महाराष्ट्र

आखाजी : खान्देशातील आगळीवेगळी अक्षय्य तृतीया परंपरा

अक्षय्य तृतीयेचा सण खान्देशात अगदी दिवाळीसारखाच साजरा केला जातो. तिकडे आखाजी हा सासुरवाशीणींचा सण असतो. या दिवशी शेतकरी बांधव हे आपली शेतीची सर्व कामे बंद ठेवतात. मजुरांनाही या दिवशी सुटी दिली जाते. अनेक गावात पत्त्यांचे डाव रंगतात. याच वर्षी सालगडी (सालदार) यांची नवी कामे ठरविली जातात. खान्देशातील आगळीवेगळी अक्षय्य तृतीया परंपरा आजही पाळली जाते. आपण त्याविषयी जाणून घेऊ.

खान्देशातील घरोघरी या सणाला अक्षय्यघट म्हणजेच पाण्याची घागर भरली जाते. त्याच्यावर छोटे मातीचेच भांडे ठेवले जाते. त्यावर मग खरबूज (डांगर) आणि दोन सांजोर्‍या (करंजी) तसेच दोन आंबे ठेवले जातात. यातील छोटे भांडे हे पितरांसाठी असते. आधी या पितरांना पाण्याचा घट दिला जातो. त्यानंतर मग नवीन घरात माठ वापरण्याला ठेवला जातो.

पितरांचे श्राद्ध किंवा तर्पणविधी या दिवशी केला जातो. सकाळी घराच्या उंबरठ्याचे (उंबरा) औक्षण करून आपल्या पुर्वजांचे कृतज्ञ  स्मरण केले जाते. कुंकवाचे एकेक बोट हे उंबरठ्यावर उमटवले जाते. पूर्वजांची एकेक नावे उच्चारून  पितरांना आमंत्रण दिले जाते. दुपारी चुलीवर पितरांना ‘घास’ टाकला जातो.

आखाजीच्या दिवशी पुरणपोळी, आमरस, सार म्हणजे कटाची आमटी तसेच जोडीला कुरडई, भजी असा जंगी बेत असतो. (फोटो क्रेडिट : @DrVishalAhire)
आखाजीला पूर्वजांची एकेक नावे उच्चारून  पितरांना आमंत्रण दिले जाते. दुपारी चुलीवर पितरांना ‘घास’ टाकला जातो. याला आगारी म्हणतात. (फोटो क्रेडिट : @DrVishalAhire)

आखाजीच्या दिवशी पुरणपोळी, आमरस, सार म्हणजे कटाची आमटी तसेच जोडीला कुरडई, भजी असा जंगी बेत असतो. खान्देशात आखाजीच्या दिवशी आगारी म्हणजे पितरांना घास दाखवून आंबे खायला सुरवात केली जाते.

आर्थिक वर्षाचा पहिला दिवस 1 मार्च आणि शेती वर्षाचा विशेषत: खानदेशातील वर्षाचा पहिला दिवस आखाजी अर्थात अक्षय तृतीया. आखाजी हा एक भारत देशातील महान श्रमण संस्कृति दर्शविणारा कृषी उत्सव आहे. वर्षातील प्रथम पीक घेण्यासाठी शेत तयार करणे, या दिवसापासून नांगरट सुरु करण्याची परंपरा होती. याच दिवसापासून आपले पूर्वज शेतीकामाला सुरुवात करून उत्सव साजरा करत होते. आखाजी, हलोत्सव (वप्पमंगल) अशी वेगवेगळी नावे या सणाला आहेत. 

आखाजी हा एक भारत देशातील महान श्रमण संस्कृति दर्शविणारा कृषी उत्सव आहे.

याशिवाय, आखाजीचे खान्देशात आणखी एक आगळे-वेगळे महत्व आहे. लौकीक अर्थाने आखाजी हा पितरांचा सण आहे, असे म्हटले जाते. मात्र, सासुरवाशिणींचा सण म्हणूनच खान्देशात आजही आखाजी सणाचे महत्त्व कायम आहे. लग्न झालेल्या लेकींना वर्षातून दोनदाच माहेरी जायला मिळते, ते आखाजी आणि दिवाळी सणाला. देणे-घेणे करण्याच्या घाई-गडबडीतच दिवाळी जाते. आखाजी मात्र माहेरी विसाव्याचा, आरामाचा सण. सासरच्या कामाच्या रट्ट्यातून, त्या घबडग्यातून मुक्त होऊन माहेरी कोड-कौतुक करवून घेण्याचा, आराम करण्याचा हा सण. त्यामुळे सासरी गेलेल्या लेकी अगदी आतुरतेने या सणाची वाट बघतात.

 

हे सुद्धा वाचा : 

अक्षय्य तृतीया विशेष: सोनेखरेदी करणाऱ्या ग्राहकांपुढे मोठी अडचण

जाणून घ्या अक्षय्य तृतीयेचे महत्त्व

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी चुकूनही करू नका ही कामं !

आखाजीच्या दिवशी नवविवाहित महिला आपल्या माहेरी जातात. घरोघरी उंच झाडाला झुले (झोके) बांधले जातात. खान्देशात सासुरवाशिण लेकींना गौराई म्हटले जाते. जावयाला म्हणतात शंकरजी!

कळवणच्या पश्चिम पट्यातही आखाजी‘ हा सण आदिवासी परंपरेने साजरा करतात. या दिवशी रस्त्यावरच्या पाणपोईंचे गावोगावी उद्घाटन केले जाते.

Akhaji, Khandesh, Akshaya Tritiya, Khandesh Akshaya Tritiya, Khandesh Akhaji
टीम लय भारी

Recent Posts

Atul Bhosale | Jaykumar Gore | Madan Bhosale | आयारामांनी भाजपची संस्कृती बिघडवली | निष्ठावंत कडाडले

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

13 mins ago

मासिक पाळी दरम्यान तीव्र वेदना कमी करण्यासाठी करा हे व्यायाम

मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना असह्य वेदना, पेटके आणि पचनाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.…

2 hours ago

नवरात्रीच्या उपवासात शेंगदाणे खाण्याचे फायदे, जाणून घ्या

3 ऑक्टोबर 2024 पासून देशभरात नवरात्रीचा सण सुरू होत आहे, आणि हा सण 11 ऑक्टोबर…

3 hours ago

थायरॉईड नियंत्रित करण्यासाठी प्या हर्बल ड्रिंक

अनावश्यक वजन वाढणे आणि हार्मोनल चढउतार ही थायरॉईड वाढण्याची लक्षणे आहेत. थायरॉईड ही फुलपाखराच्या आकाराची…

3 hours ago

त्वचेसाठी अतिशय फायदेशीर आहे शेंगदाणे, जाणून घ्या फायदे

शेंगदाणे ही एक अशी गोष्ट आहे, जी सर्वांच्याच स्वयंपाकघरात असते. शेंगदाण्याचा अनेक प्रकारे वापर केला…

24 hours ago

युजवेंद्र चहलने वेगळ्या अंदाजामध्ये दिल्या धनश्रीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

भारतीय संघाचा स्टार स्पिनर युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा आज आपला 28 वा वाढदिवस साजरा…

1 day ago