महाराष्ट्र

आमदार रोहित पवारांचा राम शिंदेंना ‘दे धक्का’

टीम लय भारी

कर्जत : भाजपाचे जिल्हा सरचिटणीस आणि विद्यमान दोन नगरसेवकांनी आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करीत स्थानिक भाजपाला दे धक्का दिला आहे. निवडणुकीच्या रणधुमाळी अगोदरच या पक्ष प्रवेशाने भाजपाला आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे(BJP to reflect With the entry of this party even before the election campaign).

भाजपाचे जिल्हा सरचिटणीस प्रसाद ढोकरीकर यासह कर्जत नगरपंचायतीचे दोन विद्यमान नगरसेवक नितीन तोरडमल आणि लालासाहेब शेळके यांनी पुणे येथे आ रोहित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत निडणुकीच्या पूर्वीच भाजपाला धक्का दिला आहे. नुकत्याच पंधरा दिवसापूर्वी प्रसाद ढोकरीकर यांनी आपल्या जिल्हा सरचिटणीस पदाचा राजीनामा जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांच्याकडे सुपूर्द केला होता.

देवेंद्र फडणवीसांचा अनिल परब यांच्यावर आणखी एक वार

शिवसेना खासदाराच्या संपत्तीवर ईडीचा डल्ला

भाजपाने देखील तो तात्काळ मंजुर करीत ढोकरीकर यांना पुढील मार्ग मोकळा केल्याचे सूतोवाच दिले होते. यासह मप सोसायटीचे देवा खरात यांनी देखील सोमवारी राष्ट्रवादीत प्रवेश करत स्थानिक राजकारणात खळबळ उडवून दिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील शेलार, युवकचे विशाल मेहेत्रे, विद्यार्थी आघाडीचे स्वप्नील तनपुरे, माजी सरपंच संतोष नलवडे यावेळी उपस्थित होते.

आमदार रोहित पवार यांचे कर्जत- जामखेड मतदारसंघातील विकासकामे पाहता या विकासकामाना साथ देण्यासाठी या पदाधिकाऱ्यानी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असल्याची माहिती शहराध्यक्ष सुनील शेलार यांनी दिली. वरील तिन्ही भाजपाचे पदाधिकारी माजी मंत्री प्रा राम शिंदे यांचे कट्टर समर्थक होते.

तिचा बाप कोण? रोख ठोक उत्तर द्या : नितेश राणे

आमदार रोहित पवारांचा राम शिंदेंना ‘दे धक्का’

JD(U) turns up heat on BJP, wants NDA panel, says Nitish has ‘all qualities of PM’

कर्जत नगरपंचायतीची मुदत मागील वर्षीच पूर्ण झाली असून कोरोना अनुषंगाने निवडणूक कार्यक्रम अद्याप जाहीर झाला नाही. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इनकमिंग सुरू झाले आहे. एकेकाळी माजी मंत्री प्रा राम शिंदे यांचे कट्टर समर्थक असणारे अनेक पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसला मिळत असल्याने यंदाची निवडणूक चुरशीची पाहायला मिळणार असल्याचे संकेत मिळत आहे. तर मागील नगरपंचायतीमध्ये शून्य खाते असणारे राष्ट्रवादी यंदा किती बाजी मारेल ? हे सुद्धा पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

नगरपंचायतीच्या निवडणुकीपूर्वीच राष्ट्रवादीत इनकमिंग

Mruga Vartak

Recent Posts

पाच लाखांच्या बदल्यात १८ लाखांची वसुली; चार खासगी सावकारांवर गुन्हा दाखल

शहरात सावकारीचा फाश सुरुच असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. म्हसरुळ भागात अवैध सावकारी करणाऱ्या दाम्पत्याने…

13 hours ago

जुन्या नाशकात घर आणि गाड्या जाळल्या; समाजकंटकांवर गुन्हा

जुने नाशिक  येथील जहांगिर कब्रस्तान व इतर ठिकाणांवर दुचाकीस्वार तिघांनी चारचाकी, दुचाकी वाहनांसह घरांवर जळत्या…

13 hours ago

पेन्शनच्या रकमेसाठी मुलाकडून आईचा खून

वाकडी (ता. जामनेर) येथे शनिवारी (ता. ११) एका ९० वर्षीय वृद्ध महिलेचा राहत्या घरात खून…

14 hours ago

‘विषय हार्ड’ चित्रपटाचं मोशन पोस्टर लॉन्च

मराठीमध्ये विषयांचे वैविध्य बघायला मिळतं, त्यामुळे मराठी चित्रपट अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल्समध्ये चमकदार…

14 hours ago

भाजप सरकारचा शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ; शरद पवार

सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांद्याचा प्रश्न दिवसेंदिसें वस जटिल बनत चालला असून शेतकऱ्यांसाठी जीवघेणा ठरत आहे.…

14 hours ago

भारताच्या अर्थव्यवस्थेची उत्तुंग झेप तिसऱ्या क्रमांकावर पोहोचणार; ना. भागवत कराड

भारताच्या अर्थव्यवस्थेने (India's economy ) उत्तुंग झेप घेतली असून दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणि आता…

17 hours ago