31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रनवीन ड्रायव्हिंग लायसन्स बनवायच आहे मग जाणून घ्या नविन नियम सविस्तर

नवीन ड्रायव्हिंग लायसन्स बनवायच आहे मग जाणून घ्या नविन नियम सविस्तर

टीम लय भारी

मुंबई :- नविन ड्रायव्हिंग लायसन्स बनवाचे आहे तर मग आता त्यासाठी तुम्हाला एक महिना अगोदर तयारी करावी लागणार आहे. ज्यांना आता नवीन ड्रायव्हिंग लायसन्स बनवायचे आहे, त्यांना एक महिना अगोदर व्हिडीओ ट्यूटोरियल पहावे लागेल आणि सुरक्षित ड्रायव्हिंगचे पैलू समजून घ्यावे लागतील तरच ते ड्रायव्हिंग टेस्टमध्ये बसू शकतील.

नव्या लायसन्ससाठी व्हिडीओ ट्यूटोरियल गरजेचे

व्हिडीओ ट्यूटोरियल मध्ये असुरक्षित ड्रायव्हिंगमुळे नुकसान झालेल्या कुटुंबातील सदस्यांच्या मुलाखती दाखवल्या जातील. जेणेकरुन लोकांना रस्त्यावर सुरक्षित वाहन चालवण्याचे महत्त्व समजू शकेल. याबाबतचे वृत्त एका वाहिनीने प्रसिद्ध केले आहे.

सध्याच्या लायसन्सधारकांसाठी कोर्स

सध्याच्या चालक परवानाधारकांसाठीही कडक नियम तयार करण्यात आले आहेत. जे लोक कोणत्याही प्रकारच्या वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करीत असल्याचे आढळल्यास त्यांना ड्रायव्हर सेफ्टी प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण करावा लागेल. या वाहनचालकांना ३ महिन्यांत रीफ्रेशर कोर्स पूर्ण करावा लागेल. यासाठी या वाहनचालकांचे ड्रायव्हिंग लायसन्स त्यांच्या आधारशी जोडले जातील, जेणेकरून त्यांनी कोर्स पूर्ण केला आहे की, नाही याचा मागोवा घेता येईल.

३१ ऑक्टोबरपासून नवीन मेकॅनिझम

टोल प्लाझा ओलांडताना हेल्मेट न घातलेल्या दुचाकीस्वारांचे फोटो शेअर करुन त्यांना चालन पाठविण्याचे आदेश रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाने स्थानिक पोलिसांना दिले आहेत. ही यंत्रणा सुरू करण्यासाठी ३१ ऑक्टोबरची मुदत ही निश्चित केली गेली आहे. २०१९ मध्ये दुचाकी चालक आणि त्यांच्या बरोबर मागील सीटवर बसलेल्या ४४,६६६ लोकांचा हेल्मेट न घातल्यामुळे मृत्यू झाला. अशा प्रकारच्या दुचाकी अपघातांपैकी ८० टक्के मृत्यू हेल्मेट नसल्यामुळे झाले आहेत.

कोर्स पूर्ण केल्याशिवाय लायसन्स मिळणार नाही

नवीन ड्रायव्हिंग लायसन्स अर्जासाठीचे ऑनलाईन व्हिडिओ ट्युटोरियल आणि विद्यमान ड्रायव्हिंग लायसन्सधारकांसाठी सेफ्टी सर्टिफिकेशन कोर्ससाठी डिटेल प्रोटोकॉल येत्या काही आठवड्यात सुधारित एमवी कायद्यांतर्गत केंद्रीय मोटर वाहन नियमात समाविष्ट केला जाईल. सूत्रांनुसार हा व्हिडिओ राज्ये आणि रस्ते सुरक्षा संबंधित संस्थांकडे असेल. ही एकात्मिक प्रणाली असेल, कोणती ही व्यक्ती हे प्रशिक्षण पूर्ण केल्याशिवाय वाहन चालविण्याच्या परवान्यासाठी अर्ज करू शकणार नाही.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी