महाराष्ट्र

Explosive Found In River : रायगडमधील नदीत जिलेटिनच्या काठ्या आढळल्याने खळबळ

महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील मुंबई-गोवा महामार्गावर गुरुवारी (10 नोव्हेंबर) संध्याकाळी एका पुलाखाली स्फोटक पदार्थ आढळून आला. पेणच्या भोगावती नदीत मोठ्या प्रमाणात जिलेटीनच्या काठ्या वाहत आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यानंतर लगेचच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तात्काळ बॉम्बशोधक पथकाला पाचारण करून नदीतून जिलेटीनच्या काड्या काढण्याचे काम सुरू केले. नदीत जिलेटिनच्या काठ्या मिळण्याची घटनाही अत्यंत गंभीर आहे कारण मुंबईतील दहशतवादी हल्ल्याबाबत अलर्ट जारी करण्यात आला आहे.

या प्रकरणाची माहिती देताना एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, भोगावती नदीवरील पुलाखाली इलेक्ट्रिकल सर्किटला जोडलेल्या सहा जिलेटिन काड्यांचे दोन गुच्छ आणि घड्याळ सापडले आहे, अशी माहिती पीटीआय या वृत्तसंस्थेने दिली आहे. खबरदारी म्हणून एकेरी रस्ता बंद करण्यात आल्याचे सांगण्यात आले. रात्री उशिरापर्यंत पोलिस विभागाचे पथक नदीत तपास करत होते. मात्र, या काठ्या कुठून आणि कशा आल्या याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.

हे सुद्धा वाचा

Bahrat Jodo Yatra : उच्च शिक्षण घेऊनही तरुणांना नोकरी लागत नाही; कन्हैया कुमार यांची भाजपवर टीका

Ramdev Baba: रामदेव बाबा यांना उत्तराखंड सरकारचा झटका; पाच औषधांचे उत्पादन थांबविण्याचे आदेश

Gujarat Election : तिकीट मिळताच रविंद्र जडेजाच्या पत्नीचा आपवर निशाणा! म्हणाली, ‘ते फक्त सोशल मीडियावर दिसतात’

अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, ते स्फोटक यंत्रासारखे दिसत होते, परंतु ते अद्याप माहित नाही. ते म्हणाले की, रायगड पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी, राज्य दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) आणि नवी मुंबईतील बॉम्ब शोधक व निकामी पथक घटनास्थळी पोहोचले असून ते प्रकरणाची उकल करण्यात व्यस्त आहेत. अधिकाऱ्याने सांगितले की, परिसरात व्यापक शोध घेण्यात आला आणि पुढील तपास सुरू आहे.

विशेष म्हणजे रायगडमध्ये जिलेटीनच्या काठ्या मिळाल्याची ही घटना अशावेळी समोर आली आहे, जेव्हा मुंबईत दहशतवादी हल्ल्याचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी ड्रोन किंवा छोट्या विमानांच्या साहाय्याने दहशतवादी हल्ले करू शकतात आणि त्यानंतर व्हीव्हीआयपींनाही लक्ष्य करू शकतात, असा अलर्ट मुंबई पोलिसांनी जारी केला आहे. त्यामुळेच 12 डिसेंबरपर्यंत मुंबईत ड्रोनवरून खासगी विमानांवर बंदी घालण्यात आली आहे.

प्रणव ढमाले

Recent Posts

नवनीत राणाने शिवसेनेलाच नाचवले !

एका महिला उमेदवाराबाबत खालच्या पातळीवर टिका करुन उबाठा शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी शिवसेनेलाच अडचणीत…

18 hours ago

नाशिक जिल्ह्यातील चाडेगावात गोळीबार : सराईत गुन्हेगार फरार

नाशिक जिल्ह्यातील चाडेगावची ग्रामदैवत काशाई देवीच्या यात्रोत्सवानिमित्ताने वर्गणीसाठी बैठक झाली. बैठकीनंतर चाडेगाव फाट्यावरील हॉटेलबाहेर एकाने…

1 day ago

आई मुलीच्या नात्याची गोष्ट सांगणारा ‘मायलेक’

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'मायलेक' (Mylek) चित्रपटावर सध्या प्रेक्षक भरभरून प्रेम करत असून आई आणि मुलीच्या…

1 day ago

‘आज्जीबाई जोरात’ हे नाटक येत्या 30 एप्रिलला रंगभूमीवर पहिला प्रयोग

दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांचा मुलगा अभिनय बेर्डेने मनोरंजनसृष्टीत पदार्पण केले.…

1 day ago

मी तुमच्या उसाची राखण करणारा म्हसोबा,राजू शेट्टींचे भावनिक आवाहन

ग्रामीण भागात आपल्या शेतीची राखण करणारा एक म्हसोबा प्रत्येक गावात असतोच, आपण त्याला दरवर्षी खारा…

1 day ago

मुंबई उत्तर मध्यमधून वर्षा गायकवाड महाविकास आघाडीच्या उमेदवार !

लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने आणखी एक उमेदवाराच्या नावाची घोषणा केली आहे. लोकसभा निवडणूक साठी काँग्रेसने…

2 days ago