27 C
Mumbai
Saturday, March 18, 2023
घरटॉप न्यूजHAL Helicopter: आशियातील सर्वात मोठी हेलिकॉप्टर कंपनी सज्ज; मोदींच्या हस्ते सोमवारी होणार...

HAL Helicopter: आशियातील सर्वात मोठी हेलिकॉप्टर कंपनी सज्ज; मोदींच्या हस्ते सोमवारी होणार उद्घाटन 

देशाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा स्तंभ रोवला जाणार आहे. आशियातील सर्वात मोठ्या हेलिकॉप्टर निर्मितीचा कारखाना पूर्ण झाला असून सोमवारी तो कार्यान्वित होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) सोमवारी या हेलिकॉप्टर कारखान्याचे उद्घाटन करणार आहेत.

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (Hindustan Aeronautics Limited-HAL) चा कारखाना तुमकुरू, कर्नाटक येथे स्थापन करण्यात आला आहे. हा कारखाना देशाच्या सर्व हेलिकॉप्टरच्या गरजा पूर्ण करेल त्याचप्रमाणे लडाकू विमान बनविण्यास सुद्धा याची मदत होणार आहे. ग्रीनफिल्ड हेलिकॉप्टर हा कारखाना, 615 एकरांवर पसरलेला आहे. संरक्षण मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. 2016 मध्ये पीएम मोदींनी या कारखान्याची पायाभरणी केली होती. या कारखान्याच्या उद्घाटनाच्या प्रसंगी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath singh) आणि संरक्षण मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत.

संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, सुरुवातीच्या काळात कारखाना वर्षाला सुमारे 30 हेलिकॉप्टर तयार करेल. नंतर टप्प्याटप्प्याने प्रति वर्ष 60 आणि नंतर 90 हेलिक़ॉप्टर तयार करण्यात येतील. ग्रीनफिल्ड हेलिकॉप्टर फॅक्टरी ही आशियातील सर्वात मोठी हेलिकॉप्टर उत्पादन करणारी असेल. सुरुवातीला लाइट युटिलिटी हेलिकॉप्टर (LUH) तयार करेल. लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर (LCH) आणि इंडियन मल्टीरोल हेलिकॉप्टर (IMRH) तसेच LCH, LUH, सिव्हिल ALH आणि IMRH च्या दुरुस्तीसाठी कारखाना भविष्यात विस्तारित केला जाऊ शकतो. यामुळे भविष्यात भारताला हेलिक़ॉप्टरचा मोठा निर्यातदारही होता येणार आहे.

हे सुद्धा वाचा : मोदींनी अतिश्रीमंत लोकांना सूट दिली, 5 ट्रिलियन इकॉनॉमीची घोषणा हवेत विरली!

मध्यमवर्गाला अधिक सक्षम बनविणारा अर्थसंकल्प : नरेंद्र मोदी

देशात सरकार कुणाचे? मोदींचे की अदानीचे? बिर्ला-इंदिरा गांधी यांच्या किश्श्याची चर्चा!

संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, एचएएल 20 वर्षांमध्ये 4 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढालीसह 3-15 टनांच्या श्रेणीतील 1,000 हेलिकॉप्टरचे उत्पादन करण्याची योजना आखत आहे. संरक्षण मंत्रालयाच्या मते, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण करण्याव्यतिरिक्त, तुमकुरु हेलिकॉप्टर कारखाना त्याच्या CSR उपक्रमांद्वारे मोठ्या प्रमाणावर समुदाय-केंद्रित कार्यक्रमांद्वारे आसपासच्या भागाच्या विकासाला चालना देईल.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी