31 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeटॉप न्यूजफ्रान्स मधून भारतात येणाऱ्या लढाऊ विमानांना UAE वायुदलाने केली इंधनाची मदत

फ्रान्स मधून भारतात येणाऱ्या लढाऊ विमानांना UAE वायुदलाने केली इंधनाची मदत

टीम लय भारी

2016 साली भारताने 36 लढाऊ विमानांचा करार फ्रान्स सोबत केला होता. या लढाऊ विमानांची किंमत एकूण 59,000 कोटी इतकी होती. त्यातली अजून 3 लढाऊ विमाने बुधवारी भारतात दाखल झाली आहेत. उर्वरित सगळी लढाऊ विमाने पुढच्या वर्षीपर्यंत भारतात पोहोचतील. (Three more Rafale jets arrived to India from France on Wednesday)

फ्रान्स मधून भारतात येणाऱ्या लढाऊ विमानांना UAE वायुदलाने केली इंधनाची मदत
राफेल विमानांची ही नवीन तुकडी rafale

फ्रान्स मधून थेट भारतात येणाऱ्या या तिन्ही लढाऊ विमानांना युनायटेड अरब एमिरेट्स (UAE) च्या विमानांनी इंधन पुरवठा केला. थेट फ्रान्स वरून भारतात येणाऱ्या या विमानांना इंधनासाठी कुठे थांबण्याची गरज लागली नाही. याबद्दल भारतीय वायुदलाने (IAF) untied arab emirates विषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे. (Indian air force deeply appreciate UAE for refueling non-stop rafale jets )

जंगली प्राण्यांची पुजा करणारी ठाणे-पालघरमधील आदिवासी संस्कृती; परदेशी विद्यापीठाकडून होतेय संशोधन

टिक टॉक चा भारतात पुन्हा प्रवेश? या वर्षाअखेरीस चिनी ऍप टिक टॉक भारतात पुनः धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज

फ्रान्स मधून भारतात येणाऱ्या लढाऊ विमानांना UAE वायुदलाने केली इंधनाची मदत
भारतीय वायुदलाने (IAF) untied arab emirates विषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे.

राफेल विमानांची ही नवीन तुकडी IAF च्या दुसऱ्या पथकाचा (falcon) भाग असेल. अंबाला येथे सज्ज असलेली पहिली तुकडी (golden arrows) लडाख चीन सीमेवर पाहणी करण्याचे काम करते आहे. तर दुसरी तुकडी पश्चिम बंगालच्या हाशिमरा हवाई तळावर जुलै अखेरीस काम पाहण्यास सुरुवात करेल. (Newly arrived jet aircrafts will start patrolling from next week)

फ्रान्स मधून भारतात येणाऱ्या लढाऊ विमानांना UAE वायुदलाने केली इंधनाची मदत
लढाऊ विमाने

या कराराच्या पुर्ततेनंतर भारत नव्या 114 बहुआयामी लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी विचार करतो आहे. ही नवी विमाने पुढील पंधरा ते वीस वर्षांत भारतात दाखल होतील. (India is looking forward to place a new order for 114 multirole aircrafts in future)

अशोक चव्हाणांची धावपळ, मराठा समाजाला न्याय देण्यासाठी दिल्लीत लॉबींग

Three more Rafale jets arrive in India from France

नवीन दाखल झालेली लढाऊ विमाने हवेसाहित जमिनीवर व समुद्रात सुद्धा हल्ला करण्यास सक्षम आहेत. या विमानांची हल्ला करण्याची क्षमता 780 किलोमीटर ते 1,650 किलोमीटर इतकी असेल. (These new three aircrafts have a combat range of 780 kilometers to 1,650 kilometers and are capable to attack from air, on ground and through sea.)

पॅगेससमधून मोबाईल हॅक होतो, मग ईव्हीएमही का होऊ शकणार नाही ? : बाळासाहेब थोरात

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी