36 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रShivSena : मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिल्यास आठ दिवसांत राजीनामा देईन; आदित्य ठाकरे यांना...

ShivSena : मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिल्यास आठ दिवसांत राजीनामा देईन; आदित्य ठाकरे यांना सत्तारांचे आव्हान

राज्याचे कृषी मंत्री आणि सिल्लोडचे आमदार अब्दूल सत्तार यांनी प्रतिआव्हान देत म्हणाले, त्यांच्या एका नेत्याने वक्तव्य केले तुम्हाला दोन वर्षानंतर कळेल की निवडणूक काय असते. मी म्हणालो दोन वर्ष कशाला वाट बघायची आता ही माझे चॅलेंज आहे की, त्यांनी नाही दिला तरी मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली की आठवडाभराच्या आत राजीनामा देईन, असे देखील सत्तार म्हणाले.

शिवसेनेते उभी फूट पडल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी शिवसेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ची पडती बाजू सांभाळत आक्रमकपणे बंडखोरांचा समाचार घेत आहेत. जे आमदार शिवसेना सोडून गेले त्यांनी राजीनामा द्यावा आणि निवडून येऊन दाखवावे असे आव्हान त्यांना देत आहेत, यावर आता राज्याचे कृषी मंत्री आणि सिल्लोडचे आमदार अब्दूल सत्तार यांनी प्रतिआव्हान देत म्हणाले, त्यांच्या एका नेत्याने वक्तव्य केले तुम्हाला दोन वर्षानंतर कळेल की निवडणूक काय असते. मी म्हणालो दोन वर्ष कशाला वाट बघायची आता ही माझे चॅलेंज आहे की, त्यांनी नाही दिला तरी मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली की आठवडाभराच्या आत राजीनामा देईन, असे देखील सत्तार म्हणाले.
यावेळी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकार दुप्पट नुकसान भरपाई देईल, असा दिलासा देत म्हाणाले, ज्या शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे तो सरकारच्या मदतीपासून वंचित राहणार नाही. याबाबत मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा केली आहे. मी स्वतः अनेक जिल्ह्यांमध्ये जाऊन नुकसाग्रस्तांना भेट दिली. नुकसान झालेला एक ही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, असे देखील सत्तार यांनी यावेळी सांगितले.
हे देखील वाचा :

Gujarat Bridge Collapsed : रक्ताचा सडा बघायला येणाऱ्या मोदींसाठी रुग्णालयात रंगरंगोटी! काँग्रेस आक्रमक

CNG Crisis : पुढचे काही दिवस पुणेकरांना ‘सीएनजी’ नाही

Maharashtra Politics : महाराष्ट्राचा सत्तासंघर्ष पुन्हा लांबणीवर; न्यायालयाने सांगितली पुढील सुनावणीची तारीख

यावेळी बोलताना सत्तार यांनी उद्धव ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर देखील टीका केली. ठाकरे यांचा दौरा अडीच तासांचा होता. त्या अडीच तासांमध्ये ते २४ मिनिटेच शेतकऱ्यांच्या बांधावर होते, त्या २४ मिनिटांमध्ये ठाकरे यांना काय दिसले मला माहित नाही, आम्ही २४ दिवस शेतकऱ्यांच्या बांधावर होतो. ते मुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक घोषणा केल्या पण त्यांना आता शेतकऱ्यांची आठवण राहीली नाही, असे देखील ते यावेळी म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी