33 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeअक्षय्य तृतीयेच्या दिवशी चुकूनही करू नका 'ही' कामं !
Array

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी चुकूनही करू नका ‘ही’ कामं !

अक्षय्य तृतीया हा वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी अनेक शुभ संयोग घडत आहेत. त्यामुळे या दिवसाचे महत्त्व अनेक पटींनी वाढले आहे. म्हणूनच या दिवशी सोने खरेदी करणे किंवा नवीन गोष्टींमध्ये गुंतवणूक करणे शुभ मानले जाते. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सतयुग आणि त्रेतायुग सुरू झाल्याचे मानले जाते. यंदा 22 एप्रिलला अक्षय्य तृतीया साजरी होणार आहे. अनेक लोक या दिवशी दान धर्मही करतात. मात्र अक्षय्य तृतीयेला नेमक्या कुठल्या गोष्टी कराव्यात आणि कुठल्या गोष्टी करू नये ते जाणून घेऊयात.

यंदा 22 एप्रिल रोजी अक्षय्य तृतीयेला अधिक शुभ योग तयार होत आहेत. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी चंद्र वृषभ राशीत उच्च असेल. तसेच सूर्याच्या मालकीचे कृतिका नक्षत्र राहील. याशिवाय अमृत सिद्धी योग, रवि योग, सर्वार्थ सिद्धी योग, सौभाग्य योग, त्रिपुष्कर योग आणि आयुष्मान योग देखील अक्षय्य तृतीयेच्या दिवशी तयार होत आहेत. अशाप्रकारे अनेक शुभ योग एकत्र करून केलेल्या महायोगात केलेले उपासना-उपाय व्यक्तीच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करतात.

अक्षय्य तृतीया पूजेचा शुभ मुहूर्त
अक्षय्य तृतीयेच्या पूजेचा सर्वात शुभ मुहूर्त शनिवार, 22 एप्रिल रोजी सकाळी 7.49 ते दुपारी 12.20 पर्यंत राहील. या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा नियमानुसार करा. असे केल्याने अपार संपत्ती मिळते आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात.

चुकूनही करू नका
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी कांदा, लसूण, मांस इत्यादीचे सेवन चुकूनही करू नये. त्याचप्रमाणे प्लास्टिक, अ‍ॅल्युमिनियम किंवा स्टीलची भांडी, उपकरणे खरेदी करू नका. मुख्यतः या दिवशी चुकूनही कुणाला उधार देऊ नका. असे केल्याने लक्ष्मी माता तुमच्यावर नाराज होते असा समज आहे.

काय करावे?
या दिवशी संपूर्ण घराची स्वच्छता करा आणि वास्तूनुसार, घरात काही बदल करावे. या दिवशी आपल्या तिजोरीत दक्षिण भिंतीकडे वळवा. ही दिशा संपत्ती वाढीसाठी आणि धनलाभासाठी उत्तम मानली जाते. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लक्ष्मीमातेला गुलाबाचे फूल अर्पण करा. गुलाबी रंगाचे कपडे घालून पूजा करा. मोती किंवा स्फटिकाच्या मण्यांनी ‘हृीं क ए इ ल हृीं ह स क ह ल हृीं स क ल हृीं’ मंत्राचा जप करणे लाभदायक ठरेल.

अक्षय्य तृतीयेबाबत काही महत्वाच्या गोष्टी

  • अक्षय्य तृतीया हा केवळ हिंदू धर्माचाच नाही तर जैन धर्माचा देखील वार्षिक वसंत ऋतू उत्सव आहे.
  • अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करण्यामागचे कारण म्हणजे या दिवशी सोन खरेदी केल्याने घरात सुख समृद्धी नांदते.
  • हा दिवस भगवान परशुरामाचा दिवस म्हणूनही साजरा केला जातो. श्री परशुरा हे श्री विष्णूंचा सहावा अवतार आहेत. तसेच या दिवशी वेद व्यासांनी महाभारत लिहीण्यास सुरुवात केली होती.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून ‘लय भारी’ याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

हे सुद्धा वाचा: 

अक्षय्य तृतीयेच्या आधी ‘या’ अशुभ गोष्टी घरातून काढून टाका; समृद्धी वाढेल

गुढीपाडवा विशेष: वर्षभर चैतन्य मिळवण्यासाठी करा ‘या’ गोष्टी..!

संकटमोचन मारुतीला प्रसन्न करण्यासाठी आज करा ‘हे’ खास उपाय; नक्कीच यश मिळेल

Akshaya Tritiya 2023, Akshaya Tritiya, hindu mythology, Akshaya Tritiya 2023: Do’s and dont’s Things On Akshaya Tritiya

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी