महाराष्ट्र

Indian Post : ‘भारतीय डाक’चा दर्जा सुधारण्याची गरज?

भारतात पूर्वीपासूनच पोस्ट ऑफिस अर्थाक डाकला सर्वात जास्त महत्त्व आहे. आजकालच्या जमान्यात जो संदेश सोशल मीडिया द्वारे अगदी सहजरित्या पाठवले जातात त्यासाठी आधीच्या काळात प्रामुख्याने डाक सेवा वापरली जात असे. त्यानंतर कालांतराने कोणताही सण असो आपल्या दूरच्या नातेवाईकांना भेटवस्तू, मिठाई पाठवायची असल्यास आपल्याला नाव आठवते ते भारतीय डाक म्हणजेच पोस्ट ऑफिसची. मात्र अनेकदा पोस्टच्या भोंगळ कारभारामुळे पार्सल गहाळ होणे किंवा वेळेत न पोहचणे अशा अनेक तक्रारी देखील नागरिकांकडून करण्यात येतात. असाच काहीसा प्रत्यय पोस्ट ऑफिसच्याबाबत नागरिकांना येत आहे.

कांदिवली पोस्ट ऑफिस येथे दिनांक १९ ऑक्टोबर रोजी पार्सल (आर्टिकल क्र EM९१९८६७८७४IN ) चेंबूरसाठी पाठवण्यात आले. मात्र अद्याप हे पार्सल चेंबूर पर्यंत पोहचलेले नाही. एवढंच नाही तर हे पार्सल चेंबूर पोस्ट ऑफिसला न पाठवता मुख्य पोस्ट ऑफिसमधून २५ ऑक्टोबर ला पुन्हा कांदिवली पोस्ट ऑफिसलाच पाठवण्यात आले, कांदिवली पोस्ट ऑफिस मधून पुन्हा मुख्य पोस्ट ऑफिस ला पाठविण्यात आले.

हे सुद्धा वाचा

Salman Khan : ‘गॅलेक्सी अपार्टमेंट’ सलमानला राहण्यासाठी असुरक्षित! मुंबई महापालिकेचा अहवाल

IPS : आयपीएस रश्मी शुक्ला यांच्यासाठी आता दिल्लीतून हालचाली?; वाचा काय आहे कारण…

MNS Ameya Khopkar : मुस्लिमविरोधी वक्तव्य करणाऱ्या अमेय खोपकरांना हिंदूंनी फटकारले

२६ ऑक्टोबर ला पार्सल परत कांदिवली पोस्ट ऑफिस मध्ये पाठविण्यात आले आणि पुन्हा ते मुंबई ऑफिस मध्ये पाठवणार. यासंदर्भात कांदिवली पोस्ट ऑफिस येथील अधिकाऱ्यांसोबत संवाद साधला असता, “आमच्याकडे मनुष्यबळाची कमतरता असून पोस्टमध्ये सध्या उत्तरभारतीयांची भरती अधिक झाली आहे. त्यामुळे मराठीमध्ये “प्रति आणि प्रेषक” लिहिले असता त्यांच्या ध्यानात येत नाही. त्या कर्मचाऱ्यांना मराठी वाचता येत नाही तसेच मनुष्यबळाची गरज असताना, वरिष्ठ पातळीवर revenue दाखवायचा असतो म्हणून मनुष्यबळ कमी करून खर्च कमी करत आहेत. यामध्ये युनियन किंवा सरकार मधील मंत्री देखील काही करत नाही.” असे तेथील अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.

खरं पाहिलं तर १ ऑक्टोबर १८५४ रोजी सुरु झालेल्या भारतीय पोस्टमध्ये अंदाजे 416,083 कर्मचारी हे कार्यरत आहेत. एवढंच नाही तर २०२२-२३ च्या अर्थसंकल्पानुसार तब्बल २०,८२०.०२ कोटींची तरतूद पोस्टसाठी करण्यात आली आहे. मात्र तरीही आपली चुकी लपवण्यासाठी मनुष्यबळाची कमतरता हे कारण पोस्टकडून आजही पुढे करण्यात येत आहे. स्पीडपोस्ट हे ३ ते ५ दिवसांच्या आत पोहचणे अपेक्षित असते. मात्र आठ दिवसानंतर देखील हे पार्सल कधी पोहचेल याची शाश्वती खुद्द पोस्ट अधिकाऱ्यांनाच नाहीये. अशावेळी सामान्य नागरिकांनी पोष्ट ऑफिस वर कसा विश्वास ठेवावा.

प्रणव ढमाले

Recent Posts

नाशिकरोडमधून 2 गावठी कट्ट्यांसह दोघांना अटक!

उपनगर पोलिसांच्या गुन्हेशोध पथकाला दोघे संशयित दसक गावानजिकच्या महालक्ष्मीनगरमध्ये गावठी कट्टे विक्रीसाठी येणार असल्याची खबर…

6 hours ago

गंगापूर धरणाची दोन कोटी लिटरने वाढली पाणी क्षमता

गंगापूर धरणालगत गंगावऱ्हे गांव येथे गेल्या १४ दिवसांपासून सुरू असलेल्या गाळ उपसा मोहिमेमुळे गंगापूर धरणाची…

7 hours ago

विरोधकांचा मोदी सरकारविरोधात ‘व्होट जिहाद’!

दोन टप्प्यातील निवडणुकांमध्ये अहंकारी आघाडीचा संसार बुडाल्याचे स्पष्ट झाल्याने निराश झालेले इंडी आघाडीचे नेते आता…

7 hours ago

राहुल गांधीची चायनीज तर मोदीजींची भारतीय गॅरंटी अमित शहा

या निवडणुकीत एक गट राम मंदिराला विरोध करणाऱ्यांचा आहे, तर दुसरा गट राम मंदिर बनविणारा…

8 hours ago

कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी ‘या’ तीन मराठी चित्रपटांची निवड

फ्रान्समध्ये येत्या 14 मे ते 22 मे 2024 दरम्यान कान्स फिल्म फेस्टिव्हल संपन्न होणार आहे.…

8 hours ago

नाशिक मनपाच्या बांधकाम विभागाचा कानाडोळा,एम एन जि एल गॅस मुळे नागरिकांना होतोय त्रास

गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील अनेक भागात एम एन जि एल तर्फे गॅस (MNGL Gas) वाहिनी…

12 hours ago