आरोग्य

जाणून घेऊयात सेरेब्रल पाल्सी आजारासंदर्भात…

दोन वर्षापूर्वी म्हणजेच १ मार्च २०२२ मध्ये मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेलांचा (Satya Nadella) 26 वर्षांचा मुलगा झेन नाडेला याचं निधन झालं. झेनला सेरेब्रल पाल्सी (Cerebral Palsy) आजार झाला होता. त्याच्या निधनानंतर जगभरात या आजाराची चर्चा झाली. सेरेब्रल पाल्सी(Cerebral Palsy) हा आजार नेमका काय आहे आणि या आजारामुळे शरीरावर नेमके काय परिणाम होतात, हे आपण जाणून घेऊयात. (What is Cerebral Palsy)

सेरेब्रल पाल्सी या नावातल्या सेरेब्रलचा अर्थ मेंदूशी निगडीत आणि पाल्सी म्हणजे स्नायूंमधील कमकुवतपणा किंवा स्नायूंच्या हालचालींमध्ये येणाऱ्या अडचणी. सेरेब्रल पाल्सी असणाऱ्या व्यक्तीला स्नायूंवर योग्य नियंत्रण ठेवणं कठीण जातं आणि त्यामुळे शारीरिक हालचालींवर त्याचे परिणाम होतात.

मेंदूचा भाग पाहिजे तसा विकसित होत नाही किंवा जन्माच्या वेळी किंवा नंतर काही अडचणी आल्यास सेरेब्रल पाल्सीची समस्या उद्भवू शकते. काहीजणांना जन्मजात सेरेब्रल पाल्सी असते. तर काहींना जन्मानंतर हा त्रास सुरू होतो.

सेरेब्रल पाल्सी कशामुळे होतो?

जन्माआधी, जन्माच्या वेळी किंवा जन्मानंतर लगेचच नाजूक, अपरिपक्व, विकसनशील मेंदूला इजा वा नुकसान पोहोचल्याने ही सेरेब्रल पाल्सी डिसॉर्डर होते. बहुतांश वेळा बाळ गर्भाशयात असतानाच निर्माण झालेल्या अडचणींचा परिणाम गर्भाशयातल्या बाळाच्या मेंदूच्या विकासावर होतो. गर्भाशयातल्या बाळाला होणारा रक्तपुरवठा किंवा ऑक्सिजन पुरवठा कमी झाल्यास बाळाच्या मेंदूला इजा होऊ शकते.

चहा, कॉफी नाही… तर सकाळी रिकाम्या पोटी करा ‘या’ 3 गोष्टींचे सेवन, रोगांपासून रहा दूर

गर्भवती महिलेला रुबेला, कांजिण्या, टॉक्सोप्लाझ्मोसिस किंवा सायटोमेगालोव्हायरसचं इन्फेक्शन झाल्यास त्याचा परिणाम बाळावर होऊ शकतो. स्ट्रोकमुळे बाळाच्या मेंदूत रक्तस्राव झाल्यास वा मेंदूला होणारा रक्तपुरवठा बंद झाल्यास धोका निर्माण होऊ शकतो. जन्मापूर्वीच गर्भाशयातल्या बाळाच्या मेंदूला झालेली इजाही सेरेब्रल पाल्सीसाठी कारणीभूत ठरू शकते.

सेरेब्रल पाल्सीची कारणे

  • मुलाच्या जन्मादरम्यान गर्भाशयात किंवा नंतर मेंदूमध्ये रक्तस्त्राव
  • महत्वाच्या अवयवांमध्ये रक्त प्रवाह कमी होणे
  • जन्माच्या वेळी किंवा जन्मानंतर पहिल्या महिन्यात फिट्स येणे
  • अनुवांशिक परिस्थिती
  • मेंदूच्या दुखापती

केसांच्या वाढीसाठी पालक आहे रामबाण उपाय, जाणून घ्या कसा करायचा वापर

लक्षणे कोणती?

स्नायूंमध्ये ताठरपणा येणे होणे हे महत्वाचे लक्षण आहे, धक्का किंवा धक्कादायक अनैच्छिक हालचाली होणे, मंद हालचाली होणे, तसेच चालताना अडचणी येणे, एका हातानेच काम करता येणे, कपड्यांचे बटण लावण्यात अडचणी येणे.
सेरेब्रल पाल्सीमुळे संपूर्ण शरीरावर परिणाम होऊ शकतो. तसच तो शरीराची एक किंवा दोन अंग, किंवा शरीराच्या एका बाजूवर परिणाम करू शकतो. हालचाली आणि समन्वयात अडथळा, बोलणे, खाण्याच्या समस्या अशी लक्षणे असतात.

धनश्री ओतारी

Recent Posts

महात्मा गांधी येथे आगीत दोन दुकाने जळून खाक

आज सायंकाळी सहाच्या वाजेच्या सुमारास टाऊन हॉल समोर असलेल्या खलील भाई बॅटरीवाला यांच्या दुकानाला आग…

11 hours ago

नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर धावत्या कारने घेतला पेट

सध्या जिल्ह्यासह राज्यभरात उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे. या वाढत्या उन्हामुळे अनेकदा धावत्या वाहनांना आग…

11 hours ago

उद्धव ठाकरे तर मानसिक आजारी आहेत : चंद्रशेखर बावनकुळे

उद्धव ठाकरे यांना पराभव दिसू लागल्याने त्यांचे मानसिक संतुलन ढासळले आहे. ते चिडलेले आहेत, घाबरलेले…

12 hours ago

मालेगाव येथे शाळेच्या आवारातून १ लाखाची एमडी पावडर जप्त; तिघांना अटक

शहरातील जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावरील म्युन्सिपल हायस्कूल, कन्या शाळेच्या आवारात शहर पोलिसांनी छापा टाकून सुमारे एक…

13 hours ago

नरेंद्र मोदींचा रोड शो जनतेच्या पैशातून, महापालिकेने केला साडेतीन कोटीचा खर्च; संजय राऊत यांचा आरोप

घाटकोपरमध्ये बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोडशो झाला या रोडशोसाठी संपूर्ण मुंबईला वेठीस धरण्यात आले…

14 hours ago

पपई खाण्याचे आरोग्यदायी फायदे

पपई (papaya) ही आरोग्यासाठी (Health) खूप फायदेशीर ( benefits) मानली जाते. यामध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-सी,…

15 hours ago