आरोग्य

जगण्यासाठी अपंगांचा संघर्ष; ‘फेरो इक्वीप’ संस्थेने दिला मदतीचा हात

सेरेब्रल पाल्सी(Cerebral Palsy) या दिव्यांगांना मदत करणाऱ्या ‘फेरो इक्वीप’ या संस्थेला प्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ, पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते  ‘उत्थान रत्न’ पुरस्कार प्रदान करत गौरवण्यात येणार आहे. (cerebral palsy Ferro Equip will be honored with the utthan ratna award) जगाच्या लोकसंख्येपैकी सुमारे 15% लोक काही प्रकारचे अपंगत्व घेऊन जगतात आणि त्यापैकी 2-4% लोकांना दैनंदिन कामकाजात गंभीर अडचणी येतात. मिळालेल्या माहितीनुसार, युनायटेड नेशन्सच्या मते, जागतिक स्तरावर अपंग व्यक्तींच्या एक अब्ज लोकसंख्येपैकी 80% विकसनशील देशांमध्ये राहतात. २०२१ मध्ये जागतिक बँकेच्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की भारतामध्ये अपंग व्यक्तींची संख्या 40 ते 80 दशलक्ष दरम्यान आहे, ज्यामुळे भारत हा सर्वात जास्त अपंग लोक असलेला देश बनला आहे. 

अपंगत्व हे अत्यंत आव्हानात्मक आहे आणि त्यासोबत जगणाऱ्या व्यक्तीला सर्वात मूलभूत हक्कांसाठी आणि मुख्य प्रवाहात सामील होण्यासाठी दररोज लढा द्यावा लागतो. अशाच या दिव्यांगांच्या पाठीशी उभं राहणासाठी अनेक संस्था आहे. त्यातीलच एक संस्था म्हणजे ‘फेरो इक्वीप’ ही संस्था.

अपंगत्वाचे २१ प्रकार आहेत. त्यातील एक प्रकार म्हणजे सेरेब्रल पाल्सी(Cerebral Palsy). मेंदू शरिराला जो संदेशवहन करतो, त्यातच अपाय असतो. त्यामुळे अशा व्यक्तीला अनेक शारीरिक व मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते, असे या ‘सेरेब्रल पाल्सी’ दिव्यांगत्वाचे स्वरूप आहे. याचं दुर्धर आजाराने ग्रासलेल्या व्यक्तींना आधार देण्यासाठी ‘फेरो इक्वीप’ ही संस्था धावून आली आहे.

सेरेब्रल पाल्सी (Cerebral Palsy) सारख्या दिव्यांग व्यक्तींना शारीरिक, सामाजिक, भावनिक, मानसिक समस्यांना सामोरं जावं लागतं. त्यामुळं कुटुंबिय सुद्धा हतबल होतात. अशा दिव्यांगांनाही सामान्य लोकांप्रमाणं जीवन जगण्याची संधी मिळाली तर ते सुद्धा आनंदी, उत्साही व समाधानी दिसतील. एवढच नाही तर ते उदात्त कामगिरीही करू शकतील. दिव्यांगाचं दैनंदिन आयुष्य सुखकारक करण्यासाठी आवश्यक असलेली साधनं निर्माण करण्याचं मोठं काम ‘फेरो इक्वीप’ ही संस्था करतेय.

फर्डिनांड रॉर्डिग्ज हे गेली ४० वर्षे ‘फेरो इक्वीप’च्या माध्यमातून सेलेब्रल पाल्सी व अन्य दिव्यांगासाठीचं हे मौलिक कार्य करताहेत. बसण्याची खूर्ची, दोन चाकी सायकल किंवा तीन चाकी सायकल, मोटार सायकल, चार चाकी वाहन… अशी उपकरणं दिव्यांग व्यक्तींसाठी सोयीस्कर बनविण्याची किमया फर्डिनांड रॉर्डिग्ज करतात. संबंधित वाहन हाताने नियंत्रित करायचे की पायाने… अशी प्रत्येक दिव्यांगाची गरज वेगळी असते. या गरजेनुसार वाहनांमध्ये आमुलाग्र बदल केले जातात. त्यामुळे दिव्यांग व्यक्तीलाही त्या वाहनांचा वापर सामान्य व्यक्तीप्रमाणे करता येतो.

स्टिफन हॉकिंग हे बुद्धिमान दिव्यांग मान्यवर भारतात आले तेव्हा त्यांच्यासाठी अलिशान चार चाकी वाहन ‘फेरो इक्वीप’नं बनविलं होतं. त्यांच्या या कार्याची महती केवळ भारतातच नाही, तर जगात पोहोचलेली आहे. त्यांना असंख्य पुरस्कार मिळालेत. लंडनच्या प्रतिनिधीगृहात मिळालेला महात्मा गांधी सन्मान त्यांच्या या कार्याची मोठी पोचपावती आहे. त्यांनी फाऊंडेशनची सुद्धा स्थापना केली असून दिव्यांग व वंचित व्यक्तींसाठी सामाजिक, शैक्षणिक असे विविध उपक्रम राबविले जातात. म्हणूनच ‘फेरो इक्वीप’ या संस्थेचा ‘उत्थान रत्न’ या पुरस्काराने गौरव करताना आम्हांस विशेष आनंद होत आहे.

थेट मेंदूचीच ‘सत्व परीक्षा’ घेणाऱ्या गुंतागुंतीच्या ‘सेरेब्रल पाल्सी’ या दिव्यांगत्वाला आयुष्यभर सोबत घेवून उल्लेखणीय कार्य करणारे बुद्धीवंत समाजात आहेत. अशा बुद्धिवंतांचा गौरव करण्याचा निर्णय ‘सेरेब्रल पाल्सी असोसिएशन ऑफ इंडिया’ या संस्थेने घेतला आहे. त्यानुसार यंदाचा हा पहिलाच पुरस्कार सोहळा आज गुरुवारी, २८ मार्च रोजी सायंकाळी ४.३० वाजता मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट संकुलातील पदवीदान सभागृहात होणार आहे. प्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ, पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

यावेळी ‘महाराष्ट्र टाइम्स’चे निवासी संपादक श्री समीर कर्वे, एक्सिस फायनान्स चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री बिपीन सराफ व इतर मान्यवर उपस्थित असतील.

‘लय भारी’ सोहळ्याचा डिजिटल मीडिया प्रायोजक आहे. ‘लय भारी’चा यु ट्यूब चॅनेल व फेसबूक पेजवर हा सोहळा लाईव्ह पाहता येईल (लिंक बातमीच्या शेवटी देण्यात आली आहे).

यंदाच्या पहिल्याच वर्षी ‘सेरेब्रल पाल्सी’ या दिव्यांगत्वाने ग्रस्त असलेल्या पाच बुद्धिवंतांचा ‘रत्न श्री’ या पुरस्काराने ( ₹ 21 हजार रोख व सन्मानचिन्ह देवून ) गौरव करण्यात येणार आहे, तर अशा प्रकारचे ‘बुद्धवंत’ घडविण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या ४ संस्थांनाही ‘उत्थान रत्न’ पुरस्कार ( ₹ 25 हजार रोख व सन्मानचिन्ह ) देवून गौरविण्यात येणार आहे.

‘रत्नश्री’ पुरस्काराचे मानकरी : बसवराज पैके (लातूर), अमोल अरविंद वडगावकर (पुणे), डॉ. आदित्य लोहिया (नागपूर), अमित ओमप्रकाश बाहेती (नाशिक), रिद्धी चंपक गाडा (मुंबई)

‘उत्थान रत्न’ पुरस्काराचे मानकरी : स्वयंम रेहाबिलेशन सेंटर (ठाणे), रा. स्व. संघ जनकल्याण समिती महाराष्ट्र प्रांत संचालित संवेदना प्रकल्प (लातूर), फेरो इक्वीप (मुंबई), फिनिस स्पोर्टस (मुंबई).

‘सेलेब्रल पाल्सी असोसिएशन ऑफ इंडिया’च्या वतीने या पुरस्कारांसाठी प्रस्ताव मागविण्यात आले होते. आलेल्या प्रस्तावांतून चांगले प्रस्ताव निवडण्यासाठी तीन सदस्यीय समिती गठीत करण्यात आली होती. या समितीमध्ये 1, डॉ रवींद्र कुलकर्णी, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ, 2, डॉ सुनील भागवत, संचालक, Indian Institute of Science Education and Research, Pune.
3, डो नंदिनी गोकुलचंद्रन, Dy Dir, Medical Services and Consultant of Regenerative Medicine.
यांचा समावेश होता.

या समितीने निश्चित केलेल्या 5 व्यक्ती व 4 संस्था यांना प्रस्तूत पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत, अशी माहिती असोसिएशनचे विश्वस्त श्री. यशवंत मोरे (निवृत्त राजपत्रीत अधिकारी) व श्री संदीप अग्रवाल यांनी कळविले आहे.

हा सोहळा यूट्यूबच्या https://youtube.com/@LayBhariNewsLive या लिंकवरून, तर फेसबूकच्या https://www.facebook.com/LayBhari16News या या लिंकवरूनही लाईव्ह पाहता येईल.

अधिक माहितीसाठी संपर्क : यशवंतराव मोरे, विश्वस्त, सेरेब्रल पाल्सी असोसिएशन ऑफ इंडिया (व निवृत्त राजपत्रित अधिकारी) ९४२२८०८५०५

धनश्री ओतारी

Recent Posts

मतदान जनजागृतीसाठी नाशिक मनपातर्फे चित्रकला व मेहंदी स्पर्धेचे आयोजन

नाशिक महापालिका (NMC) व क्रेडाई यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या बुधवारी (दि.8) शहरातील गोल्फ क्लब येथे…

2 hours ago

नो-पार्किंग’मधील वाहनांकडे ‘कानाडोळा’! सोयीनुसार वाहनांची टोईंग

शहर पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये गेल्या आठवडाभरापासून वाहनांच्या टोईंगची (Towing) कारवाई सुरू झालेली आहे. मात्र असे…

2 hours ago

रुपाली चाकणकर यांच्या अडचणी वाढल्या; EVM मशीनची केली पूजा; दाखल झाला गुन्हा

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी ईव्हीएम मशीनची पूजा (worship of EVM…

3 hours ago

राहुल गांधींनी रायबरेलीच का निवडलं?

मै शेरनी हूं और लढना भी जानती हूं, हे वाक्य आहे नुकत्याच झालेल्या रायबरेली(Raebareli) येथील…

3 hours ago

गुणरत्न सदावर्तेंना मोठा धक्का; त्या प्रकरणाचा निकाल आला; बायकोचं पदही गेलं

गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांना सहकार खात्याने मोठा धक्का दिला आहे. एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या (ST…

3 hours ago

चर बाबत शासनाकडून अद्याप प्रतिसाद नाहीच;पाणी कपातीचे संकट कायम

उन्हाच्या वाढत्या झळांसोबतच नाशिककरांवर पाणी कपातीची ( Water crisis ) टांगती तलवार कायम आहे. त्यातच…

4 hours ago