आरोग्य

‘सेरेब्रल पाल्सी’ दिव्यांगांचा डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते होणार गौरव

सेरेब्रल पाल्सी (Cerebral Palsy ) हे मेंदूशी संबंधित दिव्यांगत्व असलेल्या कर्तृत्ववान व्यक्ती व संस्थांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. जागतिक बँकेने २०२१ मध्ये भारतातील अंपगत्वांची यादी जाहीर केली होती. त्यांच्या आकडेवारीनुसार, भारतामध्ये अपंग व्यक्तींची संख्या 40 ते 80 दशलक्ष दरम्यान आहे, ज्यामुळे भारत हा सर्वात जास्त अपंग लोक असलेला देश बनला आहे. अपंगत्व हे अत्यंत आव्हानात्मक आहे आणि त्यासोबत जगणाऱ्या व्यक्तीला सर्वात मूलभूत हक्कांसाठी आणि मुख्य प्रवाहात सामील होण्यासाठी दररोज लढा द्यावा लागतो. (Cerebral Palsy The awards will be presented by Dr. Anil Kakodkar)

ज्यांना अपंगत्व आहे आणि ते गरीब कुटुंबातून आले आहेत त्यांची अवस्था आणखी वाईट आहे आणि त्यांना शिक्षण , प्रशिक्षण आणि पुनर्वसन मिळण्यात अधिक अडचणी येतात. त्यासाठी अनेक संस्था कार्यरत आहेत. अशा संस्थांना आणि परिस्थितीशी दोन हात करत यशाचे शिखर गाठणाऱ्या दिव्यांगांचा गौरव करण्याचा निर्णय ‘सेरेब्रल पाल्सी असोसिएशन ऑफ इंडिया’ या संस्थेने घेतला आहे.

थेट मेंदूचीच ‘सत्व परीक्षा’ घेणाऱ्या गुंतागुंतीच्या ‘सेरेब्रल पाल्सी’ या दिव्यांगत्वाला आयुष्यभर सोबत घेवून उल्लेखणीय कार्य करणारे बुद्धीवंत समाजात आहेत. अशा बुद्धिवंतांचा गौरव करण्याचा निर्णय ‘सेरेब्रल पाल्सी असोसिएशन ऑफ इंडिया’ या संस्थेने घेतला आहे. त्यानुसार यंदाचा हा पहिलाच पुरस्कार सोहळा आज २८ मार्च रोजी सायंकाळी ४.३० वाजता मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट संकुलातील पदवीदान सभागृहात होणार आहे. प्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ, पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांच्या इस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

पुरस्काराचे मानकरी

यावेळी ‘महाराष्ट्र टाइम्स’चे निवासी संपादक श्री समीर कर्वे, एक्सिस फायनान्स चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री बिपीन सराफ व इतर मान्यवर उपस्थित असतील.

‘लय भारी’ सोहळ्याचा डिजिटल मीडिया प्रायोजक आहे. ‘लय भारी’चा यु ट्यूब चॅनेल व फेसबूक पेजवर हा सोहळा लाईव्ह पाहता येईल (लिंक बातमीच्या शेवटी देण्यात आली आहे).

यंदाच्या पहिल्याच वर्षी ‘सेरेब्रल पाल्सी’ या दिव्यांगत्वाने ग्रस्त असलेल्या पाच बुद्धिवंतांचा ‘रत्न श्री’ या पुरस्काराने ( ₹ 21 हजार रोख व सन्मानचिन्ह देवून ) गौरव करण्यात येणार आहे, तर अशा प्रकारचे ‘बुद्धवंत’ घडविण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या ४ संस्थांनाही ‘उत्थान रत्न’ पुरस्कार ( ₹ 25 हजार रोख व सन्मानचिन्ह ) देवून गौरविण्यात येणार आहे.

‘रत्नश्री’ पुरस्काराचे मानकरी : बसवराज पैके (लातूर), अमोल अरविंद वडगावकर (पुणे), डॉ. आदित्य लोहिया (नागपूर), अमित ओमप्रकाश बाहेती (नाशिक), रिद्धी चंपक गाडा (मुंबई)

महाराष्ट्रात Cerebral Palsy Association of India ही Cerebral Palsy या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक व समाजिक पुनर्वसन करणारी एकमेव संस्था आहे. हिची स्थापना 1968 साली प्रसिद्ध न्युरो सर्जन डॉ. नॉशीर वडिया यांनी केली आहे,
संस्थेचे हे 56 वे वर्ष आहे. गेल्या 50 वर्षात दिव्यांगाना पुरस्कार देताना सेरेब्रल पाल्सी तसेच बहुदिव्यांग या प्रवर्गातील विद्यार्थी अथवा त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था वंचित आहेत.

‘उत्थान रत्न’ पुरस्काराचे मानकरी : स्वयंम रेहाबिलेशन सेंटर (ठाणे), रा. स्व. संघ जनकल्याण समिती महाराष्ट्र प्रांत संचालित संवेदना प्रकल्प (लातूर), फेरो इक्वीप (मुंबई), फिनिस स्पोर्टस (मुंबई).

‘सेलेब्रल पाल्सी असोसिएशन ऑफ इंडिया’च्या वतीने या पुरस्कारांसाठी प्रस्ताव मागविण्यात आले होते. आलेल्या प्रस्तावांतून चांगले प्रस्ताव निवडण्यासाठी तीन सदस्यीय समिती गठीत करण्यात आली होती. या समितीमध्ये 1, डॉ रवींद्र कुलकर्णी, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ, डॉ. सुनील भागवत, संचालक, Indian Institute of Science Education and Research, Pune. डो नंदिनी गोकुलचंद्रन, Dy Dir, Medical Services and Consultant of Regenerative Medicine. यांचा समावेश होता.

या समितीने निश्चित केलेल्या 5 व्यक्ती व 4 संस्था यांना प्रस्तूत पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत, अशी माहिती असोसिएशनचे विश्वस्त श्री. यशवंत मोरे (निवृत्त राजपत्रीत अधिकारी) व श्री संदीप अग्रवाल यांनी कळविले आहे.

हा सोहळा यूट्यूबच्या https://youtube.com/@LayBhariNewsLive या लिंकवरून, तर फेसबूकच्या https://www.facebook.com/LayBhari16News या या लिंकवरूनही लाईव्ह पाहता येईल.

अधिक माहितीसाठी संपर्क : यशवंतराव मोरे, विश्वस्त, सेरेब्रल पाल्सी असोसिएशन ऑफ इंडिया (व निवृत्त राजपत्रित अधिकारी) ९४२२८०८५०५

धनश्री ओतारी

Recent Posts

अदानी-अंबानीने काँग्रेसला पैसे दिल्याचे मोदींचे विधान बेजबाबदारपणाचे; अदानी अंबानीची चौकशी करा सत्य बाहेर येईल: डॉ. भालचंद्र मुणगेकर

अदानी-अंबानी कडून काँग्रेस पक्षाला टेम्पो भरून पैसे मिळाल्यानेच राहुल गांधी आता त्यांना शिव्या देत नाहीत…

2 hours ago

बडगुजर यांच्यावरील कारवाईविरोधात महाविकास आघाडीचे नेते आक्रमक

लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सुरू असताना शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर (Badgujar )यांना बजाविण्यात आलेली…

2 hours ago

श्रीरामाचं मदीर, ३७० हे ठीक, पण शेतकरी मातीत जातोय त्याचं काय ?

लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा लवकरच होवू घातला ( Elections 2024:In Ahmednagar, Farmers Unhappy With BJP…

4 hours ago

अक्षय तृतीयेनिमित्त बाजारात होणार कोट्यवधीची उलाढाल

साडेतीन मुहूर्तपैकी एक असणाऱ्या अक्षयतृतीयेनिमित्त (Akshaya Tritiya) नाशिक शहर आणि जिल्हयात कोट्यवधींची आर्थिक उलाढाल (Crores…

6 hours ago

सीताफळ खा स्वस्थ रहा! सीताफळ खाण्याचे फायदे

अँटी-ऑक्सिडेंट गुणधर्मांनी समृद्ध असणाऱ्या सीताफळाची (custard apple) चव फार कमी लोकांना आवडते, पण या फळात…

6 hours ago

सेवा निवृत्त पोलिस अधिकाऱ्याला सुने कडुन दहा कोटी रुपयांची खंडणी मागणी

नातू सम्राटला भेटायचे असेल किंवा सम्राटला ताब्यात ठेवायचे असेल तर नवी मुंबई मध्ये जॅग्वार गाडी,…

6 hours ago