महाराष्ट्र

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे मुंबईत आगमन; एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसांनी केले स्वागत

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे दोन दिवसीय दौऱ्याकरिता मुंबई येथे आगमन झाले. विमानतळावर शाह यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

अमित शाह यांच्या हस्ते रविवारी (दि.१६) रोजी नवी मुंबईत होणाऱ्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार कार्यक्रमानिमित्त शाह मुंबई दौऱ्यावर आले आहेत. राज्य सरकारच्यावतिने देण्यात येणार महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार यंदा निरुपणकार आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना अमित शहा यांच्या प्रदान करण्यात येणार आहे. नवी मुंबईतील खारघर येथील कॉर्पोरेट पार्क येथे हा कार्यक्रम होणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 16 एप्रिल रोजी एका कार्यक्रमात धर्माधिकारी यांना 2023 चा प्रतिष्ठित महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर केला होता. वृक्षारोपण मोहीम, रक्तदान आणि वैद्यकीय शिबिरे तसेच व्यसनमुक्ती कार्य करणारे आप्पासाहेब धर्माधिकारी यांना 16 हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: दोन वेळेस सोहळ्याच्या ठिकाणी भेट देऊन तयारीचा आढावा घेतला
या सोहळ्यादरम्यान, पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यावर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह धर्माधिकारी कुटुंबिय उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यासाठी सुमारे वीस लाखांपेक्षा जास्त नागरिक, श्री सदस्य उपस्थित राहण्याची शक्यता लक्षात घेऊन नियोजनपूर्वक काम सुरू आहे. पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, वाहन तळ, वाहतुक सुरळीत राहण्यासाठीचे नियोजन याकडे लक्ष देण्यात येत आहे.
नागरिकांना रेल्वे स्थानकापासून ते सोहळ्याच्या ठिकाणी नेण्यासाठी बसेसची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. सोहळ्याच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली असून सुमारे २५० टॅंकर आणि २१०० नळ बसविण्यात आले आहेत.

हे सुद्धा वाचा

अभिनेत्री शर्लिन चोप्राचा विनयभंग; पोलिसांत तक्रार दाखल

जड, अवजड वाहनांना रविवारी नवी मुंबईत प्रवेश बंद

पुलवामा : 40 जवानांचे बळी; मोदी म्हटले गप्प राहा !

तसेच वैद्यकीय सुविधा देखील तैनात करण्यात आली असून ६९ रुग्णावाहिका, ३५० डॉक्टर्स, १०० नर्स आणि कर्मचारी कार्यरत आहेत. ३२ फिरते शौचालय, ४२०० पोर्टेबल शौचालय, कार्यक्रमस्थळी ९००० तात्पुरते शौचालय बांधण्यात आली आहेत. स्वच्छता व्यवस्थेसाठी ६० जेटींग मशीन, ४००० सफाई कर्मचारी शिवाय २६ अग्निशमन वाहने उपलब्ध आहेत. पार्कींगसाठी २२ ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी ६०० स्वयंसेवक, २०० कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

प्रदीप माळी

Recent Posts

NEET बद्दल बोलताच राहुल गांधींचा माईक बंद करण्यात आला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल…

2 days ago

आणीबाणीमुळे देशाचा फायदा झाला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये आणीबाणी ह्या विषयावर सखोल…

2 days ago

मोदी सरकारची थापेबाजी, GST ची केली भजी !

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे(PM Narendra Modi and GST).सदर व्हिडीओमध्ये…

2 days ago

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

1 week ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

1 week ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

1 week ago