महाराष्ट्र

चित्रा वाघ यांची भाषा बदलली

लय भारी टीम 

नांदेड : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील ‘भाजप – बंडोबा’ युतीचे सरकार दोन दिवसांपूर्वीच सत्तेत आले. ‘आपले सरकार’ सत्तेत येताच चित्रा वाघ यांची भाषा मात्र बदलली. ‘महाविकास आघाडी सरकार’च्या काळात सतत रणरागिनीचे रुप धारण करणाऱ्या चित्रा वाघ यांनी ‘भाजप – बंडोबा’ युती सरकारबाबत चक्क ‘म्याव मांजर’चे धोरण अवलंबले आहे.

नांदेड शहरात स्कूल बस चालकाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना आज (दि. 02 जुलै) उघडकीस आली. या घटनेनंतर सर्वच स्तरातून तीव्र पडसाद उमटू लागल्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी सुद्धा आपले मत सोशल मिडीयाच्या माध्यमातून व्यक्त केले.

महिला अत्याचाराची घटना घडल्यानंतर चित्रा वाघ ‘महाविकास आघाडी सरकार’च्या विरोधात लगेच तलवार उपसत असत, इतकेच काय त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे संजय राठोड यांना मंत्रीपदाचा राजीनामा सुद्धा द्यावा लागला होता; मात्र आता आपलेच सरकार आल्याने त्यांनी सौम्य भाषा वापरण्यास सुरूवात केली आहे.

चित्रा वाघ ट्विटरवर लिहितात, “नांदेड येथील एका स्कूलबस चालकाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याची संताप जनक घटना घडली आहे.” असे म्हणून त्यांनी घडलेल्या आजच्या या घटनेकडे प्रामुख्याने लक्ष वेधले.

पुढे वाघ लिहितात, गेल्या अडीच वर्षांच्या काळात महाराष्ट्र पोलिसांचा संपलेला दरारा पुन्हा निर्माण करण्याचे आव्हान नवीन सरकार समोर आहे. तरच अशा घटनांना पायबंद बसेल असे म्हणून नवीन सरकार पिडीतेला न्याय मिळवून देईल असा विश्वास सुद्धा त्यांनी यावेळी व्यक्त केला.

त्यामुळे नेहमी सरकारविरोधी भूमिका मांडून राज्यातील गुन्ह्यांची वर्दी देणाऱ्या चित्रा वाघ यांनी यावेळी आपले मतपरिवर्तन केल्याचे दिसून येत आहे. वाघ यांच्या या बदलेल्या भूमिकेमुळे पिडीतेचा प्रश्न बाजूला राहिल्याचे दिसत असून नवीन सरकारचे केवळ गुणगाण सुरू असल्याचे चित्र दिसू लागले आहे.

नेमकं काय आहे हे प्रकरण?

नांदेड शहरात बस चालकाने नववी इयत्तेत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना आज समोर आली आहे. गजानन वडजे असे बसचालकाचे नाव आहे. याबाबत पिडीतेच्या वडिलांनी याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इयत्ता नववीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीला बस चालकाने आमिष दाखवून तिच्यावर वारंवार बलात्कार केला. ‘तुझे लग्न होऊ देणार नाही’ अशी धमकी सुद्धा दिली. त्यामुळे पिडीत मुलीने तणावाखाली येऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. हे प्रकरण समोर आल्याने नांदेड शहर हादरून गेले आहे.

हे सुद्धा वाचा :

Exclusive : एकनाथ शिंदे गटाला मोठा फटका, तीन मंत्रीपदे कमी झाली

वाघाच्या ‘वाटेला जाणे’ पडले महागात, काही सेकंदातच खेळ खल्लास !

धर्माच्या नावाखाली केवळ राजकारण! विवेकबुद्धीचा वापर सद्यस्थितीची गरज

 

सुचित्रा पेडणेकर

Recent Posts

भाजप मुंबईत अडचणीत, ज्येष्ठ संपादिका राही भिडे यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…

8 hours ago

मोदी सरकारच्या काळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी केवळ देशच सोडला नाही तर देशाचे नागरिकत्वही सोडले – प्रकाश आंबेडकर

मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…

10 hours ago

नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांताने प्रवाशांच्या उड्या

आज नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या ( Godan Express) डब्याखालून अचानक धूर निघाल्याने…

10 hours ago

द ग्रेट इंडियन कपिल शोच्या मीड सीझनचा प्रोमो रिलीज

'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा (The Great Indian Kapil Show's) नवा मीड सीझनचा प्रोमो रिलीज…

11 hours ago

ऐनवेळची धावपळ टाळण्यासाठी मतदान केंद्राची माहिती आधीच घ्या- जिल्हाधिकारी जलज शर्मा

लोकसभा निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्ह्यातील 20 दिंडोरी व 21 नाशिक लोकसभा मतदार संघांसाठी सोमवार,…

12 hours ago

त्र्यंबकेश्वर येथे युवकास जीवे मारण्याचा प्रयत्न; रोकडही लांबवली

पार्किंगच्या जागेच्या कथित वादावरुन १२ जणांनी एकास जीवे (kill) मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १२ जणांवर त्र्यंबकेश्वर…

12 hours ago