महाराष्ट्रातील लोकसभेच्या १८ जागांवर कांदा निर्यातबंदीचा परिणाम : भारत दिघोळे

केंद्र सरकारने लवकर कांदा निर्यात खुली न केल्यास लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील कांदा उत्पादक ( onion export ) भागात सत्ताधाऱ्यांना मतदानातून याचे उत्तर दिले जाईल. नाशिकसह, पुणे, अहमदनगर, सोलापूरसह छत्रपती संभाजीनगर अशा एकूण २४ जिल्ह्यांत कांद्याचे उत्पादन घेतले जाते. राज्यातील कांदा उत्पादक कुटुंबातील मतदाराची संख्या सुमारे एक कोटी आहे. निर्यातीच्या धरसोड धोरणांवर भारत जोडो यात्रेत खासदार राहुल गांधी यांनी बोट ठेवले होते. लोकसभेच्या १५ ते १८ जागांवर ते परिणाम करू शकतात. असा दावा महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटना अध्यक्ष भारत दिघोळे यांनी केला आहे , यामुळे या अठरा मतदारसंघातील उमेदवारांची चिंता वाढणार आहे. (Impact of onion export ban on 18 Lok Sabha seats in Maharashtra: Bharat Dighole )

हे देखील वाचा
दिल्लीचा कारभार आता तुरुंगातून चालणार; केजरीवालांचा पहिला आदेश जारी

कांदा उत्पादक भागातील सभांमध्ये राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे देखील कांदा मुख्य मुद्दा राहील, यावर भर देताना दिसतात.कांदा निर्यातीविषयी केंद्रातील भाजपप्रणित सरकारने घेतलेले निर्णय शेतकऱ्यांसाठी नुकसानकारकच राहिले आहेत. निर्यात शुल्कचा निर्णय घेण्यात आल्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. त्यानंतर ८०० डॉलर किमान निर्यात मूल्यचा निर्णय घेण्यात आला. डिसेंबर २०२३ मध्ये निर्यात बंदी करण्यात आली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, आता पुढील निर्णय होईपर्यंत निर्यात बंदी कायम ठेवण्यात येणार आहे. केंद्र सरकारने पाच वर्षांच्या कार्यकाळात केलेली ही चौथी निर्यात बंदी म्हणावी लागेल.

देशाच्या एकूण उत्पादनापैकी ३७ टक्के कांदा महाराष्ट्रात तर, देशातील १० टक्के कांद्याचे उत्पादन एकटय़ा नाशिक जिल्ह्यात घेतले जाते. कृषी विभागाची आकडेवारी लक्षात घेतल्यास कांदा शेतीवर अवलंबून असलेले मतदार लक्षात येतात. शेतमजूर, बाजार समिती आणि व्यापाऱ्यांकडील कामगार यांची संख्या कमी नाही. प्रचारातून या मतदारांना साद घालण्याचा प्रयत्न विरोधकांकडून पद्धतशीरपणे सुरू झाला आहे.सरकारी पातळीवर गतवर्षी ऑगस्टपासून कांद्यावर विशेषत्वाने लक्ष दिले गेले. या काळात पाच राज्यांत विधानसभा निवडणुका होत्या. प्रथम निर्यात शुल्क, नंतर ८०० डॉलर किमान निर्यात मूल्य आणि डिसेंबर २०२३ मध्ये थेट केलेली निर्यात बंदी आता नव्या परिपत्रकाने पुढील निर्णय होईपर्यंत कायम राहणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत कांदा नि याकडे लक्ष वेधले जात आहे.नाशिक, पुणे, सोलापूर, अहमदनगर, जळगाव, धुळय़ासह मराठवाडा, विदर्भ आणि कोकणातील काही जिल्ह्यांत कांद्याचे उत्पादन घेतले जाते. कांदा शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकरी कुटुंबातील मतदारांची संख्या एक कोटीच्या आसपास असल्याचा कांदा उत्पादक संघटनेचा अंदाज आहे. डिसेंबरपासून लागू असणारी निर्यात बंदी ३१ मार्चनंतरही अनिश्चित काळासाठी कायम ठेवण्याचे सरकारने निश्चित केले आहे. या निर्णयाने ग्रामीण भागातील प्रचारात कांद्यावरील निर्यात बंदीचा मुद्दा केंद्रस्थानी आला आहे. राज्यात अंदाजे एक लाख हेक्टरवर कांद्याची लागवड केली जाते. केंद्र सरकारने पाच वर्षांच्या कार्यकाळात केलेली ही चौथी निर्यात बंदी म्हणावी लागेल.

टीम लय भारी

Recent Posts

‘काँग्रेस कसाबची बाजू घेतेय, हा शहिदांचा अपमान’, PM मोदींचा हल्लाबोल

काँग्रेसवाले मिळून दहशतवादी कसाबची बाजू घेतायत. काँग्रेसच्या काळात विदेश राज्यमंत्री राहिले आणि कुटुंबातील जवळच्यानेही कसाबला…

5 hours ago

शांतिगिरी महाराज यांना माघारीसाठी दोन वेळा संपर्क : मुख्यमंत्री शिंदे

राजकीय अधिष्ठानापेक्षा धार्मिक अधिष्ठान नेहमी मोठे असते . त्यामुळे मी स्वतः महंत शांतिगिरी महाराज (Shantigiri…

6 hours ago

तुम्ही तर महागद्दार निघाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ; ठाकरेंवर हल्लाबोल

विजय करंजकर यांच्या भावना योग्य आहे. लोकसभेच्या उमेदवारीसाठी आदल्या दिवासापर्यंत त्यांच नाव चर्चेत होत. तसंच…

6 hours ago

अमेरिकेत ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’चे शंभर शोज ‘हाऊसफुल्ल’

'गीतरामायणा'ला स्वरसाज देणारे संगीतकार, गायक सुधीर फडके म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके बाबूजी यांची जीवनगाथा सांगणारा…

6 hours ago

राजाभाऊ वाजेंच्या प्रचारासाठी डी.जी.सूर्यवंशी समन्वयक

नाशिक लोकसभा मतदार संघातील उमेदवार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waze) यांच्या प्रचाराची धुरा सांभाळण्यासाठी महाविकास आघाडीचे…

6 hours ago

नरेंद्र मोदी फेकाडे, इंदिरा गांधी कर्तृत्ववान

लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. देशभरातील वातावरण ढवळून निघाले आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश…

10 hours ago