदार स्वागत

नुकताच नेटफ्लिक्सने द ग्रेट इंडियन कपिल शोचा नवीन प्रोमो शेअर केला आहे. प्रोमोमध्ये कपिल शर्मा रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यरचे स्वागत करताना दिसला. यानंतर कपिल या दोन्ही क्रिकेटपटू सोबत खूप मजा करतांना दिसला. एवढेच नाही तर या शो मध्ये नवज्योत सिंग सिद्धू देखील झळकले. पण इथेही ट्विस्ट आहे. खरंतर कपिल शर्मा स्वतः नवज्योत सिंग सिद्धूच्या रूपात स्टेजवर पोहोचला आणि जज अर्चना पूरण सिंह यांची खुर्चीही हिसकावून घेतली. (the great indian kapil show ipl 2024 rohit sharma shreyas Iyer)

द ग्रेट इंडियन कपिल शोच्या मंचावर रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर देखील चीअर लीडर म्हणून नाचताना दिसले. याशिवाय कपिल शर्माच्या अनेक प्रश्नांची उत्तरेही त्यांनी दिली. शोमध्ये त्याने रोहित शर्माला विचारले की तुला कधी लोकांकडून विचित्र सल्ला मिळाला आहे का? याला उत्तर देताना क्रिकेटर म्हणाला की, जेव्हाही कुठलाही खेळाडू विमानतळावर जातो तेव्हा कानात हेडफोन घालतो, ही स्टाईल मारण्यासाठी नाही तर लोकांना टाळण्यासाठी आहे. याशिवाय त्याने आपल्या संघातील क्रिकेटपटूंना आळशी कोंबड्यांचे वर्णन केले. (the great indian kapil show ipl 2024 rohit sharma shreyas Iyer)

‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या आधी अर्चना पूरण सिंहचा मोठा खुलासा, हसण्याबाबत म्हटलं असं काही…

कृष्णा अभिषेक आणि सुनील ग्रोवरनंतर कपिल शर्मा द ग्रेट इंडियन कपिल शोमध्ये नवज्योत सिंग सिद्धूच्या भूमिकेत आला. यानंतर सर्वांनी स्टेजवर एकत्र क्रिकेटही खेळले. त्याच वेळी, प्रोमोचा शेवट सर्वात मजेदार होता, जेव्हा नवज्योत सिंग सिद्धू कपिल शर्मा बनला आणि अर्चना पूरण सिंहच्या सिंहासनावर बसला. तर अर्चना त्यांच्या मांडीवर बसलेली दिसली. द ग्रेट इंडियन कपिल शोचा हा भाग येत्या शनिवारी 6 एप्रिल 2024 रोजी रात्री 8 वाजता नेटफ्लिक्सवर प्रसारित केला जाईल. (the great indian kapil show ipl 2024 rohit sharma shreyas Iyer)

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी