35 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeआरोग्यमिरची कापल्यानंतर तुमच्या हाताची जळजळ होते? मग या घरगुती उपायांनी लगेच मिळेल...

मिरची कापल्यानंतर तुमच्या हाताची जळजळ होते? मग या घरगुती उपायांनी लगेच मिळेल आराम

स्वयंपाकघरात (Kitchen Tips) काम करतांना महिलांना अनेकदा हाताला लागून जाते. काही लोकांना स्वयंपाकघरात काम करणे सोपे वाटतं. मात्र, तेवढेच ते कठीण असते स्वयंपाक बनवतांना अनेकदा लाल किंवा हिरव्या मिरच्यांचा वापर केला जातो. या मिरच्या चिरतांना आपल्या हाताला जळजळ होते. (Kitchen Tips to get rid of burning hands after cutting green chilies) बोटांची आग देखील होते. त्यात चुकूनही आपला हात नाकाला, तोंडाला किंवा डोळ्यांना लागला तर त्रास होतो. हे सर्वांसोबत कधी न कधी होतेच. तर आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत काही खास टिप्स, ज्यांनी मिरच्या चिरून झाल्यांनतर तुमच्या हाताची आणि बोटांची आग होणार नाही. (Kitchen Tips to get rid of burning hands after cutting green chilies)

किशमिशच्या मदतीने घरबसल्या मिळवा चमकदार त्वचा, महागड्या ब्यूटी प्रॉडक्ट्सला करा बाय-बाय

1. कोरफड 
मिरची कापल्यानंतर तुमच्याही हातात जळजळ होत असेल तर तुम्ही कोरफडीचा वापर करू शकता. कोरफडीने हातांना मसाज केल्याने जळजळ शांत होण्यास मदत होते.

2. दही
दही ही प्रत्येक घरात उपलब्ध असलेली एक गोष्ट आहे. मिरची कापल्यानंतर जर तुमच्या हातात जळजळ होत असेल तर तुम्ही दह्याने हाताची मालिश करू शकता. असे केल्याने जळजळ शांत होण्यास मदत होते.

Health Tips: तुम्हाला पण बॉलीवुड एक्ट्रेस सारखं स्लिम व्हायचं आहे? मग आजच ट्राय करा ‘तूप कॉफी’

3. मध
स्वयंपाकघरात आढळणाऱ्या सामान्य घटकांपैकी एक म्हणजे मध. मध हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. मिरची कापल्यानंतर तुमच्या हातातील जळजळ शांत करण्यासाठी तुम्ही मध वापरू शकता. यामुळे जळजळ होण्यापासून आराम मिळू शकतो.

4. लिंबू
लिंबाचा वापर जेवणात आंबटपणा आणण्यासाठी केला जातो. उन्हाळ्यात लिंबाचा भरपूर वापर केला जातो. लिंबू हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. मिरची कापल्यानंतर तुमच्या हातात जळजळ होत असेल तर तुम्ही लिंबू चोळू शकता. यामुळे जळजळ होण्यापासून आराम मिळू शकतो.

व्यायाम करण्याची योग्य वेळ कोणती? सकाळ की संध्याकाळ

5. खोबऱ्याचं तेल लावा
मिरच्या चिरुन झाल्यावर आपण पाण्याने हात धुतो. मात्र, तरी सुद्धा आपल्या हाताची जळजळ सुरुच असते.अशा वेळी खोबऱ्याचं तेल हातांना थोडावेळ लावून ठेवावं. त्यानंतर १५-२० मिनिटांनी हात धुवावेत.

6. बर्फ
मिरच्या चिरून झाल्यावर लगेच थोडावेळ बर्फ हातांवर चोळा त्यामुळे हाताची आग कमी होईल आणि तुम्हाला आराम मिळेल.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी