नोकरी

कुस्ती, बॉक्सिंगपटूंना हवाई दलात नोकरीच्या संधी, लवकर अर्ज करा

भारतीय हवाई दल (INDIAN AIR FORCE) च्या वतीने कुस्ती, बॉक्सिंगपटूंना हवाई दलात काम करण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे. भारतीय हवाई दल क्रीडा नियंत्रण मंडळामार्फत हवाई दलातील मुलांच्या जल्लहाली, बेंगलरू येथील स्पोर्टस पथकात स्पोर्टस कॅडेट्सचा समावेश करण्यासाठी 20 ते 24 फेब्रुवारी या कालावधीत नाव नोंदणी रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. (Indian Air Force Job Opportunities for Wrestling, Boxers, Apply Early)

यासाठी वयाची अट 12-15 वर्षे (म्हणजेच 01 एप्रिल 2023 पर्यंत वय) आणि शिक्षण हे इयत्ता 7 वी ते 9 वी झालेले असावे. केवळ बॉक्सींग आणि कुस्तीच्या क्रीडा शाखेतील प्रवेशासाठी लागू असल्याच्या सूचना आहेत. त्यामुळे ज्युनिअर/सब ज्युनिअर स्पर्धांमध्ये राज्य/राष्ट्रीय स्तरावर प्रथम तीन क्रमांक निवडीसाठी जारी केलेल्या नियमानुसार वय, उंची, वजन श्रेणीतील मुलांचा विचार केला जाईल, असे नमूद करण्यात आले आहे.

नवी दिल्ली येथील हवाई दल स्टेशन एक्झिट गेट, रेस कोर्स येथे ही प्रक्रिया पर पडणार असून 20 ते 21 फेब्रुवारीपर्यंत बॉक्सींगच्या कागदपत्रांची तपासणी आणि ट्रायल्स पार पडेल. त्याचप्रमाणे 22 ते 24 फेब्रुवारीपर्यंत कुस्ती खेळाच्या कागदपत्रांची तपासणी आणि ट्रायल्सचे कार्य पार पडणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

यासाठी आवश्यक कागदपत्रे हे अर्जकर्त्याचा मूळ जन्म प्रमाणपत्र, आधार कार्ड, शैक्षणिक आणि क्रीडा प्रमाणपत्रे आणि ४ पासपोर्ट आकाराची रंगीत छायाचित्रे असे आहेत. या विषयीच्या अधिक माहीतीसाठी ई-मेल bluesport.3@gov.in आणि संपर्क क्रमांक ०११-२३०१४१६० वर संपर्क साधावा. दलाल/ एजंटांपासून सावध रहा. निवड फक्त गुणवत्तेवर अवलंबून करण्यात येईल, अशा काटेकोर सूचना हवाईदल विभागाच्या वतीने देण्यात आल्या आहेत.

हे सुद्धा वाचा : HAL Helicopter: आशियातील सर्वात मोठी हेलिकॉप्टर कंपनी सज्ज; मोदींच्या हस्ते सोमवारी होणार उद्घाटन 

पाकिस्तानची माणूसकीला काळीमा फासणारी कृती; भुकंपग्रस्त तुर्कीच्या मदतीला जाणाऱ्या भारतीय हवाई दलाच्या विमानाला परवानगी नाकारली

फ्रान्स मधून भारतात येणाऱ्या लढाऊ विमानांना UAE वायुदलाने केली इंधनाची मदत

त्याचप्रमाणे कौशल्य पातळी आणि प्रतिनिधित्व यावर अवलंबून सक्षम अधिकारी जनश्रेणीकडे दुर्लक्ष करून विहित वयोगटातील मुलांची निवड करू शकतात. मुलांची निवड पूर्णपणे गुणवत्तेवर केली जाईल आणि योग्य उमेदवार न मिळाल्यास प्रत्येक वजन गटामधील मुलांची निवड करणे बंधनकारक असेल असेही नाही.

Team Lay Bhari

Recent Posts

नाशिक जिल्ह्यातील सभांच्या केंद्रस्थानी राहिला कांदा

जिल्हयात बुधवारी (ता.१५) महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह भाजप नेत्यांनी सभा,…

23 hours ago

५० हजाराची लाच घेतांना शिक्षणाधिकाऱ्याला अटक

शाळा बंद असल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी तसेच अल्प संख्यांक विकास बहुउद्देशीय संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या गुजराथी माध्यमिक…

1 day ago

‘गाभ’ सिनेमा या दिवशी होणार प्रदर्शित

सध्या अनेक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. वेग-वेगळे विषय घेवून अनेक सिनेमा रिलीज झाले आहेत.…

1 day ago

केंद्रात नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होणार – मंत्री छगन भुजबळ

जगात भारताची प्रतिमा उंचावण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी महत्वाचे निर्णय घेतल्यामुळे आज आपला…

2 days ago

नाशिक – दिंडोरीमध्ये भाजप – शिंदे गट संकटात, पत्रकार विक्रांत मते यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा पार पडलेला आहे. याच पार्श्वभूमीवर लय भारीची टीम गेले काही दिवस…

2 days ago

पिंपळगावच्या मोदींच्या सभेआधी पाच शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेत ठेवले नजरकैदेत

आज मंगळवारी पिंपळगाव येथे होणाऱ्या जाहीर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत (Modi's rally) खोट्या आश्वासनाबद्दल जाब…

2 days ago