महाराष्ट्र

बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्या चालकांविरुद्ध गुन्हा अजामीनपात्र केला जाणार

सार्वजनिक सेवेतील वाहनचालकांवर लवकरच नियंत्रण येणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र सरकार हिमाचल प्रदेशच्या धर्तीवरील कडक कायदा आणणार आहे. सध्याच्या राज्यातील वाहन कायद्यात दुरुस्ती केली जाणार आहे. त्याबाबत केंद्र शासनाला सुधारणा प्रस्ताव पाठविला जाणार आहे. यासंदर्भातील गुन्ह्यात जामीन न मिळण्याची तरतूद नव्या कायद्यात केली जाणार आहे. यामुळे बेफाम वाहने चालवून प्रवाशांचा जीव घेणाऱ्या वाहनचालकांच्या बेदरकार वृत्तीला चाप बसेल. मुख्यमंत्री सचिवालयाच्या जनसंपर्क कक्षातून ही माहिती कळविण्यात आली आहे.

वाहन कायद्यातील सुधारणेचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. वाहनचालकांच्या निष्काळजीपणामुळे प्रवाशांना जीव गमवावा लागू नये, हा यामागील उद्देश असल्याचे शिंदे यांनी सांगितले. सार्वजनिक वाहन सेवेतील चालकांना नवी बंधने लागू राहतील. मद्यसेवन करून तसेच विना परवाना  बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्या अशा चालकांविरुद्ध गुन्हा अजामीनपात्र केला जाणार आहे. सह्याद्री अतिथीगृहात यासंदर्भात शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत हिमाचल प्रदेशच्या धर्तीवर राज्यातील कायद्यात सुधारणा करण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाला पाठविण्याचे ठरले. वाहनचालकांच्या निष्काळजीपणामुळे निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागू नये, यासाठी कडक कायदेशीर कारवाई आवश्यक असल्याचे शिंदे यांनी यावेळी सांगितले.

बेदरकारपणे तसेच मद्य सेवन करून निष्काळजीपणे वाहन चालिवण्यामुळे अपघात आणि त्यामुळे निष्पाप प्रवाशांचा मृत्यू यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. 2021 मध्ये अतिवेगाने वाहन चालविल्यामुळे झालेल्या अपघातांची संख्या 20 हजार 860 आहे तर त्यात 9,829 जणांचा मृत्यू झाला आहे.

सार्वजनिक रस्त्यांवर बेदरकारपणे वाहन चालविणे, हा अजामीनपात्र गुन्हा करण्याबाबत गृह विभागाच्या प्रस्तावावर या बैठकीत चर्चा झाली. सार्वजनिक वाहतूक सेवा देणाऱ्या वाहनांवरील चालकांच्या निष्काळजीपणामुळे होणारे अपघात आणि त्यात होणारा प्रवाशांचा मृत्यू याबाबत वाहनाचालकांविरुद्ध प्रभावी कारवाई होणे अपेक्षित आहे. त्यासाठी यासंदर्भातल्या कायद्यात सुधारणा करणे गरजेचे झाले आहे. त्यामुळे आता विनापरवाना वाहन चालविणारे तसेच मद्यपी वाहनचालकांना नव्या कायद्याच्या कक्षेत आणले जाणार आहे.

 

हे सुद्धा वाचा : 

येत्या 6 महिन्यात महामार्ग टोल बूथ फ्री होणार?

दोन वर्षांत टोल नाके संपुष्टात आणणार : नितीन गडकरी

नवीन ड्रायव्हिंग लायसन्स बनवायच आहे मग जाणून घ्या नविन नियम सविस्तर

यावेळी मुंबई-पुणे एक्सप्रेस वे, समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठीच्या उपायोजनांचीही चर्चा झाली. मुंबई- पुणे महामार्गावरील तीव्र उताराच्या ठिकाणी अपघात टाळण्यासाठी सूचना फलकांसोबतच रबरी गतिरोधक बसविले जाणार आहेत.  या बैठकीस गृह विभागाचे प्रधान सचिव, पोलिस महासंचालक रजनीश सेठ, परिवहन आयुक्त विवेक भिमनवार, अपर पोलिस महासंचालक (वाहतूक) रविंद्र सिंघल आदीही उपस्थित होते.

Accident Non Bailable Offence, New Traffic Law In Maharashtra, Public Service Drivers, Drivers Will Controlled, Mumbai Traffic News

 

 

 

विक्रांत पाटील

Recent Posts

नरेंद्र मोदींचा प्रचार भरकटला, मुद्देच नसल्याने धार्मिक ध्रुविकरणाचा प्रयत्न: पवन खेरा

लोकसभा निवडणुकीच्या ( Loksabha election) प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) तोंड उघडले की वाद…

13 mins ago

रामदास आठवले, प्रकाश आंबेडकर, छगन भुजबळ, महादेव जानकर, गोपीचंद पडळकर हे RSS चे एजंट

लोकसभा निवडणुकीचा महाराष्ट्रातील शेवटचा, म्हणजेच पाचवा टप्पा उरलेला आहे. या टप्प्यात मुंबई, ठाणे व उत्तर…

32 mins ago

पोपट सोबत असल्यास भविष्यवाणीला महत्व…; उमेश पाटील

मुंबईत लोकसभा मतदारसंघात 20 मे रोजी मतदान होणार आहे. प्रचार करण्यासाठी अवघे दोन दिवस हातात…

42 mins ago

गटतट,वाद विवाद संपवून एकत्रित समाजासाठी लढा – मराठा आंदोलक नाना बच्छाव

काल दि १६ रोजी सकल मराठा समाजावतीने जाहीर लोकसभेतील वाजे, भगरे पाठिंबा पत्रानंतर त्या निर्णयाचे…

1 hour ago

तरूणाईच्या मनात कोण ?, नरेंद्र मोदी की विरोधक ?

लय भाराची टीम गेले काही दिवस नाशिक मतदार संघातील मतदारांचा आढावा घेत आहे(Who is in…

2 hours ago

कन्नमवारनगर समस्यांच्या जंजाळात, नागरिकांची लोकसभा उमेदवारांकडे याचना

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडून संजय दीना पाटील, तर भाजपकडून मिहीर कोटेचा हे दोन उमेदवार…

2 hours ago