34 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeराजकीयशिवसेना खासदाराच्या संपत्तीवर ईडीचा डल्ला

शिवसेना खासदाराच्या संपत्तीवर ईडीचा डल्ला

टीम लय भारी

वाशिम : भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेमुळे शिवसेना-भाजप यांच्यातील वाद चांगलाच टोकाला गेला आहे. शिवसेना नेते अनिल परब यांच्या ईडी नोटीसची चर्चा सुरु असतानाच आणखी एका शिवसेना नेत्याच्या संपत्तीवर ईडीने धाडी टाकल्या आहेत. शिवसेनेच्या यवतमाळच्या खासदार भावना गवळी यांच्या ५ संस्थांवर ईडीने धाड टाकली आहे (ED attack on Shiv Sena MP property).

भाजपने भावना गवळी यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला होता. त्याची तक्रार ईडीकडे केली होती. ईडीने भावना गवळी यांच्या वाशिम, यवतमाळ इथल्या संस्थांवर धाडी टाकल्या. खासदार भावना गवळी यांच्याविरोधात असलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने धाडसत्र सुरू असल्याची माहिती आहे. ईडीच्या अनेक टीम वाशिममध्ये दाखल झाल्या.

ईडीने माजी आमदार विवेक पाटील यांची २३४ कोटीची संपत्ती केली जप्त

ईडीचा फास एकनाथ खडसेंभोवती : जावई अटकेत

एकंदर पाहाता शिवसेनेच्या नेत्यांच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसत आहे. एकूण 5 ठिकाणांवर ईडीची छापेमारी सध्या सुरू आहे.  सध्या छापेमारी सुरू असलेल्या ठिकाणांपैकी महिला प्रतिष्ठान, बालाजी पार्टीकल बोर्ड सहकारी संस्था, बीएएमएस कॉलेज, भानवा ऍग्रो प्रॉडक्ट याठिकाणा छापेमारी सुरू असल्याची सध्या माहिती मिळत आहे. एकूण १०० कोटी रूपयांच्या घोटाळ्या प्रकरणी सध्या याठिकाणी छापेमारी सुरू आहे. यासर्व प्रकणामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये जो वाद आहे तो अधिक रंगण्याची शक्यता आहे (The dispute between Shiv Sena and BJP is likely to escalate).

ED attack on Shiv Sena MP property
शिवसेना नेत्यावर ईडीने धाडी टाकल्या आहेत

Breaking : एकनाथ खडसेंची संपत्ती ईडीने जप्त केली

ED summons Maharashtra minister Anil Parab in Anil Deshmukh money laundering case

लहान वयातच राजकीय क्षेत्रात उतरलेल्या भावना गवळी यांनी वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी लोकसभेत प्रवेश केला. त्यानंतर २००४, २००९, २०१४ आणि आता २०१९ असा सलग पाचव्यांदा लोकसभा निवडणुकात विजय मिळवून उत्तरोत्तर राजकारणातील आपले स्थान भक्कम केले. दांडगा जनसंपर्क आणि कोणत्याही आव्हानाला थेटपणे भिडण्याची धमक या भावना गवळी यांच्या जमेच्या बाजू मानल्या जातात. गेल्या २० ते २२ वर्षांच्या काळात भावना गवळी यांनी यवतमाळ-वाशिम मतदारसंघातील पाण्यापासून इतर अनेक समस्या सोडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

विदर्भातील शिवसेनेच्या ताकदवान नेत्यांमध्ये खासदार भावना गवळी यांचा समावेश होतो. २०१९ मध्ये सलग पाचव्यांदा लोकसभेची निवडणूक जिंकून भावना गवळी यांनी आपला राजकीय दबदबा सिद्ध केला होता. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या खासदार असलेल्या भावना गवळी गेल्या अनेक वर्षांपासून विदर्भातील राजकारणात समर्थपणे पाय रोवून उभ्या आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी