30 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeआरोग्यमहाराष्ट्रातील दुर्लक्षित घटकांचे अचंबित करणारे कर्तृत्व, डॉ. अनिल काकोडकरांच्या हस्ते होणार गौरव

महाराष्ट्रातील दुर्लक्षित घटकांचे अचंबित करणारे कर्तृत्व, डॉ. अनिल काकोडकरांच्या हस्ते होणार गौरव

सेरेब्रल पाल्सी हे मेंदूशी संबंधित दिव्यांगत्व असलेल्या कर्तृत्ववान व्यक्ती व संस्थांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. दिव्यांगत्वाचे एकूण २१ प्रकार आहेत.’सेरेब्रल पाल्सी’ या जटिल व्यंगत्वाचाही त्यात समावेश होतो. मेंदू शरिराला जो संदेशवहन करतो, त्यातच अपाय असतो. त्यामुळे अशा व्यक्तीला अनेक शारीरिक व मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते, असे या ‘सेरेब्रल पाल्सी’ दिव्यांगत्वाचे स्वरूप आहे. या संदेशवहनाच्या अडथळ्यांमुळे पायात व्यंग, बोलता न येणे अशा व्यक्तिपरत्वे अनेक समस्या भेडसावत असतात.

थेट मेंदूचीच ‘सत्व परीक्षा’ घेणाऱ्या गुंतागुंतीच्या ‘सेरेब्रल पाल्सी’ या दिव्यांगत्वाला आयुष्यभर सोबत घेवून उल्लेखणीय कार्य करणारे बुद्धीवंत समाजात आहेत. अशा बुद्धिवंतांचा गौरव करण्याचा निर्णय ‘सेरेब्रल पाल्सी असोसिएशन ऑफ इंडिया’ या संस्थेने घेतला आहे. त्यानुसार यंदाचा हा पहिलाच पुरस्कार सोहळा येत्या गुरुवारी, २८ मार्च रोजी सायंकाळी ४.३० वाजता मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट संकुलातील पदवीदान सभागृहात होणार आहे. प्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ, पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांच्या इस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

यावेळी ‘महाराष्ट्र टाइम्स’चे निवासी संपादक श्री समीर कर्वे, एक्सिस फायनान्स चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री बिपीन सराफ व इतर मान्यवर उपस्थित असतील.

‘लय भारी’ सोहळ्याचा डिजिटल मीडिया प्रायोजक आहे. ‘लय भारी’चा यु ट्यूब चॅनेल व फेसबूक पेजवर हा सोहळा लाईव्ह पाहता येईल (लिंक बातमीच्या शेवटी देण्यात आली आहे).

यंदाच्या पहिल्याच वर्षी ‘सेरेब्रल पाल्सी’ या दिव्यांगत्वाने ग्रस्त असलेल्या पाच बुद्धिवंतांचा ‘रत्न श्री’ या पुरस्काराने ( ₹ 21 हजार रोख व सन्मानचिन्ह देवून ) गौरव करण्यात येणार आहे, तर अशा प्रकारचे ‘बुद्धवंत’ घडविण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या ४ संस्थांनाही ‘उत्थान रत्न’ पुरस्कार ( ₹ 25 हजार रोख व सन्मानचिन्ह ) देवून गौरविण्यात येणार आहे.

‘रत्नश्री’ पुरस्काराचे मानकरी : बसवराज पैके (लातूर), अमोल अरविंद वडगावकर (पुणे), डॉ. आदित्य लोहिया (नागपूर), अमित ओमप्रकाश बाहेती (नाशिक), रिद्धी चंपक गाडा (मुंबई)

महाराष्ट्रात Cerebral Palsy Association of India ही Cerebral Palsy या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक व समाजिक पुनर्वसन करणारी एकमेव संस्था आहे. हिची स्थापना 1968 साली प्रसिद्ध न्युरो सर्जन डॉ. नॉशीर वडिया यांनी केली आहे,
संस्थेचे हे 56 वे वर्ष आहे. गेल्या 50 वर्षात दिव्यांगाना पुरस्कार देताना सेरेब्रल पाल्सी तसेच बहुदिव्यांग या प्रवर्गातील विद्यार्थी अथवा त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था वंचित आहेत.

पुरस्काराचे मानकरी

आदित्या लोहिया

आदित्या लोहिया
आदित्या लोहिया

अमोल वडगावकर

अमोल वडगावकर आपल्या आईसोबत
अमोल वडगावकर आपल्या आईसोबत

अमित बाहेती

अमित बाहेती
अमित बाहेती

बसवराज पैके

बसवराव पैके
बसवराव पैके

‘उत्थान रत्न’ पुरस्काराचे मानकरी : स्वयंम रेहाबिलेशन सेंटर (ठाणे), रा. स्व. संघ जनकल्याण समिती महाराष्ट्र प्रांत संचालित संवेदना प्रकल्प (लातूर), फेरो इक्वीप (मुंबई), फिनिस स्पोर्टस (मुंबई).

‘सेलेब्रल पाल्सी असोसिएशन ऑफ इंडिया’च्या वतीने या पुरस्कारांसाठी प्रस्ताव मागविण्यात आले होते. आलेल्या प्रस्तावांतून चांगले प्रस्ताव निवडण्यासाठी तीन सदस्यीय समिती गठीत करण्यात आली होती. या समितीमध्ये 1, डॉ रवींद्र कुलकर्णी, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ, डॉ. सुनील भागवत, संचालक, Indian Institute of Science Education and Research, Pune. डो नंदिनी गोकुलचंद्रन, Dy Dir, Medical Services and Consultant of Regenerative Medicine. यांचा समावेश होता.

या समितीने निश्चित केलेल्या 5 व्यक्ती व 4 संस्था यांना प्रस्तूत पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत, अशी माहिती असोसिएशनचे विश्वस्त श्री. यशवंत मोरे (निवृत्त राजपत्रीत अधिकारी) व श्री संदीप अग्रवाल यांनी कळविले आहे.

हा सोहळा यूट्यूबच्या https://youtube.com/@LayBhariNewsLive या लिंकवरून, तर फेसबूकच्या https://www.facebook.com/LayBhari16News या या लिंकवरूनही लाईव्ह पाहता येईल.

अधिक माहितीसाठी संपर्क : यशवंतराव मोरे, विश्वस्त, सेरेब्रल पाल्सी असोसिएशन ऑफ इंडिया (व निवृत्त राजपत्रित अधिकारी) ९४२२८०८५०५

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी