आरोग्य

Corona : महाराष्ट्रात पुन्हा कोरोनाचा कहर! एकट्या ठाण्यात एका दिवसांत 43 नवे रुग्ण

महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात नविन कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. मंगळवारी (1 नोव्हेंबर) हाती आलेल्या रिपोर्ट नुसार एकट्या ठाणे जिल्ह्यात 43 नवे रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात कोविड-19 चे 43 नवीन रुग्ण आढळल्यानंतर एकूण संसर्गग्रस्तांची संख्या 7,46,733 वर पोहोचली आहे. मंगळवारी एका आरोग्य अधिकाऱ्याने सांगितले की, जिल्ह्यात कोविड-19 वर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 300 झाली आहे. त्यांनी सांगितले की ठाण्यात कोरोना विषाणूमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 11,965 वर आहे. कोविड-19 मधून बरे झालेल्या लोकांची संख्या 7,35,174 वर पोहोचली आहे.

गेल्या 24 तासात किती रुग्ण आढळले
भारतातील कोरोना संसर्गाचा कहर अद्याप संपलेला नाही. जर आपण गेल्या 24 तासांबद्दल बोललो, तर कोविड -19 चे 1 हजार 326 नवीन रुग्ण आढळले आहेत. यानंतर कोरोनाबाधितांची एकूण संख्या 4 कोटी 46 लाख 53 हजार 592 झाली आहे. कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची आदल्या दिवशीच्या आकडेवारीशी तुलना केली, तर ती 18 हजार 317 वरून 17 हजार 912 वर आली आहे. याचाच अर्थ गेल्या 24 तासांत कोविडच्या 405 सक्रिय रुग्णांची घट नोंदवण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

ShivSena : मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिल्यास आठ दिवसांत राजीनामा देईन; आदित्य ठाकरे यांना सत्तारांचे आव्हान

Gujarat Bridge Collapsed : रक्ताचा सडा बघायला येणाऱ्या मोदींसाठी रुग्णालयात रंगरंगोटी! काँग्रेस आक्रमक

CNG Crisis : पुढचे काही दिवस पुणेकरांना ‘सीएनजी’ नाही

सोमवारी (31 ऑक्टोबर) सकाळी 8 वाजेपर्यंत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या नव्या आकडेवारीनुसार, आदल्या दिवशी आठ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आता कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 5 लाख 29 हजार 024 वर पोहोचली आहे. या आठ मृत्यूंमध्ये पाच जणांचाही समावेश आहे, ज्यांची नावे संसर्गामुळे मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांच्या यादीत सामील झाली आहेत.

आकडेवारीनुसार, सक्रिय रुग्णांची संख्या कोरोना संसर्गाच्या एकूण प्रकरणांपैकी 0.04 टक्के आहे, तर कोविड-19 मधून बरे होण्याचा राष्ट्रीय दर 98.78 टक्के झाला आहे. गेल्या 24 तासांत कोविड-19 च्या सक्रिय रुग्णांच्या संख्येत 405 ची घट नोंदवण्यात आली आहे.

प्रणव ढमाले

Recent Posts

पुण्यात सशस्त्र दरोडा! सात जणांनी लुटलं सोन्याचं दुकान

पुण्यात भर दिवसा बीजेएफ ज्वेलर्सच्या दुकानात (gold shop) सशस्त्र दरोडा टाकण्यात आल्याची घटना समोर आली…

3 mins ago

काँग्रेसने मागासवर्गीयांच्या आरक्षणाला कायमच विरोध केला; के. लक्ष्मण यांचा हल्लाबोल

मोदी सरकारच्या 10 वर्षांतील गरीब कल्याण योजनांच्या यशामुळे काँग्रेसकडे प्रचारासाठी मुद्देच नसल्याने आरक्षण आणि संविधानाच्या…

58 mins ago

दिव्यांग सशक्तीकरणासाठी मोदींच्या हमीवर विश्वास; विकास शर्मा

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सरकारच्या निर्णयांमुळे दिव्यांगांच्या सशक्तीकरणासाठी (Divyangs empowerment) मोठी मदत…

2 hours ago

संविधाना संदर्भात वारंवार कॉग्रेस कडून जनतेची दिशाभुल – माजी मंत्री दिलीप कांबळे

गेल्या 10 वर्षे या देशाचा सर्व क्षेत्रात झपाटयाने विकास होत आहे. 2014 ते 2024 या…

2 hours ago

मतदान हे देशासाठी आणि देशाच्या विकासासाठी करा – मंत्री छगन भुजबळ

मतदान हे देशासाठी देशाच्या विकासासाठी करा असे सांगत केंद्रात नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी…

2 hours ago

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला हात लावाल तर भाजपाचे नामोनिशान राहणार नाही: मल्लिकार्जून खर्गे

पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यंत्रणांच्या माध्यमातून विरोधकांना जेलमध्ये टाकण्याचे काम केले.…

3 hours ago