जाणून घ्या दीपिकाच्या प्रेग्नेंसी डाएटबद्दल

काही दिवसांपूर्वी बॉलीवूडची मस्तानी दीपिका पादुकोण (Deepika Padukone) हिने आपल्या चाहत्यांना गुड न्यूज दिली. ती सप्टेंबरमध्ये बाळाला जन्म देणार आहे. अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण लवकरच आई-बाबा होणार आहेत. दीपिकाने सोशल मीडिया पोस्टद्वारे चाहत्यांसोबत ही आनंदाची बातमी शेअर केली होती. तिच्या या आनंदाच्या बातमीनंतर दीपिकाच्या प्रत्येक चाहत्याला तिच्यासंदर्भात एक अन् एक अपडेट जाणून घेण्यासाठी उत्सुकता लागलेली असते. तर मिळालेल्या माहितीनुसार प्रेग्नंसीदरम्यान अभिनेत्री काही खास नियम फॉलो करत आहे.(deepika padukone Pregnancy diet plan )

दीपवीर जोडी अभिनयासोबत वैयक्तिक कारणासाठीही नेहमी चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या फायटर या चित्रपटात दीपिका दिसली होती. या चित्रपटाची चर्चा सुरु असताना दीपिकाने तिच्या चाहत्यांना गुड न्यूज दिली. आता तिच्या प्रेग्नेंसी डाएटबद्दल माहिती समोर आली आहे.

तर काय आहे दीपिकाचा प्रेग्नेंसी डाएट प्लॅन

दीपिका नाश्त्याला इडली, डोसा, उपमा, 2 अंडी, 2 बदाम आणि 1 कप दूध पिते. तर दुपारच्या जेवणात प्रोटीनयुक्त पदार्थ खाण्यावर तिचा भर असतो. डाळ, भाकरी-भाजी, नारळ पाणी या गोष्टींचा ती आहार करते. संध्याकाळी ती फिल्टर कॉफी पिते. तसेच रात्रीच्या जेवणात पालेभाज्या आणि सॅलेडचा समावेश करते.

मिरची कापल्यानंतर तुमच्या हाताची जळजळ होते? मग या घरगुती उपायांनी लगेच मिळेल आराम

दीपिकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, दीपिकाचा ‘कल्कि 2898 एडी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात प्रभास आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत दीपिका स्क्रिन शेअर करणार असून दोघे मुख्य भूमिकेत आहेत. अमिताभसह दीपिकाने याआधी ‘पीकू’ (Piku) या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. तर प्रभाससोबत हा तिचा पहिलाच चित्रपट आहे.

लग्नाच्या पाच वर्षांनंतर दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांच्या घरात चिमुकलं बाळ येणार आहे. काही दिवसांपूर्वी दीपिका पादुकोण हिने बाफ्टा अवॉर्ड सोहळ्याला हजेरी लावली होती. तेव्हापासून तिचा लूक सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला होता. बाफ्टा अवॉर्ड शो दरम्यान देखील अभिनेत्री दीपिका पादुकोण हिचा बेबी बंप दिसत असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती.

धनश्री ओतारी

Recent Posts

अक्षय तृतीयेनिमित्त बाजारात होणार कोट्यवधीची उलाढाल

साडेतीन मुहूर्तपैकी एक असणाऱ्या अक्षयतृतीयेनिमित्त (Akshaya Tritiya) नाशिक शहर आणि जिल्हयात कोट्यवधींची आर्थिक उलाढाल (Crores…

1 hour ago

सीताफळ खा स्वस्थ रहा! सीताफळ खाण्याचे फायदे

अँटी-ऑक्सिडेंट गुणधर्मांनी समृद्ध असणाऱ्या सीताफळाची (custard apple) चव फार कमी लोकांना आवडते, पण या फळात…

2 hours ago

सेवा निवृत्त पोलिस अधिकाऱ्याला सुने कडुन दहा कोटी रुपयांची खंडणी मागणी

नातू सम्राटला भेटायचे असेल किंवा सम्राटला ताब्यात ठेवायचे असेल तर नवी मुंबई मध्ये जॅग्वार गाडी,…

2 hours ago

सराईत गुन्हेगारांच्या 6 मित्रांची ‘तडीपारी’! पोलीस उपायुक्त चव्हाण

गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगारांवर पोलीस आयुक्तालयाकडून तडीपारीची (deported) कारवाई केली जाते. मात्र…

3 hours ago

नाशिक शरणपूर येथे ज्येष्ठ नागरिकाला धमकावत सायबर चोरट्यांनी उकळले सात लाख

मोबाइल क्रमांकावरुन सुरु झालेल्या बँक खात्यावर सहा कोटी रुपयांचा गैरव्यवहार  झाल्याचे धमकावून व्यावसायिकाला सायबर चोरट्यांनी…

5 hours ago

पंकजा मुंडेंची लढाई जातीयवादाच्या पेचात

बीडची निवडणुक ही राष्ट्रीय मुद्द्यांवर कमी आणि जातियतेला धरून अधिक अशीच आता होताना दिसतेय. आरक्षण…

5 hours ago