नोकरी

१५ मार्च रोजी आझाद मैदानावर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा आक्रोश मोर्चा

टीम लय भारी 

मुंबई:  अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी बजेट मध्ये कुठल्याही प्रकारची तरतूद न केल्यामुळे येत्या 15 मार्च रोजी अंगणवाडी कर्मचारी आझाद मैदानात आक्रोश मोर्चा काढणार आहेत. गेल्या काही महिन्यांपासून अंगणवाडी कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी सातत्याने आंदोलनात उतरलेल्या आहेत. मानधनात वाढ, मासिक पेन्शन, नवीन मोबाईल, दैनंदिन माहिती भरण्यासाठी मराठीमधील चांगले ॲप, लाभार्थ्यांना चांगला पूरक पोषण आहार, अंगणवाड्यांच्या भाड्यात वाढ, किरकोळ खर्चासाठीच्या रकमेत वाढ, रिक्त जागांवर भरती, पदोन्नती आदी मागण्यांसाठी त्यांनी सर्व जिल्ह्यांमध्ये अनेकदा आंदोलने केली आहे. २३ फेब्रुवारी रोजी आझाद मैदानावर धरणे आंदोलन केले. महिला व बालविकास विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती कुंदन यांनी शिष्टमंडळाला भेट दिली व अनेक आश्वासने दिली. तीन दिवसांचे आंदोलन त्यांच्या आश्वासनामुळे पहिल्याच दिवशी मागे घेतले गेले.

राज्य सरकारच्या बजेटमध्ये काही मागण्या पदरात पडतील अशी अपेक्षा होती. त्यामुळे त्यांनी बजेट जाहीर होईपर्यंत जिल्हा पातळीवर आंदोलन सुरू ठेवण्याचा व बजेटमध्ये काही ठोस पदरात न पडल्यास १५ मार्च रोजी पुन्हा एकदा आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला.काल बजेट जाहीर झाले. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मोबाईल देण्याची घोषणा वगळता अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या पदरात काहीच पडले नाही. मानधन वाढीची काही वाहिन्यांनी दिलेली बातमी खोटी व गैरसमज पसरवणारी होती. त्यामुळे त्यांच्या पदरात अजूनच निराशा पडली. त्या निराशेचे संतापात रुपांतर झाले. त्यातूनच कृती समितीच्या बाहेरच्या काही अपरिपक्व संघटनांनी खातरजमा न करता श्रेय घेण्याचा प्रयत्न केला.

कृती समितीने या सर्व पार्श्वभूमीवर ताबडतोब ऑनलाईन बैठक घेऊन १५ मार्च रोजी आझाद मैदानावर ‘संताप मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे.केंद्र सरकारच्या बजेटने तर अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेच होते. आता राज्य सरकारने देखील त्याचीच पुनरावृत्ती केली.१५ मार्च २०२२ रोजी अंगणवाडी कर्मचारी मोठ्या संख्येने आझाद मैदानावरील आंदोलनात सहभागी होऊन आपला संताप व्यक्त करतील.२८-२९ मार्चच्या देशव्यापी सार्वत्रिक संपात उतरून केंद्र सरकारची अंगणवाडी कर्मचारी, कामगार, शेतकरी विरोधी धोरणे रोखण्यासाठी अंगणवाडी कर्मचारी एल्गार पुकारतील आणि जिल्हा व तालुका पातळीवर तीव्र आंदोलन करतील.

Shweta Chande

Recent Posts

मनपा करसंकलन विभाग जाहिरात करात दहा टक्के वाढ

मनपा करसंकलन (Municipal Tax) विभाग जाहिरात करात दहा टक्के वाढ करणार असून आचारसंहितेनंतर हा प्रस्ताव…

10 hours ago

विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील आरोपी अजमल कसाब याला सत्र, उच्च व सर्वोच्च अशा न्यायालयांच्या तिन्ही पातळ्यांवर…

10 hours ago

काँग्रेसचा दहशतवाद्यांना निर्दोषत्वाचे सर्टिफिकेट देण्याचा घातक खेळ; पंतप्रधान नरेंद्र मोदी

मुंबईवरील दहशतवादी हल्ला पाकिस्ताननेच घडविला हे संपूर्ण जग जाणते, खुद्द पाकिस्ताननेही याचा इन्कार केलेला नाही,…

13 hours ago

स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांना पहिला रामतीर्थ गोदा राष्ट्रजीवन पुरस्कार जाहीर

अयोध्या येथील श्रीरामजन्म भूमी न्यासाचे खजिनदार आणि जगभरात गीतेचा प्रसार करणारे स्वामी गोविंददेवगिरी महाराज (Swami…

14 hours ago

अरविंद केजरीवाल तुरूंगातून बाहेर येतील, नरेंद्र मोदींचा कार्यक्रम करतील

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य घोटाळा प्रकरणात अटक केली आहे. (Arvind Kejriwal has…

15 hours ago

नाशिक शहरात ऐन उन्हाळ्यात महामार्ग बस स्टॅन्डचे बांधकाम

फेब्रुवारी महिन्यात राज्यातील पहिल्या वातानुकूलित मेळा बस स्टॅन्डचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लोकार्पण झाले.…

15 hours ago