मुख्यमंत्री, गृहमंत्री यांच्यासमोरच शिंदे सेनेच्या गुंडांची पत्रकारांना जबर मारहाण

मुख्यमंत्री, गृहमंत्री यांच्यासमोरच शिंदे सेनेच्या गुंडांची पत्रकारांना जबर मारहाण केल्याचा प्रकार चुनाभट्टी येथे घडला आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमाचा फ्लॉप शो झाला. त्यावेळी काही पत्रकारांनी रिकाम्या खुर्च्यांचे फोटो काढल्याने गुंडांनी त्यांना बेदम मारहाण केली. याबाबत चुनाभट्टी पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेण्यास नकार दिला. विशेष म्हणजे, राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी असलेला गृहमंत्री व्यासपीठावर असताना शिंदे सेनेच्या गुंडांनी लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या माध्यमांच्या प्रतिनिधींना मारहाण केली. राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचे बारा वाजल्याचेच हे निदर्शक मानायला हवे.

चुनाभट्टी येथील सोमय्या मैदानात पालिकेच्या महिला-बाल कल्याण विभागाचा कार्यक्रम शनिवारी आयोजित करण्यात आला होता. त्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंतत्री यांच्या हस्ते शहरातील 27 हजार गरजू महिलांना यंत्रसामुग्री वाटप केले जाणार होते. या कार्यक्रमात कोणतीही यंत्रासामुग्री मिळणार नाही, फक्त कूपन दिले जाणार असल्याची माहिती मिळताच अनेक महिलांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरविली. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री व्यासपीठावर असतानाच महिला कार्यक्रमातून निघून जाऊ लागल्या. मैदानातील निम्म्याहून अधिक खुर्च्या रिकाम्या झाल्या होत्या. त्याचे वार्तांकन करणाऱ्या दोन पत्रकारांना शिंदे सेनेच्या गुंडांनी मारहाण केली.

दैनिक ‘पुढारी’ने यासंदर्भात वृत्त प्रकाशित केले आहे. त्यानुसार, रिकाम्या खुर्च्यांचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना मारहाण केली गेली आहे. चुनाभट्टीत मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमातील शनिवारी घडलेला हा संतापजनक प्रकार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या महिलांना यंत्रसामुग्री वाटप कार्यक्रमातील हा दुर्दैवी प्रकार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रत्यक्षात यंत्रसामुग्री न देता फक्त व्यासपीठावर उपस्थित राहतील. त्यांच्याकडून फक्त कूपन वाटप केले जात असल्याची माहिती कळताच अनेक महिला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री येण्याच्या आधीच कार्यक्रमस्थळाहून निघून गेल्या होत्या. शिंदे-फडणवीस आल्यानंतरही, शिंदे सेना कार्यकर्त्यांनी रोखूनही महिलांनी निघून जाणे सुरूच ठेवले. त्यामुळे कार्यक्रमस्थळी रिकाम्या खुर्च्याच सर्वत्र दिसत होत्या. निम्म्याहून अधिक खुर्च्या रिकाम्या असल्याचे फोटो काढत असताना दोन पत्रकारांना शिंदे सेनेच्या काही गुंडांनी जबर मारहाण केली. या पत्रकारांना चुनाभट्टी पोलिसांनी जीवाची पर्वा न करता गुंडांच्या घोळक्यातून बाहेर काढले. हे गुंड पोलिसांवरही धावून जात होते. पोलिसांना न जुमानता त्यांची गुंडगिरी सुरू होती. जिगरबाज पोलिसांमुळे या पत्रकारांचा जीव बचावला. पोलिसांना न जुमानता गुंडांकडून पत्रकारांना मारहाण होत असताना राज्याचा गृहमंत्री कार्यक्रमस्थळी होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही पत्रकारांना गुंडांकडून मारहाण होत असताना व्यासपीठावर होते.

हेसुद्धा वाचा : 

Vedio : येऊरच्या जंगलात 24 तास मिळतेय दारू आणि बाई ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्याचा बिहार झालाय!

फडतूस फडणवीस !

हेट स्पीच; तक्रार नसेल तरी गुन्हा नोंदवून घ्या; नपुसंक सरकारला सुप्रीम कोर्टाचे आदेश

एका पीडित पत्रकाराने चुनाभट्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी आग्रह धरला. मात्र पोलिस दबावात होते. त्यांनी गुन्हा नोंदवून न घेता फक्त तक्रार अर्ज घेतला. संबंधित गुंडांवर कोणतेही रेकॉर्ड होऊ नये म्हणून साधी ‘एनसी’ही चुनाभट्टी पोलिसांनी घेतली नाही. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करून या गंभीर प्रकाराची चौकशी करून संबंधित गुंडांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर शिंदे सेनेच्या गुंडांनी, पोलिसांना न जुमानता, पत्रकारांना जबर मारहाण केल्याची दैनिक “पुढारी”ने प्रसिद्ध केलेली बातमी.
Journalists Brutally Beaten, Shinde Sena Thugs, Chief Minister, Home Minister, Shinde Fadanvis Flop Show

 

विक्रांत पाटील

Recent Posts

अश्रू, तुझा खरा रंग कंचा ? रोहित पवारांचा की अजित पवारांचा ??

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं सपाटून मार खाल्ला होता. अशातच अजितदादांच्या मागं…

12 mins ago

महाराष्ट्रात मराठी माणसालाच No Welcome

जान्हवी सराना या एचआर मॅनेजरने अलीकडे लिंक्डिनवर पोस्ट केलेल्या नोकरी भरतीच्या जाहीरातीवरून सोशल मिडियावर चांगलीच…

59 mins ago

‘जेव्हा राजसत्ता आपले कर्तव्य विसरते, तेव्हा धर्मसत्तेला पुढे यावं लागतं’: शांतीगिरी महाराज

नाशिक लोकसभा निवडणुकीत उमेदवारी माघारीचा आजचा शेवटचा दिवस असून महायुतीला स्वामी शांतीगिरी महाराजांचे (Shantigiri Maharaj)…

2 hours ago

ICICI होम फायनान्सच्या कार्यालयावर दरोडा, २२२ खातेदारांच्या लॉकरमधून ५ कोटींचे दागिने लंपास

नाशिकच्या आयसीआयसीआय होम फायनान्स या कंपनीच्या कार्यालयातील (ICICI Home Finance office raided) तब्बल पाच कोटींचे…

2 hours ago

तापमानाचा पारा पुन्हा वाढणार : उष्णतेच्या लाटेचा इशारा

हवामान खात्याने देशातील सात राज्यामध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा ( Heat wave warning) आहे त्यामुळे पुन्हा…

2 hours ago

संकटग्रस्त अजित पवारांना हवाय मनोज जरांगे पाटलांचा आधार

अजितदादांचे धाकटे सुपूत्र जय पवार थेट मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला गेले. जय यांनी हेलिकॉप्टर…

3 hours ago