राष्ट्रपतींनी केला एकनाथ शिंदेंना फोन!

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांच्याकडून त्यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांना महाराष्ट्राच्या विकासामध्ये भरीव योगदान देण्यासाठी आणि निरोगी दीर्घायुष्यासाठी राष्ट्रपती मुर्मू यांनी फोनवरून शुभेच्छा दिल्या आहेत. (CM Shinde’s birthday Greetings from President Murmu)

राष्ट्रपती श्रीमती मुर्मू यांनी आज सकाळी मुख्यमंत्री शिंदे यांना दूरध्वनीवरुन शुभेच्छा दिल्या. सुदृढ, निरोगी, दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देतानाच महाराष्ट्राचा सर्वसमावेशक, सर्वांगीण विकास साधण्यासाठी आजचा दिवस आपल्याला निश्चितच बळ देईल, असेही राष्ट्रपती मुर्मू यांनी नमूद केले. राष्ट्रपतींनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे आभार मानले, अशी माहिती मुख्यमंत्री सचिवालय कक्षातून देण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाची ठाण्यात, राज्यात, सोशल मीडियावर धूम!

एकनाथ शिंदे म्हणाले, शरद पवार फोन करतात, मार्गदर्शन करतात, मी त्यांचा आभारी आहे

मराठ्यांना ओबीसींच्या सर्व सवलती लागू राहणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

महाराष्ट्रातील सर्वात उच्चपदी पोहोचलेल्या एकनाथ शिंदेंनी त्यांच्या आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले. तर दुसरीकडे राष्ट्रपती पदाच्या उमेदवार असलेल्या द्रौपदी मुर्मू यांनीही आपल्या आयुष्यात अनेक दुष्काळं पाहिलेत. सर्वसामान्य असताना दु:खाचा डोंगर कोसळल्यानंतरही द्रौपदी मुर्मू आणि एकनाथ शिंदे आपापल्या आयुष्यात खंबीरपणे उभे राहिले आणि अनेक वादळांचा सामना केला. त्यांचे जीवन संघर्ष आणि संकटांवर मात करण्याची इच्छाशक्ती ही आज अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. दरम्यान, द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपतीपदी निवड झाल्याबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांनी विधानसभेत अभिनंदनाचा प्रस्ताव देखील मांडला होता.

Team Lay Bhari

Recent Posts

जाहिरातीच्या होर्डिंगसाठी दुर्मिळ झाडाची छाटणी; पर्यावरण प्रेमींचा संताप

रविवारी पाच मे रोजी सकाळी मायको सर्कल येथील चौकातील अनेक वर्षांपासून असलेले जुने पिंपळ, चिंचेच्या…

2 hours ago

एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये आता पोटावरील क्लिष्ट प्रक्रीयांसह अवयव प्रत्यारोपण शक्य

एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये (SMBT hospital )आता पोटावरील क्लिष्ट प्रक्रीयांसह अवयव प्रत्यारोपण शक्य झाली . तर एन्डोस्कोपी,…

3 hours ago

उन्हाळ्यात ब्रोकोली खाण्याचे फायदे

ब्रोकली (broccoli) उन्हाळ्यात (summer) खाल तर अनेक समस्या दूर होतील. उन्हाळ्यात ब्रोकलीचा आहारात समावेश केल्यावर…

3 hours ago

हसण्याचा आरोग्याला मिळणारे फायदे:जागतिक हास्य दिन

जागतिक हास्य दिन ( World Laughter Day) दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो.…

4 hours ago

सप्तशृंग गडावरुन उडी घेत युगलाची आत्महत्या

आद्य स्वयंभू शक्तीपीठ असलेल्या वणी सप्तशृंग गडाच्या (Saptashringa Gada) शीतकड्यावरुन धक्कादायक घटना समोर आली आहे.…

4 hours ago

कांदा निर्यातबंदी हटताच कांदा भावात ५०० रूपये वाढ

कांदा बेल्ट असलेल्या भागात तिसऱ्या व चौथ्या टप्प्यात मतदान होणार असून त्यापूर्वीच कांदा निर्यातबंदी (onion…

5 hours ago