अत्याचारग्रस्त महिलांचा टाहो मुख्यमंत्र्यांना ऐकायला जात नाही, चंद्रकांतदादा पाटील यांची परखड टीका

टीम लय भारी

पनवेल : छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन सत्तेत आले तरी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना अत्याचारग्रस्त महिलांचा टाहो ऐकायला जात नाही, अशी परखड टीका प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील (Chandrakantdada Patil) यांनी शक्ती केंद्र प्रमुखांच्या बैठकीत पनवेल येथे बोलताना केली.

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत आज उरण, पनवेल आणि खारघर याठिकाणी शक्ती केंद्र प्रमुखांच्या बैठका पार पडल्या. यावेळी माजी खासदार ज्येष्ठ नेते रामशेठ ठाकूर, युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील, रायगड भाजपा जिल्हाध्यक्ष आ. प्रशांत ठाकूर, आ. महेश बालदी, पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमल, प्रदेश कार्यसमिती निमंत्रित सदस्य बाळासाहेब पाटील, प्रदेश कार्यकारिणी सदस्य श्रीनंद पटवर्धन, जिल्‍हा संघटन सरचिटणीस अविनाश सोनी, जिल्हा सरचिटणीस दीपक बेहरे, जिल्हा सरचिटणीस विनोद साबळे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेटकर उपस्थित होते.

ते म्हणाले की, राज्यात दिवसेंदिवस महिलांवर अत्याचार होत आहेत. नुकतेच मेळघाटामध्ये एका महिला वनाधिकाऱ्याचा मृत्यू झाला. त्याला कोण जबाबदार आहे? महाविकास आघाडीचे सरकार गेंड्याच्या कातडीचे आहे. संवेदना नसलेल्या या भ्रष्ट सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही, असेही ते म्हणाले.

या सरकारचे भीषण स्वरूप भाजपाच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील जनतेपर्यंत पोचवले पाहिजे, अशी सूचना त्यांनी केली.

महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसची अवस्था तर ‘न घर का न घाट का’, अशी झाली आहे, असा टोला त्यांनी हाणला.

अभिषेक सावंत

Recent Posts

शिवसेनेची १५ जागा पदरी पाडून सरशी

लोकसभेच्या राज्यातील शेवटच्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्यास जेमतेम २ दिवसांचा कालावधी उरला असताना ठाणे…

5 hours ago

अक्रोड खाण्याचे फायदे

अक्रोड हा अत्यंत पौष्टिक असा सुकामेवा असून यामध्ये हेल्दी फॅट, प्रोटिन्स, फायबर, मिनरल्स आणि व्हिटॅमिन्सचे…

7 hours ago

ठाकरे गटाच्या जाहिरातीत पॉर्न स्टारचा वापर’ भाजपच्या आरोपाने खळबळ

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. त्यातच आता भाजपने एक…

8 hours ago

आरटीई अर्ज भरण्यासाठी १० मे पर्यंत मुदतवाढ

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) (RTE) २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाकरिता ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी प्राथमिक शिक्षण…

9 hours ago

नाशिक येथे एमएचटी-सीईटी (पीसीबी) ग्रुपची परीक्षा पार

एमएचटी-सीईटी परीक्षेतील भौतिकशास्‍त्र, रसायनशास्‍त्र आणि जीवशास्‍त्र (पीसीबी) (MHT-CET (PCB)) ग्रुपची परीक्षा (exam) पार पडली आहे.…

9 hours ago

गंगापूर धरणात दूषित पाणी; नाशिककरांच्या आरोग्यास धोका

गंगापूर धरण (Gangapur dam) हे नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारे प्रमुख धरण आहे. या धरणाद्वारेच होणारा…

9 hours ago