30 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeक्राईमअभिनेत्री शर्लिन चोप्राचा विनयभंग; पोलिसांत तक्रार दाखल

अभिनेत्री शर्लिन चोप्राचा विनयभंग; पोलिसांत तक्रार दाखल

अभिनेत्री शर्लिन चोप्रा हिचा एका फायनान्सरने विनयभंग केल्याचा आरोप तिने केला आहे. या प्रकरणी शर्लिनने फायनान्सर सुनील लोढा याच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. लोढाने माझा विनयभंग केला तसेच मला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे देखील शर्लिनने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

शर्लिन चोप्राने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, लोढाने व्हिडीओ रेकाँर्डिंगचे पैसे देण्याच्या बहाण्याने छेडछाड करण्याचा प्रयत्न केला. मात्र जेव्हा आपण त्याला विरोध केला तेव्हा त्याने मला शिवीगाळ केली. तसेच जीवे मारण्याची धमकी देखील दिली. यासर्व प्रकारानंतर शर्लिनने पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत याप्रकरणाचा तपास सुरु केला आहे.

शर्लिन चोप्राने याप्रकरणी पत्रकार परिषद देखील घेतली. पत्रकार परिषदेत तीने लोढावर गंभीर आरोप केले. लोढाने माझ्या छातीला हात लावल्याचा देखील तीने आरोप केला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Movie Talkies (@movietalkies)

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी