आरोग्य

दिव्यांगत्व आलं तरी व्हीलचेअर तिच्या यशाच्या आडवी आली नाही, वाचा रिद्धीची यशोगाथा

सेरेब्रल पाल्सी (Cerebral Palsy) हे दिव्यांगत्व आलेली रिद्धी चंपक गडा (Riddhi Champak Gada) यांचा गौरव करण्याचा निर्णय ‘सेरेब्रल पाल्सी असोसिएशन ऑफ इंडिया’ या संस्थेने घेतला आहे. त्यानुसार यंदाचा हा पहिलाच पुरस्कार सोहळा येत्या गुरुवारी, २८ मार्च रोजी सायंकाळी ४.३० वाजता मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट संकुलातील पदवीदान सभागृहात होणार आहे. (cerebral palsy Riddhi Champak Gada will be felicitated by dr anil kakodkar)

३३ वर्षीय रिद्धी या जन्मतःच सेरेब्रल पाल्सीपासून उद्भवलेल्या गंभीर समस्यांनी ग्रासलेल्या आहेत. त्या आयुष्यभर चालू शकणार नाही, उभी राहू शकणार नाही असे डॉक्टरांनी लहानपणीच सांगितलं होतं. तिच्या आई वडिलांनी मात्र तिला सर्व अधिकार व समान दर्जा मिळवून देण्यासाठी जे जे करणं आवश्यक आहे ते सगळं केलं. महागडे उपचारही केले. पण फारसा उपयोग झाला नाही. मात्र, रेब्रल पाल्सी या आजाराशी दोन हात करत रिद्धी यांनी यशाची पायरी चढली. जाणून घेऊयात त्यांच्याबद्दल…

रिद्धी यांना विविध मॅरेथॉन स्पर्धांमध्ये सहभागी व्हायला आवडतं. त्यांनी आतापर्यंत १६ आंतरराष्ट्रीय, १४ राष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धांमध्ये सहभाग घेतलाय. व्हिलचेअरवरून तब्बल ३० मॅरेथॉन स्पर्धा पूर्ण करण्याचा विक्रम तिनं केलाय. मॅरेथॉनमध्ये धावताना हातात फलक घेवून ती सामाजिक, शैक्षणिक संदेश देत असते. तिने ५० पेक्षा जास्त पारितोषिकं व पुरस्कार मिळवले आहेत.

जाणून घेऊयात सेरेब्रल पाल्सी आजारासंदर्भात…

महाराष्ट्राचे तत्कालिन उप मुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांनीही त्यावेळी रिद्धी यांचं कौतुक केलं होतं. रासगरबा नृत्य करायला त्यांना खुप आवडतं. निबंध स्पर्धेतही त्या भाग घेत असतात. निवडणुका जवळ आल्या की, जनजागृती करून मतदारांना मतदान करण्यासाठी त्या आवाहन करतात. पण, राष्ट्रगीत सुरू झालं की, या गीताचा सन्मान राखण्यासाठी त्यांना उभं राहता येत नाही ही एकच सल त्यांच्या मनात आहे.

तिचा भाऊ अमेरिकेत आहे. त्याच्याशी ती मोबाईलवरून नियमितपणे व्हिडीओ कॉल करून जगभरातील ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न करीत असते. सेरेब्रल पाल्सीमुळे अनेक समस्या असूनही ती उत्साही व समाधानी राहते, आणि आपल्या परीने सामाजिक कार्यही करते. रिद्धीच्या या जिद्दीला प्रोत्साहन म्हणून तिचा ‘रत्न श्री’ या पुरस्काराने गौरव करताना आम्हांस विशेष आनंद होत आहे.

रिद्धी यांना रत्न श्री पुरस्काराने गौरवण्यात येणार

थेट मेंदूचीच ‘सत्व परीक्षा’ घेणाऱ्या गुंतागुंतीच्या ‘सेरेब्रल पाल्सी’ या दिव्यांगत्वाला आयुष्यभर सोबत घेवून उल्लेखणीय कार्य करणारे बुद्धीवंत समाजात आहेत. अशा बुद्धिवंतांचा गौरव करण्याचा निर्णय ‘सेरेब्रल पाल्सी असोसिएशन ऑफ इंडिया’ या संस्थेने घेतला आहे. त्यानुसार यंदाचा हा पहिलाच पुरस्कार सोहळा येत्या गुरुवारी, २८ मार्च रोजी सायंकाळी ४.३० वाजता मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट संकुलातील पदवीदान सभागृहात होणार आहे.

महाराष्ट्रातील दुर्लक्षित घटकांचे अचंबित करणारे कर्तृत्व, डॉ. अनिल काकोडकरांच्या हस्ते होणार गौरव

प्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ, पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांच्या इस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
यावेळी ‘महाराष्ट्र टाइम्स’चे निवासी संपादक श्री समीर कर्वे, एक्सिस फायनान्स चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री बिपीन सराफ व इतर मान्यवर उपस्थित असतील.

‘लय भारी’ सोहळ्याचा डिजिटल मीडिया प्रायोजक आहे. ‘लय भारी’चा यु ट्यूब चॅनेल व फेसबूक पेजवर हा सोहळा लाईव्ह पाहता येईल (लिंक बातमीच्या शेवटी देण्यात आली आहे).

यंदाच्या पहिल्याच वर्षी ‘सेरेब्रल पाल्सी’ या दिव्यांगत्वाने ग्रस्त असलेल्या पाच बुद्धिवंतांचा ‘रत्न श्री’ या पुरस्काराने ( ₹ 21 हजार रोख व सन्मानचिन्ह देवून ) गौरव करण्यात येणार आहे, तर अशा प्रकारचे ‘बुद्धवंत’ घडविण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या ४ संस्थांनाही ‘उत्थान रत्न’ पुरस्कार ( ₹ 25 हजार रोख व सन्मानचिन्ह ) देवून गौरविण्यात येणार आहे.

धनश्री ओतारी

Recent Posts

‘काँग्रेस कसाबची बाजू घेतेय, हा शहिदांचा अपमान’, PM मोदींचा हल्लाबोल

काँग्रेसवाले मिळून दहशतवादी कसाबची बाजू घेतायत. काँग्रेसच्या काळात विदेश राज्यमंत्री राहिले आणि कुटुंबातील जवळच्यानेही कसाबला…

2 hours ago

शांतिगिरी महाराज यांना माघारीसाठी दोन वेळा संपर्क : मुख्यमंत्री शिंदे

राजकीय अधिष्ठानापेक्षा धार्मिक अधिष्ठान नेहमी मोठे असते . त्यामुळे मी स्वतः महंत शांतिगिरी महाराज (Shantigiri…

2 hours ago

तुम्ही तर महागद्दार निघाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ; ठाकरेंवर हल्लाबोल

विजय करंजकर यांच्या भावना योग्य आहे. लोकसभेच्या उमेदवारीसाठी आदल्या दिवासापर्यंत त्यांच नाव चर्चेत होत. तसंच…

2 hours ago

अमेरिकेत ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’चे शंभर शोज ‘हाऊसफुल्ल’

'गीतरामायणा'ला स्वरसाज देणारे संगीतकार, गायक सुधीर फडके म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके बाबूजी यांची जीवनगाथा सांगणारा…

2 hours ago

राजाभाऊ वाजेंच्या प्रचारासाठी डी.जी.सूर्यवंशी समन्वयक

नाशिक लोकसभा मतदार संघातील उमेदवार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waze) यांच्या प्रचाराची धुरा सांभाळण्यासाठी महाविकास आघाडीचे…

3 hours ago

नरेंद्र मोदी फेकाडे, इंदिरा गांधी कर्तृत्ववान

लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. देशभरातील वातावरण ढवळून निघाले आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश…

6 hours ago